Monday, January 10, 2011

श्रीमती उपळेकर यांचे "फास्ट फुड ".फलटण.

अन्नाची चव केव्हा बढीया लागते ?
जेव्हा आपल्याला खुप भुक लागली असते.

खुप भुक, मरणाची भुक , एवढी भुक की गवत समोर आल्यावर ते ही खाण्याची आपली तयारी असते. आणि अश्या वेळी मग ते अन्न कसे का असेना, अगदी बेचव असले तरी ते रुचकर लागु लागते.

आणि मग,
आणि मग त्यात या अश्या भुकेल्या अवस्थेत असतांना जर आपल्या समोर चविष्ट, चवदार, रुचकर, गरमागरम इ.इ. अन्न आले तर त्याचा आस्वाद घेतांना आपली काय अवस्था होत असेल ?

ब्रम्हांनदी टाळी. की वेडापिसा जीव, सैरभैर पळणारे मन, की द्विधा मनस्थितीत सापडलेले मन. काय खावु नी काय नाही ? किती खावु नी किती नाही. हे खावु की ते खावु ? आणि खाल्ले तर किती खावु ?

मिसळ पाव , एक अशी चविष्ट मिसळ, टेस्टी मिसळ, की जी ची चव आपण गेल्या दहा हजार वर्षात घेतली नसेल, एक अशी मिसळ जशी दुसरी कडे मिळणे नाही, ती खावुया का (सर्वात आधी ) ? की मस्त पाव भाजी ?

आता मागवलेल्या कटलेटला यायला वेळ लागत असेल तर ह्या दरम्यान दहीबटाटा शेवपुरी खायला काय हरकत आहे ? एक अशी दहीबटाटापुरी की जी काऊंटरवर मावशी बनवत असतांना तिच्यावर आपले मन गेलेले असते.

मधेच कोणातरी सांगते की " येथे ब्रेड रोल अतिशय टेस्टी मिळतात "
मग काय ब्रेड रोलची ऑडर दिली जाते.परत ते बनवेबनवे पर्यंत धीर धरवला जात नाही, दही वडॆ , गरमागरम साबुदाणा खिचडी, आपली थोडीशीच, जराशीच , उगीच नावाला खाल्ले जाते.

मग समोर येतात ते राजेशाही थाटात "ब्रेड रोल " मस्तपैकी वर चिंचेच्या चटणीचा साज लेवुन व त्या सोबत दह्याची एक वाटी, दही खोबरे, आलं वगैरे घातलेले.

हे सारे सारे खावुन देखिल जी मिसळीची चव तोंडात, मनात रेंगाळत राहीलेली असते ती परतपरत खावीशी वाटत असते, त्या मिसळीसाठी तुडुंब , आकंठ भरलेल्या पोटात , पोतंच जणु, हलवुन हलवुन भरण्यासाठी जागा तयार केली जाते.

राजेशभाई, आतातरी समाधान माना.

पण नाही, मुलानी मागवलेल्या रोज मिल्क शेक मधे जीव अडकलेला असतो.

श्रीमती उपलेकर यांचे "फास्ट फुड ".
फलटण.अन्नदाता सुखी भव

2 comments:

Chaitanya Rudrabhate said...

not uparkar this is uplekar fast food

HAREKRISHNAJI said...

चुकीबद्द्ल मी दिलगीरी व्यक्‍त करतो. नावात काहीतरी चुकले आहे असे जाणवत होतेच.

फलटण खुप, खुप आवडले, मला आणि माझ्या बायकोला देखिल. अजुन दोन चार दिवस रहायला पाहिजे होते.