Monday, January 03, 2011

स्थळ - कोकण सरस, सी.बी.डी बेलापुर.

चला, नववर्षाची सुरवात कशी झोकात झाली. उकडीचे मोदक, गुहागर वरुन आलेल्या सौ.पालशेटकरांकडॆ गरमागरम , अगदी जीभेला चटके बसेबसे पर्यंत असणारी खास पुरणपोळी, आणि मग त्यासोबत आंबोळीचा खासा बेत.

स्थळ - कोकण सरस, सी.बी.डी बेलापुर.
वेळ - दुपारची.

पण.

पण एकच समस्या.
राजाभाऊंच्या पोटाने, अश्या पोटाने की ज्याने संपुर्ण वर्ष आपल्यावर अत्याचार होवुन दिले, नाहीनाही ते आणि नकोनको असतांना, केवळ तुडुंब भरुन रहाण्यासाठी राजाभाऊंना आपल्यात काहीबाही भरुन दिले, अश्या पोटाने , ज्यावर राजाभाऊंचा पुर्ण भरवसा आहे, त्यानेच दगा दिला, त्याने चक्क खाणे स्विकारायला नकार दिला.
मग राजाभाऊंनी चार उकडीचे मोदक, एक पुरणपोळी आणि एका आंबोळीवर समाधान मानले. ( त्या आधी वाशीत कॅफे विहारमधे खाल्लेला रवामसाला डोसा यात धरलेला नाही )


पाच तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरु आहे.

2 comments:

Sujata said...

Very cool pictures!

sonal m m said...

tumhi amchya gharashejari yeun gelat ki !!