हिन्दु विश्रांती गृह
आपल्या घराच्या जवळा नाना चौक मधे एका उपहारगृहामधे पोळा मिसळ खुप छान मिळते असे राजाभाऊ जाणुन होते. पण एका गैरसमजुतीपाई ते आतापर्यंत (लॉकडाऊन पुर्वीचा काळ ) येथे खायला गेले नव्हते. त्यांनी नाना चौकातील एका बंद पडलेल्या उपहारगृहात ती पोळामिसळ मिळत असेल करुन ते गप्प होते.
मग कधीतरी त्यांना उपरती झाली आणि ते मग ह्या हिन्दु विश्रांतीगृहात कॉनचिवडा घातलेली मिसळ व त्या सोबत मिळणारा गरमागरम पोळा खाण्यासाठी गेले.
मिसळ सोबत पोळा हा एक भन्नाट पदार्थ आहे. एक गोष्ट सांगावीशी वाटते की हे उपहारगृह फारच साधे आहे जरासे गचाळपणाकडे झुकलेले आहे. पण पोळामिसळ खाण्यासाठी त्याकडे दुर्लक्ष करायला हवे
No comments:
Post a Comment