रात्रीचे साडेबारा एक, दिड वाजले असावेत. भोपाळ वरुन इन्दौरला पोचायला तसा उशीरच झालेला. वाटेत फारसे कुठे खाणे झालेच नव्हते. भुकेले पोट पण मन उत्साही. येथे येण्यासाठी जो जीव आतुरला होता कदाचीत त्यामुळे भुक जाणवली नसेल.
हॉटेलच्या स्वागतकक्षात अचानक जाणवले आणि बोलुन दाखवले, आज आपण उपाशी आहोत ते.
वरती खोलीत पोचतोनपोचतो तोच पाठोपाठ गरमागरम दुध व व्हे. तसेच चीज सॅंडवीचीस हजर. त्याक्षणीच श्रीमायाने मन जिंकले. मग त्यांची मिळालेली सर्वात चांगली प्रशस्थ खोली, दरोरोज त्यांच्या चविष्ट जेवणावर मारलेला ताव. गच्चीत उभ राहिले की खालच्या लॉनवर चाललेल्या लग्नसोहळ्यांचे ( आणि कशाकशाचे ? ) अवलोकन.
जेवण जेवावे तर ते श्रीमायामधेच.
वीस वर्षानंतर ही आठवण ताजीतवानी .
इन्दौरला घर झाले तरी दिवसाआडची श्रीमायाची फेरी चुकायचे मात्र नाही, मग घराजवळ ए. बी. रोडवर ची त्यांची शाखा असो की राएनटी रस्तावराचे.
श्रीमाया.
No comments:
Post a Comment