Tuesday, December 14, 2021

राजाभाऊंसाठी आजचा दिवस खास.






मग तो साजरा करण्यासाठी तशाच छानश्या जागी जायला पाहिजे, जेथे गेल्यानंतर जेवणाबरोबर त्या माहोलची पण मजा आली पाहिजे. मग ते आपल्या आवडीच्या मरीन ड्राईव्ह वरच्या "हॉटेल मरीन प्लाझा" मधल्या "द बे व्हु" ह्या रेस्टॉरंट मधे गेले. नावाप्रमाणेच येथुन समुद्राचा, क्वीन नेकलेसचा, मरीन ड्राईव्हचा नजारा फार देखणा दिसतो. पुर्वी कार्यालयातुन ते येथे दुपारी नेहमी बुफे जेवायला येत.

पण एक बाबतीत त्यांची निराशा झाली. येथे त्यांना बुफे जेवणासाठी जायचे होते पण नेमका आज बुफे नव्हता. (हल्ली तो फक्त शनिवार, रविवारीच असतो ). मग काय खायचे काय खायचे करत सर्वांनी शेवटी थाळी मागवण्याचा निर्णय घेतला. 

No comments: