आजच्या रात्रीला जरासा गोंधळ उडीला होता, भोजन करावयासी कुठेशी जायचे या संबधी.
काकुंच्या मनी श्री वृंदावन भवन खिचडी सम्राट मधे जावुन खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावयाचे होते आणि राजाभाऊंनी विनय हेल्थ होम मधे आपली जिव्हा तृप्त करणे योजीले होते.
बरे जाहले देवा, काकुंनी आपल्या मनी काय शिजते आहे ते योग्यवेळी राजाभाऊंच्या कानी घातले अन्यथहा एक मोठा रणसंग्राम घडीला असता.
काकुंची इच्छा प्रमाण मानुनी राजाभाऊ (राजाभाऊ तुम्ही आता ती मालिका अधुनमधुनही बघणे बंद करा बघु ) सी.पी. टॅंक स्थित श्री वृंदावन भवन खिचडी सम्राट मधे जेवयासी गेले. (राजाभाऊ , आता बास )
श्री वृंदावन भवन खिचडी सम्राट , पुर्वी फार वाईट अवस्थेत असतांना देखील राजाभाऊ तेथे अनेक वेळा जेवायला गेलेले. दाळढोकळी आणि मस्तपैकी मुगाच्या डाळीची थाळा भरुन खिचडी खाण्यासाठी. काही वर्षापुर्वी ह्या भोजनगृहाचे नुतनीकरण झाले. (स्वयपाकघर अगदी स्वच्छ आहे असे म्हणणे नाही ) मात्र तेव्हापासुन ही जागा राजाभाऊंच्या विस्मरणात गेलेली. आजपर्यंत येथे भोजन करण्यासाठी ते कधीच गेले नव्हते. आज तो योग जुळुन आला.
सुरवात दाळढोकळीनी केली. पण माणसाचे मन फार विचित्र असते, अनेकदा ते जुन्या जमान्यातल्या आठवणीशी तुलना करत असते. ठिक आहे.
मग मसाला डालबाटी. तुपाने थबथबलेल्या दोम बाट्या. छानशी चविष्ट डाळ. डाळीत बेतानेच तुप ओतुन कुस्करलेल्या बाट्या, अगदी पोट फुटेपर्यंत खाल्लेली दालबाटी. (चुरमा लाडु बद्दल असे कसे राजाभाऊ विसरुन गेले ?)
मलई कोफ्ता आणि मकाई रोटी खाल्यानंतर दुधी हलवा खाण्याचा विचार होता. पण पोटात आणखी काही खुपसणे अशक्य झालेले.
C.P Tank, Mumbai.
No comments:
Post a Comment