Saturday, January 15, 2011

आधीच मर्कट तशात मद्य प्याला

आपल्या संस्थेत अन्न महोत्सव आहे याची खबर भाच्याने मामाला देण्याआधीच अन्नावर डोमकावळ्यासारखी नजर ठेवलेल्या त्याच्या मामाला अगोदरच लागली होती.


"मामा तु येथे उभा रहा, मी खायला आणतो "
मग काय मामा ठाण मांडुन खिंड लढवायला तयार.








पावभाजी, काथी रोल, बर्गर, पिझ्झा, स्टॉबेरी क्रश विथ कोक, आणि आणखीन काहीतरी. काय काय खाल्ले , किती खाल्ले कशा कशाची म्हणुन आठवण ठेवायची.
 
हे असे महोत्सव म्हणजे राजाभाऊंची पर्वणीच.
 
या तरुण, उत्साही, शेफची कला बघुन खुब मजा येते. ज्या आनंदात ते सारे खाणे बनवत असतात त्याचे खुप कौतुक वाटते.
बनवणाऱ्याने बनवत जावे, खाणाऱ्याने ते खात जावे,
खातच रहा , खातच रहा, खातच रहा.
 
अश्याच एका ठिकाणी दरवर्षी भरणारा महोत्सव बंद झाल्याचे त्यांना सर्वात जास्त दुःख झाले.
दादरच्या कॅटरींग कॉलेजमधे होणारा महोत्सव बंद करुन त्यांना काय मिळाले असावे?
 
का पण का खाद्यमहोत्सव त्यांनी बंद केला ?

2 comments:

रोहन... said...

पंत... कधीतरी आम्हास देखील घेऊन चालत जा की... :)

HAREKRISHNAJI said...

how about 20th Jan at Bandra Reclamation