Saturday, January 29, 2011

चुलीवर शिजवलेले जेवण

"मला एक सांगा राजाभाऊ , काय हो,  तुम्हाला चुलीवर शिजवलेले जेवण जेवुन किती वर्षे झाली असतील ? दोन वर्षे, पाच वर्षे , दहा वर्षे ? काय आठवतयं का ? "

"अहो राजेशभाई, तुमच्या मनात काय शिजतयं, काय खदखदतय ते एकदाचे स्पष्ट सांगुन टाका, उगीच आपले ताकाला जावुन भांडे लपवणे "

"तसं नव्हे राजाभाऊ, नाही आपलं सांगायचे म्हणजे , त्याच काय , पानशेतच्या अभिरुचीची आठवण होवुन राहिलीय , काय कधी जाण्याचा विचारबिचार असला तर सांगा.

तर अश्या रितीने राजाभाऊ पोचले पानशेतला अभिरुची मधे, चुलीवरचं जेवण जेवायला.

"जेवणात काय काय आहे " राजेशभाईंनी चौकशी केली.

"बाजरीची भाकरी आहे, ज्वारीची भाकरी आहे, भरली वांगी आहेत. पिठले आहे आणि हरभऱ्याची भाजी पण आहे "

" हं, आणखीन काय आहे ? " 

 बटाट्याची भजी, घोसाळ्याची भजी, मिरचीची भजी, लोणचे,  कारळाची चटणी आहे, लसणाची चटणी आहे, सॅल्याड आहे, ताक आहे, गाजर हलवा आणि मिरगुंड देखील आहे "

बर बरं, अजुन काही ?

"आहे ना , वरणभात देखील आहे "  

"अहो , म्हणता काय, वा वा, घ्या ताट घ्या, त्या आधी जरा घसा ओला करायला काय कोकमबिकम सरबत वगैरे मिळेल काय " 

भरपेट समाधान केवळ शंभर रुपयात. 

No comments: