Tuesday, December 14, 2021

काही काही रुढी, परंपरा या मोडीत काढायलाच हव्यात नाहीतर मनुष्य तिकडच्या तिकडे घुटमळत रहातो. पण हे ही खरं की काही काही सवयी त्या मोडल्या जावुच नये.

पुण्याकडे जातांना पहिला थांबा माटुंग्याला घ्यायचा, राम आश्रम मधे जायचे आणि नीर डोसा खायचा ही एक परंपरा, आणि आपण जेथे एकटे (जे सहसा कधीच होत नाही ) किंवा दुसऱ्यांबरोबर जेवायला, खायला गेलो असू तेथे नंतर काळेकाकूंना जेवायला/खायला घेवुन जायचेच जायचे ही राजाभाऊंची सवय. 

आज राजाभाऊंनी परंपरा मोडली पण आपली सवय नाही. मग मुद्दामुन वाट वाकडी करुन राजाभाऊ पोचले "पूर्णिमा रेस्टॉंरंट " मधे, जेथे ते गेल्याच शनिवारी एकटॆच गुपचुप जावुन रवा डोसा " खावुन आले होते

नाही म्हणजे सुरवातीस जरा मनात धागधुक  होतीच, हे उपहारगृह, त्यात मिळणारे खाद्यपदार्थ त्यांच्या पसंदीला उतरेल की नाही. पण आपल्याला वाटणारी भिती ही निरर्थक आहे हे जेव्हा फ्रुट हलव्याचा पहिला घास तोंडात गेला तेव्हाच  राजाभाऊंच्या लक्षात आले. आणि मग सेट डोसा खातांना तो आवडल्याचे पाहुन त्याच्यावर शिकामोर्तबच झाले म्हणायचे.

सेट डोसा मस्त होता आणि त्या सोबत आलेली भाजी देखील टॉपच होती. 






No comments: