Saturday, January 15, 2011

कधीकधी

काही वेळा.
कधीकधी वाटते एखादे प्रदर्शन बघतांना आपल्या सोबत कोणीतरी असायला हवे होते, अशी व्यक्‍ती असायला हवी होती की ज्याच्याकडॆ आपण आपल्याला झालेला आनंद व्यक्त करु शकलो असतो, वाटुन घेवु शकलो असतो. त्या व्यक्‍तीबरोबर आपल्याला या प्रदर्शनात भावलेले, उमजलेले, सापडलेले, आवडलेले, समजलेले सारे सारे काही मनमुराद बोलु शकलो असतो.

 
कधी कधी वाटते बरं झाले हे प्रदर्शन पहातांना आपल्यावरोबर सोबत कोणीही नाही. आपण एकटॆच आहोत.
आपली आणि त्या व्यक्‍तींची आवडनिवड सारखीच असेलच असे नाही किंवा आपल्याला जी उत्सुकता असते त्याच्या उलट ती व्यक्‍ती तेवढीच नाउत्सुक असु शकते. त्याला त्यात काहीच स्वारस्थ नसते.
 
मग अश्या वेळी त्या व्यक्‍तीला कंटाळा आलेला असते, व आपला त्या कंटाळ्यामुळे उत्साह मावळत जात असतो.
 
मग आपण कसेबसे प्रदर्शन पहाणे संपवुन टाकतो, त्याचा आस्वाद न घेता.
 
अनीश कपुरचे प्रदर्शन जबरदस्त आहे.   किती वेळ आणि किती वेळा पाहिले तरी समाधान होणे नाही.

1 comment:

sonal m m said...

aneesh kapoor che kaam nakkich aavadle. pan ajun kahi have hote ase vatat rahile..