Sunday, December 19, 2021

सिगरी द ग्लोबल ग्रील

 राजाभाऊ एकदा सहकाऱ्यांसोबत "सिगरी द ग्लोबल ग्रील " मधे रात्री जेवायला गेले होते.  काहीतरी साजरे करण्यासाठी. 

हे रेस्टॉरंट त्यांना खुप भावले, अगदी "Barbeque Nation" पेक्षा जास्त. येथे ग्रिल्ड पदार्थाचे प्रमाण जास्तच आहे. जेवणाचे प्रकारही खुप आहेत.

मिष्टान्न घ्यायला गेले तेव्ह त्यामधे चक्क जिलेबी दिसली. रस्त्यात कितीही गर्दी असो, तुडुंब भरलेला असो, पण जेव्हा एखादा व्ही.आय.पी. ची गाडी येते तेव्हा कसे पोलीस सर्वांना बाजुला करतात व त्यांची गाडी पुढे जावुन देतात, अगदी त्याच प्रमाणे राजाभाऊंसाठी जिलेबी ही मोठी व्ही.आय.पी. आहे. 

तुडुंब भरलेल्या पोटात तिच्यासाठी मग भरपुर जागा झाली.

राजाभाऊंचा एक शिरस्ता आहे. जेथे जेथे ते कार्यालयामधुन बाहेर जेवायला जातात त्या ठिकाणी मग आपल्या बायकोला घेवुन जातात.

अजुनपर्यंत इथे तिच्या सोबत जाणे की ही जमले नाही. 




No comments: