Thursday, December 31, 2009

तुमचे स्वप्न / ध्येय

शासकीय महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत असतांना सोबत Tata Institute of Social Science मधुन M.S.W. करायचे होते.

पण मार्ग भरकटत गेले, आपल्याच तालात व मस्तीत.

मैत्री

काही जणांची मैत्री कशी जन्माजन्माची, जन्मभराची असते तर काही जणांबरोबरची मैत्री अगदी क्षणभंगुर असते पण त्या मैत्रीची आठवण जन्मभर पुरणारी असते.

एक जण नवीनच डिपार्टमेंटमधे नोकरीस लागला.

अगदी पहिल्या दिवसापासुन त्याच्याशी राजाभाऊंची गट्टी जमली. दोघांचेही छंद, आवडीचे विषय अगदी सारखे. आठ दिवसात त्यांनी बऱ्यापैकी कार्यक्रम  जावुन पाहिले अगदी शास्त्रीय संगीता पासुन ते बाबामहाराज सातारकरांच्या किर्तना पर्यंत. 


काम काही त्याला रास आले नाही जेमतेम आठवडाच तो टिकला असेल.

मग तो काम सोडुन गेला, परत मागे वळुन न पहाण्यासाठी.

पण का ?

काही लिहावेसे नाही वाटत. 

Wednesday, December 30, 2009

आई


दै.सकाळमधे दर आठवड्याला एकत्र कुटुंबाचे गोडवे गाणारे लेख येत असतात, सुखी एकत्र कुटुंबांचे फोटो वगैरे.
खरच का हे एकत्र कुटुंबपध्दती चित्र येवढे मधुर असते.

श्रीमंत बापाने एका गरीब पण होतकरु मुलाला आपली मुलगी दिलेली.

त्या मुलाचा कुटुंबकबीला भला मोठा. तो सर्वात मोठा. साऱ्यांचा भार त्याच्या खांद्यावर.

नवऱ्याच्या पाच बहिणी, दोन भाऊ , त्यांची लग्नेकार्ये, त्यांची घडी नीट बसवुन देणे, दोन काका, आईवडील. मग झालेली तीन मुले.
त्यात घरात  लग्न झालेल्या नणदां त्यांच्या जागेच्या अडचणीपायी त्यांच्या नवऱ्यामुलांसकट घरात रहायला आलेल्या .

आयुष्य साधेसरळ सोपे, आनंदी नसते. ...

Tuesday, December 29, 2009

फ्रेंडस

२५-२८ वर्षानंतर तुमच्या बरोबर कॉलेजमधे असणारी तरुणी एका समारंभात भेटते ,

सोबतचे गृहस्थ तिचे वडील की काय ? तुम्हाला प्रश्न पडतो.

"हा माझा नवरा. "

तुमची ओळख करुन दिली जाते.

(एवढा म्हातारा ? )

मग रात्री घरी आल्यावर तुम्ही आरश्यासमोर उभे रहाता.

" कुंकु " चित्रपटातला प्रसंग आठवत.

"म्हातारा कोण म्हणते मी म्हातारा "

भीती

" टॅग " मधल्या प्रश्नांचा विचार करतोय.

"भीती "

समजा राजाभाऊंचे काय कमीजास्त झाले तर त्यांच्या ब्लॉगवर स्वर्गलोकात ते आता काय व कुणीकडे जेवत असतील या संबंधी पोष्ट कोण आणि कशी लिहिणार ?

Monday, December 28, 2009

क्रिम सेंटर - फर्न - कल्याणी नगर पुणॆ. -अन्नासाठी दशदिशा फिरवीशी निकोलस संता.


शंतनु घोष यांच्या ब्लॉगवर मुंबईमधल्या गिरगाव चौपाटी येथील सुप्रसिद्ध क्रीम सेंटर यांनी पुण्यात शाखा काढल्याचे वाचले आणि राजाभाऊंना तिथे खायला गेल्या शिवाय रहावेना.

नाताळाच्या दिवशी कल्याणी नगर मधे "अवतार" बघायचा व कोठेतरी चांगल्या ठिकाणी सकाळी मस्त पैकी जेवायला जायचे हा बेत ठरला.  गोल्ड लॅब ,आइनॉक्स कुठेही चित्रपटाची तिकीटे मिळेना, त्यात भुकेने कासावीस झाल्याने  मेंदुला जाणारे सारे सिग्नल्स जॅम . शंतनुंनी लिहलेल्या एकाही रेस्टॉरंटस चे नाव काही आठवेना, एक ढोले पाटील रोड वरचे "सिगरी"   सोडुन.

काही जागी जेवायला गेले की का कोण जाणॆ एक प्रकारचा नर्वसनेस येत जातो , तेथे जेवणाची इच्छा होत नाही. "सिगरी"मधे ही तसेच झाले, वाटायला लागले की याची आता उतरती कळा सुरु झाली आहे, जवळजवळ ते सर्व रिकामेच होते, कर्मचारीवर्गाचे मळके कपडॆ खुपायला लागले व मेन्यु वरचे दर टोचायला लागले.  

बाजुच्या मेनलॅड चायना मधे तर ते बघायला कबुल नव्हते, खुप चालायला लागले की असे होते बऱ्याच वेळा.  दोन तास थांबायला लावु बघत होते. गेले उडत.

मग कोरेगाव पार्क मधे मलाका स्पाईस, सिल्क रुट आदी चांगली उपहारगृह शोधणे झाले , ABC Farm पण बघुन झाले. पण कुठेच जेवावसे वाटत नव्हते. 

मग राजाभाऊंच्या मुलाला क्रीम सेंटर आठवले, शोधत शोधत ते तेथे पोचले.

येथले छोले भतुरे एकदम सरस. लहानपणापासुन ते येथे हा पदार्थ खात आले आहेत. 

रशियन सॅलड सॅंडवीच त्यांच्या बायकोची आवडती डिश.   पुण्यामधे अजुनही मुंबई सारखा चांगला पाव मिळत नाही त्या मुळॆ याची चव पावामुळॆ जरासी वेगळी लागत होती.

मुलांना कधीही जास्त सुट देवु नये, ते दिवाळॆ काढतात. हा  छोकरा मग मुक्तहस्ते पदार्थ मागवतच राहिला, ऑनीयन रिंग काय, टॅकोज काय ,  व्हे. सॅटॆलाईट सिझलर्स, सेझवान व्हे. सिझलर्स, पिंक स्टॅबेरी सोडा, आणि वर सिजलींग ब्राउनी.  

एकंदरीत हे रेष्टॉरंट भलतेच महागडॆ आहे, तिघासांठी जवळजवळ १२०० रुपये आणि तेही ही महागाई पोळुन टाकत असतांना म्हणजे खुप झाले.

आता महागाईचे चटके जाणवायला लागले आहेत.  परत बाहेर जेवायला जायचे नाही असे ठरवत असतांना नुकतेच संतनु घोष आता "सयाजी " मधल्या बुफे वर लिहणार असल्याचे कळले ,

तेव्हा आता. इन्दौरच्या सयाजी मधे बऱ्याच वेळा जाणे झाले आहे, पुण्यातले कसे असेल ?








Saturday, December 26, 2009

काय शिंची ......

1.Where is your cell phone?
  
Mobile phone is immobile and I am mobile.

2.Your hair?

उडे जब जब झुल्फे तेरी कुवारीयोंका दिल मचले ..
गेले ते  केव्हाच सोडुन. कदाचीत दुसऱ्या कोणाच्या डोक्यावर असतील, त्याने घातलेल्या विगमधे

3.Your mother?

लहाणपणीचा तिच्या हातचा खाल्लेला मार अजुन आठवतोय. आई ग .

4.Your father?

नशिब त्यांचे " आमचा बाप अन आम्ही " हे पुस्तक अस्मादिकांनी लिहायला घेतले नाही.
किती वर्षे माझ्यासारख्याला मुलाला अजुन सहन करतील ? त्याच्या सहनशक्‍तीचे, थंडपणाचे नवल वाटते.

5.Your favorite food?

श्रावणातले केळीच्या पानावरले वरणभात, किंवा मुगाचे बिर्डे, लिंबाचे गोडं लोणचे , मेतकुट आणि भरपुर भरपुर , खुप खुप उकडीचे मोदक. (भलेमोठाले पोट उगीच नाही , ते कमवावे लागते )

6.Your dream last night?

स्वप्न पडायला झोप मुळात यायला लागते.
कहु किस से मै कि क्या हे,  शबे ग़म बुरी बला है
 मुझे क्या बुरा था मरना अगर एक बार होता ||

रंगीन ख्याब खो गये यादे बिछ्ड गयी
अब हम है और जीस्त का सहरा-ए-लक्कोदक |

7.Your favorite drink?

शहाळ्याचे पाणी, त्यात किंचीत लिंबु पिळावे, थोडासा मध वर पुदिन्याची दोनचार पानं, जरासे कोवळे खोबरे ( मलाई ) , छानसे थंडगार करुन

8.Your dream/goal?

भरपुर प्रवास करावा, सतत भटकत रहावे किंवा मग समाजसेवा करत रहावी ( चालला दुनियेच्या उठाठेव्या करायला, घरात सांगितलेले एक काम धडपणे करता येत नाहे = इती बायको.. )

9.What room are you in?

शोर बरपा है खाना-ए-दिल मे
कोई दिवार सी गिरी है अभी

10.Your hobby?

हमको है हर शाम कुछ शमएं जला लेनेका शौक
किसको फुर्सत है यहा आने की, आता कौन है |

11.Your fear?

मुझे  डर है मेरे ए चारागर ये चिराग तु ही बुझा ना दे

12.Where do you want to be in 6 years?

ए दिल मुझे ऐसी जगा ले चल जहा कोई ना हो

13.Where were you last night?

खयालो मे किसीके

14.Something that you aren’t?

व्यवहारी. One does not get what he deserves , he gets what he negotiates. ( What is that ? )

15.Muffins?

Blueberry

16.Wish list item?

Car, DSRL, Laptop and ...... and ......and................and .......................annnnnnnnnnnnnnnnnd ................


17.Where did you grow up?
अभी तक बचपना गया ही नही, मोठे होणे दुरच

18.Last thing you did?

कधी नाही ते बायकोशी चार शब्द प्रेमाचे बोलणे. Xmas spirit in the air

19.What are you wearing?

तन्हा मेरे मातम मे नही शाम सियह पोश
रेहता है सदा चाक गिरेबाने सहर भी ॥

मुखवटा व खादीचे जॅकेट भोपाळ वरुन आणलेले

20.Your TV?
रिमोट कंट्रोल बायकोच्या हाती माझा पण आणि टिव्हीचा देखील.

21.Your pets?

खुप काही पाळुन झाले अगदी माणसे सुद्धा. मग त्यात चार डॉबरमन कुत्रे, मासे, खार, पोपट, कासवं , लव्हबर्डस, सफे कबुतरं, आणि कोंबड्या देखिल

22.Friends?
सगळेच माझ्यासारखे विक्षिप्त आणि चक्रम.

23.Your life?

जिंदगी यु ही गुजर ही जाती क्यु तेरा राहगुजर याद आया ।


जिंदगानी तवील थी लेकिन मौत के इंतजार मे गुजरी |
जो भी गुजरी बुरी भली "सानी" आपके इख्तयार में गुजरी |

Well , Life is Beuatiful

24.Your mood?

Depressed as usual

25.Missing someone?

My cousin sister who died at the age of five 


26.Vehicle?

कधी येणार (एक दिर्घ निश्वास )

27.Something you’re not wearing?

मेरे चेहरे पे गम आश्कारा नही
मगर ये ना समझो मै गम का मारा नही

28.Your favorite store?

इन्दौर मधल्या सराफ्यातील सर्व खाद्यपदार्थांची दुकाने

29.Your favorite color?

चॉकलेटी

30.When was the last time you laughed?

कपाळ्यावरी सदा आठ्या. यहा हसना मना है

जब भी तकमीले मुहब्ब्त का खयाल आता है
मुझको अपने ही ख़यालो पे हॅंसी आती है ।

31.Last time you cried?

यु तो हर शाम उम्मीदों मे गुज़र जाती थी
आज कुछ बात है जो शाम पे रोना आया ।

मुझपे ही ख़त्म हुआ सिलसिला-ए-नौहागरी
इस क़दर गर्दिशे अय्याम पे रोना आया


32.Your best friend?

मुलाला करुन घ्यायचे होते, पण नाही जमले .

33.One place that you go to over and over?

फिर तेरे कूचे को जाता है ख़याल

34.One person who emails me regularly?

बॅंका. Credit Card Statement.

35.Favorite place to eat?

Courtyard Marriot, Hingewadi, Pune

Thursday, December 24, 2009

श्रीमती रीथादेवी

ज्यांनी आपल्या करियरची सुरवात याच व्यासपिठावरुन , कल के कलाकार संमेलनातुन केली व त्यांची सांगता याच व्यासपिठावरुन आज स्वामी हरिदास संगीत संमेलनाद्वारे केली.


सुर सिंगार सांसदचे मनपुर्वक आभार

सुरसिंगार सांसद संस्थेचे पदाधिकारी ज्या तळमळीने स्वामी हरिदास संगीत् संमेलन व कल के कलाकार संमेलन गेली ५६ वर्षे आयोजीत करत आहेत त्याला तोड नाही.  मेहनत, प्रचंड मेहनत , अविरत मेहनत, अपार कष्ट , कलावंतांची नावे ठरवण्यापासुन ते त्यांने रंगमंचावर सादर करण्यापर्यंत.
गेली १२ दिवस आपला कामधंदा, व्यवसाय सांभाळुन सायंकाळ ते रात्री उशीरा पर्यंत कलेची सेवा करत रहाण्या पर्यंत


त्यांच्या मुळॆ आज देशाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या कलावंतांना ऐकण्याची, पहाण्याची दुर्लभ संधी मिळते, त्यांचे आभार मानावे तेवढे थोडॆ आहे.

स्वामी हरीदास संगीत संमेलनची आज सांगता झाली , आता त्यांना वेध लागले असतेल ते एप्रिल , मे दरम्यान होणाऱ्या कल के कलाकार संमेलनाची.




्श्री. अनिल जोशी, श्री.पटॆल व प्रो. निगम

श्री. आनंद सिंग

्श्री. ललीत खन्ना , ललीत शेठ.

स्वामी हरीदास संगीत संमेलन - संपायलाच हवे होते का ?


योध्दा आपल्या भात्यातील अमोघ शस्त्र, ब्रम्हास्त्र, निर्णायक क्षणासाठी, अखेरच्या घडीसाठी राखुन ठेवतो , व त्याच्या वापराने युध्दाचा शेवट करतो, विजय प्राप्त करतो, अगदी तसेच सुर सिंगार संसदनी या आजच्या अखेरच्या दिवसासाठी , अप्रतिम कार्यक्रम सादर करुन रसीकांची मने घायाल करायला, काबीज करायला, त्यांना लुभावयाला केले, अलविदा करतांना त्यांनी सुखद आठवणी घेवुन परत पुढच्या बर्षी होणाऱ्या संगीत संमेलनाची प्रतिक्षा करत रहावी या कारणे.

मुंबईच्या पुर्वा भावे व कनीनिका निनावे यांचे भरतनाट्यम , खैरागड वरुन आलेल्या चंदन सिंग यांचे कथ्थक , मुंबईच्या सुचित्रा राणे यांचे कुचिपुडी नृत्य, पुण्याच्या पायल उंब्रानी व स्वरश्री देव यांचे कथ्थक आणि अखेरीस गुरुवर्य पं. दिपक मुजुमदार व त्यांचे शिष्य श्री. पवित्र भट यांचे भरतनाट्यम.


आता वाट बघणे "कल के कलाकार संमेलनाची "













Tuesday, December 22, 2009

बरच काही

दिवस उजाडतो, बरच काही करायचे असतं

दिवस मावळतो, बरच काही करायचे राहुन गेलेले असतं

आयुष्य असेच निरर्थक पुढे सरकत राहिलेले .

कशाला उद्याची बात !

उद्याला आता काय ?

पुण्याचे कलावंत हे साऱ्या विश्वात सरस, Best in the whole world , या वर राजाभाऊंचे मत ठाम.

उद्याचा पुण्याच्या स्वरश्री देव,  ईशा देशपांडे व पायल उंब्रानी यांचे कथ्थक चुकवुन चालणार नाही.

गेल्या वर्षी पायल उंब्रानी यांचा झालेला हा कार्यक्रम

लोक काय दोन्ही तोंडाने बोलतात.

नितीनभाऊ मंत्री असतानां, त्यांनी मुंबईमधे "चौक तेथे उड्डाण पुल " बांधण्याचा चंग बांधला आहे, राज्याची तिजोरी पुल बांधण्यात  रिकामी करत आहेत,  राज्यावर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे करुत लोक टीका करत असत.

आणि आता,

नितीनभाऊंनी मंत्री असतांना त्यांनी अनेक ठिकाणी उड्डाण पुल बांधले , वगैरे वगैरे.

स्वामी हरीदास संगीत संमेलन -दिवस ११ वा


एखादा दिवस असा येतो की जो तुम्हाला उत्तम, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ट कलाकृती देवुन जातो, डोळ्याचे पारणे फिटते, एक आगळे समाधान देवुन जातो.

वैभव आरेकर व केतकी जोशी यांनी सादर केलेले भरतनाट्यम, दशावतार. असे पुन्हा होणे नाही.

आतापर्यंत ओडीसी नृत्य व्यवस्थीत पहायला मिळालेच नव्हते, ती कसर आज भुवनेश्वरच्या स्मॄतीरेखा त्रिपाठी यांनी भरुन काढली, अप्रतिम, केवळ हाच शब्द.

हे दोन कार्यक्रम बघुन झाल्यानंतर आता कथ्थक नेहमीचेच, ते काय बघायचे (क्षमा असावी ), चला निघुया असा राजाभाऊंने विचार केला. पण पाहु तरी कोण आहे म्हणता म्हणता, ते खुर्चीला खिळुन राहिले. जबलपुर वरुन आलेल्या वैषाली पाटील यांनी तर कमाल केली.  वा , क्या बात है.















Monday, December 21, 2009

स्वामी हरीदास संगीत संमेलन - दिवस दहावा

कृष्ण कृपा सागरा , आनंद , आनंद, आनंद .

हा संमेलनाचा ज्वर आता असह्य होवु लागला आहे. झोपेत पण कार्यक्रम दिसु लागले आहेत.

आज धमाल आली. श्रीमती लता सुरेंद्र आणि त्यांच्या १८-१९ शिष्येंनी भरतनाट्यम बॅले सादर केले. जवळजवळ दिड तास हा कार्यक्रम चालला. त्याच्या नंतर त्यांच्याच एका शिष्येने , चैत्रा शेट्टीने भरतनाट्यम सादर केले.

आजच्या कार्यक्रमाची सुरवात कोलकता वरुन आलेल्या स्वागता बॅनर्जी हिच्या ओडीसी नॄत्याने झाले, त्यानंतर लखनौच्या गौरव शर्माचे कथ्थक झाले.

मुंबईच्या संगिता राजन व अनु नारायण यांचे ओडीसी नृत्य झाल्या नंतर पुढचे कार्यक्रम बघायचे त्राण राजाभाऊंना राहिले नाही.










ता.क. चांगल्या कॅमेराची राजाभाऊंना आत्यंतीक गरज आहे.

Sunday, December 20, 2009

स्वामी हरीदास संमेलन - दिवस नववा.

एकीकडॆ झाकीर हुसेन आणि कं. यांच्या कार्यक्रमाचा पास मिळाला आहे आणि त्याच वेळी दुसरीकडॆ देशभरातुन आलेल्या नवोदीत, गुणी तरूण कलावंत "स्वामी हरीदास संगीत संमेलन मधे आपली कला सादर करत आहेत.

अश्यावेळी  राजाभाऊंनी कोणाला प्राधान्य दिले असेल ?

आपले नेते प्रांतीयपणा वरुन राजकारण करत, लोकांच्या भावनांशी खेळत, भडकवत स्वःताच कार्यभाग साधुन घेत असतात, त्याच वेळी कलेच्या प्रांगणात कलकत्ताचा राहुलदेव मोंडल मुंबईमधे दक्षिणेकडचे भरतनाट्यम सादर करण्यासाठी येत असतो.





आजचा दिवस गाजवला तो राहुलदेव नी.  अंग लवचीक असावे तरी किती. त्यानी म्हणण्यापेक्षा आज जणु प्रत्यक्ष शिवानेच रंगमंचावर त्याच्या रुपाने येवुन  शिव तांडव सादर केले असे म्हटले तर ती अतिशोयक्ती ठरु नये. 

त्याच्या आधी दिल्लीवरुन आलेल्या मोमीता घोषनी ओडीसी नृत्य सादर केले होते. ते पहाण्यासाठी राजाभाऊ आज पुण्याहुन खुप लवकर निघाले, पण . हुकायचे ते हुकलेच.

मग गोरखपुर वरुन आलेल्या सुजया घोष व वाराणशी वरुन आलेल्या स्वेता चौधरी यांचे कथ्थक नृत्य झाले.



नंतरचे कार्यक्रम बघण्यासाठी आज राजाभाऊंकडॆ एनर्जी शिल्लक रहिली नव्हती.

खर तर त्यांनी शेवट पर्यंत थांबायचे होते.

आता प्रतिक्षा उद्याची.





तेरे गुलाबी गालोंका जी करता है रंग चुरा लूँ , आ तेरी तस्वीर बना लूँ !

बाल हैं बादल जैसे काले


सागर से नैना मतवाले

तेरे गुलाबी गालों से

जी करता है रंग चुरा लूँ

आ तेरी तस्वीर बना लूँ ...

अरे वेड्या ही पानगळती नव्हे !

शाख़ो सें बर्गे-गुल नहीं झड़ते है बाग़ में
जे़वर उतर रहा है अरुसे बहार का । - अमीर मीनाई.


१२ ला असतांना मराठी विषयाच्या पुस्तकात श्री.नरेंद्र सिंदकर यांच्या "क्रेमलीनच्या बुरुजावरुन " या पुस्तकातील एक प्रकरण होते, त्यातला हा शेर डोक्यात घुसुन राहिला होता.

इतकी वर्षे तो आठवत नव्हता पण त्याचा मतितार्थ अंधुकसा आठवत असे, आज तो शेर सापडला.


अरे वेड्या,  ही पानगळती नव्हे, या फुलांच्या पाकळ्या निरर्थक गळुन पडत नाहे आहेत,  जणु नववधु मिलनाच्या ओढीने तयार हॊतांना,  केलेला सर्व साजशृंगार उतरवुन ठेवत आहे.  

Gargoyles and others

Thursday, December 17, 2009

स्वामी हरिदास संगीत संमेलन, दिवस सहावा


किसनगढ वरुन आलेल्या संत सतनाम सिंग यांचे गाणे ऐकणॆ गेल्या वेळी हुकले होते. आज ते ऐकायचेच करत राजाभाऊ लवकर पोचले.


त्यांच्या नंतर भोपाळ वरुन आलेल्या श्रुती  अधिकारी यांचे संतुर वादन व इंन्दौरच्या चित्रगणा अग्ले यांचे पखावज वादन झाले.




कलकत्यावरुन आलेले श्री. सुदीप भटटाचारजी यांचे गायन व वाराणाशीच्या अतुल शंकरचे बासुरी वादन ऐकुन ते आज घरी लवकर परतले.

स्वामी हरिदास संगीत संमेलन, दिवस सहावा


आज असे काय घडले ज्यामुळे राजाभाऊंच्या हाती औचीत्यभंगाचा प्रमाद झाला. समोर चाललेला पुरीया धनश्री ऐकायचा सोडुन ते दुसऱ्यांना डिस्टब करत "त्या"  ओळख करुन दिलेल्या व्यक्‍तीशी बोलतच राहिले, बोलतच राहिले, बोलतच सुटले. 

" हे मेंडोलीन वाजवतात. "

(संपुर्ण जगात केवळ एकच  मेंडोलीन वादक ते जाणतात , हो सर्वश्रेष्ठ आहे ( साऱ्या भक्‍तांना असेच वाटत असते काय ? ) हे वाक्य ओठापर्यंत आलेले त्यांनी थांबवले , उगीच त्यांना वाईट वाटायला नको )

आपण ज्याला भजतो त्यांना भेटणे नशीबी नव्हते पण आज त्यांच्या मुलाशी ओळख झाली हे ही थोडके नसावे. 

सज्जाद हुसेनच्या मुलाशी आज राजाभाऊंची ओळख झाली, मग काय त्यांच्या वाणीला बहर आला, ते येवढे उत्तेजीत झाले कि त्यांच्या ओठावर असलेली सज्जादची गाणी देखील त्यांना आठवेना. " सैया आणि फक्त सैया " आठवत राहिले.

होता है कभी कभी ऐसाभी होता है !


भीती वाट्ते

भीती वाटते जर का हा असा थंडा प्रतिसाद मुंबईकर जर का देवु लागले तर मग हे कलावंत हळु हळु या संमेलनाला येणे कमी करु लागतील.

ओडीसी संगीत - स्वामी हरीदास संगीत संमेलन. दिवस पाचवा.



काय हो राजाभाऊ, तब्येत तर ठीक आहे ना, आता पर्यंत हिंदुस्थानी संगीत व कर्नाटकी संगीताबद्द्ल ऐकले होते, पण हे नवीनच ओडीसी संगीत कुठुन आले ?


अहो तुम्ही भुवनेश्वर वरुन आलेल्या श्रीमती संगीता गौसेन यांचे गाणे ऐकले असते ना तर तुम्हाला कळाले असते हा काय प्रकार आहे तो, नेमके दोन्ही कॅमेरे आजच मोडायचे होते, नाहीतर तुम्हाला ऐकवले असते किती माधुर्य होते या गाण्यामधे ते.

आणि काय हो राजाभाऊ,  आतापर्यंत तुमचा झालेला आणखीन एक गैरसमज दुर झाला असेल ना. वाटत होते धृपद संगीत भारतातील  फक्‍त काही भागापुरते सीमीत आहे पण कोलकतावरुन आलेल्या श्रीमती रंजीता मुखर्जी व त्यांच्यानंतर झालेल्या श्री. दुर्गा शंकर अचीर्जी यांच्या गाण्यानी दुर झाला असेल ना.

हो ना.

आज वेळॆ अभावे दोन चांगले कार्यक्रम हुकले.

भुवनेश्वरच्या गुरु सचीनानंद दास यांचे मरडल वादन व कलकत्ताच्या बुद्धदेव मन्ना व लातुरचे श्री. गोपाळ जाधव यांचे तबल व पखवज याची जुगलबंदी.

Wednesday, December 16, 2009

स्वामी हरीदास संमेलन - दिवस चवथा

किसीके दिल मे प्यास पैदा कर देना और फिर उसे बुझाये बीना अधुरी छोड देना.

हाय !.

हा दिवस गाजवला तो म्हैसुर वरुन आलेले समीर राव यांची बासुरी आणि कोलकताचे श्री. अभिषेक अधिकारी यांची सतार यांनी.

काय रंगली होती ही जोडी   राग चंद्रकंसांत.

आ हा. बहार आली. वा भाई वा.  बहुत खुब.

काश समयकी पाबंदी न होती.

जे कार्यक्रम लवकर  संपायला हवेत ते संपता संपत नाही आणि जे कार्यक्रम संपु नये असे वाटत असते ते कलावंतांना दिल्या गेलेल्या वेळेमुळे संपवावे लागतात.

Tuesday, December 15, 2009

वाईट फारच वाईट








कोलकता व अमेरिकस्थीत पं. देबी प्रसाद चटर्जी आपला सतारवादनाचा कार्यक्रम करायला मुद्दामुन अमेरीकावरुन मुंबईत आले आणि हा मुंबईनी त्यांना दिलेला थंडा प्रतिसाद.

चुकी कोणची ?

हा महोत्सव लोकांपर्यंत पोचतच नाही. दर वेळेची तीच रड.  दुरदुरच्या प्रदेशातुन आलेल्या सर्व  कलावंतांना रिकाम्या खुर्चींपुढे आपली कला पेश करायला लागते याचे राजाभाऊंनी फार दुःख होते.  किती हौशेनी हे सर्व जण मुंबईत येत असतील

 कलावंताना काहीतरी रसीकांना सांगायचे असते , आपल्या भावना या संगीताद्वारे समोर असलेल्या श्रोत्यांपर्यंत पोचवायच्या असतात, कलेमधुन आपल्याला जो आनंद मिळातो तो त्यांना वाटायचा असतो, या द्वारे मिळणाऱ्या आंतरीक समाधानामधे त्यांना कोणालातरी सामील करुन घ्यायचे असते. त्यांची कला ही जशी त्यांच्यासाठी असते त्यांच्यापेक्षा जास्त ती रसिकांसाठी असते.

पण. समोर कोणीच नसेल तर ?

हे सारे दुःख मनाशी घेत कार्यक्रमाचा आस्वाद घेणे फार कठीण जाते.

या मैफिलीत पंडीतजींनी राग चारुकेशी वाजवला . त्यांनी अप्रतिम साथ केली पं.मदन मिश्रा यांनी.

बहार आली.

ही बहार सर्वांपर्यंत पोचावी असे राहुन राहुन वाटते.

हेची दान देगा देवा

देवा , दुसरे काहीही मागणे नाही. फक्‍त गाढ , सुखद निद्रा रोज लागो, अगदी अशीच.

भावमुद्रा - पं. विश्वनाथ -



दिवस तिसरा.

दिल्लीवरुन आलेले पंडीतजी राग जोग गायले.

पुण्याच्या डॉ.सुहासीनी कोरटकर यांचे गाणे ऐकण्याचा योग काय अजुन पर्यंत जुळुन येत नाही आहे.

पोचायला उशीर झाला.


Sunday, December 13, 2009

संचारी बक्षी - सतार -बागेश्री

स्वामी हरीदास संगीत संमेलन - दिवस दुसरा


आज संचारी बक्षी यांचे सतार वादन ऐकले. राग बागेश्री त्यांनी बढीया वाजवला. मजा आली.

अलाहाबाद वरुन आलेल्या श्री. प्रशांत कुमार, समीत कुमार मालीक व कौशीक कुमार यांचे धृपद  व पखावज वादन उशीरा पोचल्याने हुकले.