Monday, January 31, 2011

ज्यांचे नातेवाईक शिख असतात ते

ज्यांचे नातेवाईक शिख असतात ते त्यांच्या घरच्या लग्नात सरसो का साग, मक्का दी रोटी व अमृतसरी कुलच्यांवर ताव मारतात.



Sunday, January 30, 2011

नो नो नो नो

नाही, ही व्हिंटेज हातगाडी  नाही.

व्हिंटॆज कार रॅली - मुंबई.

सुंदर, सुंदर, काय फिगर आहे, काय दिसते आहे, मार डाला. या अल्ला. ऐसी खुबसुरुती कभी देखी नही. काय दिसते आहे. जरा तिला टच करुन बघु काय ? तिच्यावर कौतुकाने हात फिरवुन बघु काय ? नकोच , आपल्या बोटाचे ठसे तिच्या अंगावर उमटुन तिच्या सौदर्यात बाधा याली तर ?

राजाभाऊ अंमळ उशीराच आज झोपेतुन जागे झाले. उठल्याउठल्या आहेत तश्याच अवस्थेत पळत सुटले.  सुरु होईल, सुरु झाली असेल, बघायला मिळतील की नाही ?


हं. पोचले एकदाचे वेळात. पण उशीरा पोचल्याने एक तोटा झाला. फोटो काढण्याच्या नादात गाड्यांचे सौदर्यपान करता आले नाही.

श्रीमाया

रात्रीचे साडेबारा एक, दिड वाजले असावेत. भोपाळ वरुन इन्दौरला पोचायला तसा उशीरच झालेला. वाटेत फारसे कुठे खाणे झालेच नव्हते. भुकेले पोट पण मन उत्साही. येथे येण्यासाठी जो जीव आतुरला होता कदाचीत त्यामुळे भुक जाणवली नसेल.

हॉटेलच्या स्वागतकक्षात अचानक जाणवले आणि बोलुन दाखवले, आज आपण उपाशी आहोत ते.

वरती खोलीत पोचतोनपोचतो तोच पाठोपाठ गरमागरम दुध व व्हे. तसेच चीज सॅंडवीचीस हजर.  त्याक्षणीच श्रीमायाने मन जिंकले. मग त्यांची मिळालेली सर्वात चांगली प्रशस्थ खोली, दरोरोज त्यांच्या चविष्ट जेवणावर मारलेला ताव.  गच्चीत उभ राहिले की खालच्या लॉनवर चाललेल्या लग्नसोहळ्यांचे ( आणि कशाकशाचे ? ) अवलोकन.
जेवण जेवावे तर ते श्रीमायामधेच.

वीस वर्षानंतर ही आठवण ताजीतवानी .

इन्दौरला घर झाले तरी दिवसाआडची श्रीमायाची फेरी चुकायचे मात्र नाही, मग घराजवळ ए. बी. रोडवर ची त्यांची शाखा असो की राएनटी रस्तावराचे. 

श्रीमाया. 

Saturday, January 29, 2011

ताई काय करतेस ?

जब जब फुल खिले तुझे याद किया हमने

मिलनके है लाख बहाने, लेकीन मन का मित ना माने
दिल तोडा हर बार मेरे भोले हमदमने ॥

जब जब फुल खिले तुझे याद किया हमने. - तलत, लता.


प्राण कंठाशी येणॆ किंवा अती खाणे मसणात जाणॆ.

सराफा. इन्दौर.
प्रत्येक सराफावाले भय्यांच्या हातचे थोडे, थोडे खाण्याचा विचार आणि अट्टाहास, आणि धाडसी साहस.
सराफाच्या प्रवेशद्वारापासुन केलेली सुरवात. शेवट भल्यामोठ्या जिलेबीने केलेला. भुट्टे का किस वर मन जरा जास्तच रेंगाळलेले.

हिंग, पोटात घेणे, पोटावर लावणं, लिंबुसरबत आल्याचा रस घालुन. सोड्याचा मारा.
गडाबडा लोळणॆ. जीव घाबराघुबरा होणे, प्रचंड महाप्रचंड पोटात वेदना. असह्य कळा.

खोबऱ्याच्या कचोऱ्यांवर जरा कमी ताव मारला असता तर ? गराडु खाणॆ पुढच्या वेळीसाठी राखुन ठेवले असते तर ? वाटॆत कोठारी जवळ जरासी साबुदाणा खिचडी चाखुन पाहिली नसती तर ?

देवा , अरे देवा, नाही सहन होत नाही.

देवा, आजची रात्र पार पडो, उद्याला "मधुरम" मधे गुलकंदवाली कतरी खायला नाही जाणार.

छप्पन,, मधुरम. दुकानात जेवढ्या बरफी आहेत त्यांचातला प्रत्येकी एकएक पीस खाण्याचा विचार. अटटाहास. आणि साहसी धाडस.

भान

जमनादास भय्या. कोठारी मार्केट. इन्दौर. महेश्वरी साडी.
हौशेने घेतलेली. छान , मस्त साडी. खुप आवडलेली. बढीया.
त्यात महेश्वर, महेश्वरी साडीत मन गुंतलेले. त्याविषयी वाटणारे ममत्व.

पण.

आपण साडी कोणासाठी घेत आहे, मग ही साडी आवडेल का ?

याचे भान नसणे.

अश्या वेळी.

साडीचा शेवट ठरलेला. 

आणखी जळवणुक

ज्याचा भाचा कॅटरींग कॉलेजमधे जातो   तो मामा किती खुषनशिब.





आणि हो, तो कांदाभजी करतांना त्यात थोडा रवा मिसळतो.

आता कांदा भजे खावी का डालपकवान ?

चुलीवर शिजवलेले जेवण

"मला एक सांगा राजाभाऊ , काय हो,  तुम्हाला चुलीवर शिजवलेले जेवण जेवुन किती वर्षे झाली असतील ? दोन वर्षे, पाच वर्षे , दहा वर्षे ? काय आठवतयं का ? "

"अहो राजेशभाई, तुमच्या मनात काय शिजतयं, काय खदखदतय ते एकदाचे स्पष्ट सांगुन टाका, उगीच आपले ताकाला जावुन भांडे लपवणे "

"तसं नव्हे राजाभाऊ, नाही आपलं सांगायचे म्हणजे , त्याच काय , पानशेतच्या अभिरुचीची आठवण होवुन राहिलीय , काय कधी जाण्याचा विचारबिचार असला तर सांगा.

तर अश्या रितीने राजाभाऊ पोचले पानशेतला अभिरुची मधे, चुलीवरचं जेवण जेवायला.

"जेवणात काय काय आहे " राजेशभाईंनी चौकशी केली.

"बाजरीची भाकरी आहे, ज्वारीची भाकरी आहे, भरली वांगी आहेत. पिठले आहे आणि हरभऱ्याची भाजी पण आहे "

" हं, आणखीन काय आहे ? " 

 बटाट्याची भजी, घोसाळ्याची भजी, मिरचीची भजी, लोणचे,  कारळाची चटणी आहे, लसणाची चटणी आहे, सॅल्याड आहे, ताक आहे, गाजर हलवा आणि मिरगुंड देखील आहे "

बर बरं, अजुन काही ?

"आहे ना , वरणभात देखील आहे "  

"अहो , म्हणता काय, वा वा, घ्या ताट घ्या, त्या आधी जरा घसा ओला करायला काय कोकमबिकम सरबत वगैरे मिळेल काय " 

भरपेट समाधान केवळ शंभर रुपयात. 

Wednesday, January 26, 2011

चल तुला आज मस्त गंमत दाखवतो

राजाभाऊ आपल्या पुतणीला म्हणाले, "चल तुला आज मस्त गंमत दाखवतो. "

आणि

ते आपल्या पुतणीला घेवुन प्रजासत्ताक दिना निमित्ते शासकीय इमारतीवर केलेली विद्‍युत रोषणाई दाखवायला घेवुन गेले.






लहानपणापासुन २६ जानेवारीच्या रात्री हा राजाभाऊंचा ठरलेला कार्यक्रम.  त्यात बदल नाही.

पलासटीक के जमाने मे

Tuesday, January 25, 2011

हुरड्‍याचे थालीपीठ आणि लालच तुझेच नाव मासवडी

दिवस चवथा, भेट पहिली, महालक्ष्मी सरस, वांद्रे रेक्लेमेशन, मुंबई.




धडा क्रमांक एक . 

सोबत आपल्याच बायकोला घेवुन अश्या ठिकाणी कधीही जावु नये. एकटॆच जावे.

तोंड मोकाट सुटलेल्या आपल्या नवऱ्याची मुस्कटदाबी करणे , त्याला वेसण घालणे  ह्याच्याच कडे त्यांचे बारकाईने लक्ष. नाही स्वःत तबीयतीने खाणार,  नाही हे सारे खाण्याचे पदार्थ बघुन वेडापिसा झालेल्या आपल्या नवऱ्याला कशावर ताव मारु देणार. आता फक्‍त सहा उकडीचे मोदक करायला सांगितले हा काय त्या बापुड्‍या नवऱ्याचा गुन्हा का झाला ? केवढ्‍या आपुलकीने त्या देवरुखवरुन आलेल्या बायकांनी राजाभाऊंसाठी परत उकडीचे मोदक करायला घेतले होते. 

आजच्या खाद्ययात्रेची सुरवात झाली ती आवळा व मावा पुरणपोळीने. खानदेशी मांडॆ पुरणपोळी अजिबात नही आवडली, बहुदा अर्धीकच्चीच असावी. आज नवऱ्याच्या खाण्यावर कंट्रोल ठेवु पहाणारी बायको साथ असल्यामुळे एकच तांदळाची  भाकरी भरल्या वांग्याबरोबर खायला मिळाली, नाचणीच्या भाकरीला नकार द्यावा लागला. असा नकार देणे म्हणजे किती कर्मकठीण काम ! 






आज सर्वात जास्त आवडलेल्या पदार्थ म्हणजे "हुरड्‍याचे थालीपीठ, मस्त. एवढे आवडले एवढे आवडले की बोलायची सोय नाही. वटारलेल्या डोळ्याकडे बघुन मग एकावरच समाधान मानावे लागले, अर्थात त्या बाईंना परत परवाला हे खायला येतो असा हळुच वायदा करत.

कधी कधी माफक प्रमाणात अगदीच माफक प्रमाणात बंड करायला मजा येते. बाहेर पडतापडता मासवडीने व त्या सोबत मिळणाऱ्या चमचमीत आमटीने लक्ष वेधुन घेतले. हा क्षण महत्वाचा, तो सोडु नकोस, राजाभाऊ, मासवडी खाल्लाशिवाय आजची खाद्ययात्रा संपवु नकोस, राजेशभाई तुम्हाला माझी कसम. 

लालच बोलली.   

लालचेला कधीतरी शरण जावे.

Monday, January 24, 2011

प्रश्न पडला आहे

प्रश्न पडला आहे

उद्याला कोकण महोत्सवाला जायचे आणि परवाला "महालक्ष्मी सरस" की परवाला कोकण महोत्सवाला ?

येथे गेल्यानंतर काय खायचे, काय काय खायचे या बाबत मात्र  मनात संभ्रम नाही.

उकडीचे मोदक, पुरणपोळी , घावनं,  जमलच तर काळ्या वटण्याची उसळ व वडॆ तर नक्कीच नक्की.

यात्रा

यात्रा म्हटली की पोटात गोळा येतो.

चेंगराचेंगरी होवुन तरी माणसे मरतात नाहीतर उन्मादाने तरी.

आजचा लोकसत्ता

आजचा लोकसत्ता

बातम्या वाचायला फक्‍त पाच मिनिटे पुरली.

जाहिराती बघायला मात्र एक तास लागला.

Saturday, January 22, 2011

नको. जो पर्यंत शरीरात बळ आहे तो पर्यंत .....

पुष्प प्रदर्शन - एम्प्रेस गार्डन, पुणे.

या ठिकाणी ज्या रीतीने फुलांची सजावट केली होती, जी आकर्षक मांडणी केली होती तिला तोड नाही. जबरदस्त. बहार आली.



दुर्दैवाने राजाभाऊंकडे हे सारे सारे पहाण्यासाठी समय बहुत थोडा होता.

चित्रकार , चित्र आणि निसर्ग



फारच वाईट, काटेरी बंदोबस्त.


काम एकच

राजाने आपल्या तीन मुलींना विचारले, तुम्ही कोणाचे अन्न खात आहेत ? चाणक्ष दोघी मुलींनी उत्तर दिले,
"बाबा आम्ही तुमचे अन्न खात आहोत "
राजा खुष.

धाकटीने उत्तर दिले " मी माझ्या नशिबाने अन्न खात आहे " संतापलेल्या राजाने तिला राज्याबाहेर हाकलुन दिले.

तर हे असे नशिब.

मग ते अन्न असु दे की काम.
प्रत्येक जण आपापल्या नशिबानुसार काम करत असावा काय ?

काम एकच .
परात बांधणे, परांची बांधणे.

एकाचे काम आरामाचे, बिनधोक्याचे. फारचे कष्ट न करण्याचे.

तर दुसऱ्यांचे ?
 



स्पाईस किचन , मॅरीयट्स पुणे

सकाळ झाली तशी राजाभाऊंची बायको तणतणायला लागली.
"एक दिवस पण ना जरा. तुझ्याबरोबर एम्प्रेस गार्डन मधे फुलांचे प्रदर्शन बघायला जायचे, परत घरी येवुन जेवण करायचे, तुला काय, तुझे काय ? ."
झाली. सी ९० टेप सुरु झाली.

"अग पण मी काय म्हणतो जरा ऐकुन तरी घेशील का " लढाई सुरु होण्याआधीच पराभव पत्करणे केव्हाही चांगले.
"मला काहीही ऐकायचे नाही सांगीतले ना "
नाटक जरा ताणुन धरायला पाहिजे ना.

"अग आपण प्रदर्शन बघु, कितीतरी वर्षे झाली पाहायच पाहायच करत राहुन जातयं, आणि मग बाहेर जेवायला जावु, आशा डायनींग मधे "

खरं तर राजाभाऊंच्या मनात काहीतरी वेगळॆच होते.

मग राजाभाऊंची दुसरी खडाजंगी त्यांच्या मुलाबरोबर झाली. "बाबा, मी अजिबात आशा मधे येणार नाही, दुसरी कडे कुठेही चल " जराशा वादावादीनंतर मग "इंडस किचन " मधे जेवायला जाण्याची तडजोड करण्यात आली.
खरं तर राजाभाऊंच्या मनात काहीतरी वेगळॆच होते.
आधीच त्या जागेचे नाव सांगीतले असते तर आपल्या नवऱ्याच्या, आपल्या बापाने सांगीतलेल्या प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची सवय झालेल्यांनी ते ऐंकले नसते.

खर तर राजाभाऊंच्या मनात सेनापती बापट रोड वर सुरु झालेल्या " मॅरीयटस " मधे ते सुरु झालेल्या पहिल्या दिवसापासुन जेवायला जाण्याची फार फार इच्छा होती, त्यात परत त्यांच्याकडॆ आलेल्या भाच्याला, जो त्यांना नेहमी चांगलेसुरखे खायला घालतो त्याला ही घेवुन चांगल्या ठिकाणी जायचे होते.

पण सरळ "मॅरीयट्स" ला जाणे नाही. इंडस किचन मधे सर्वांना घेवुन जाणॆ, तेथील बुफेचा वाढलेला दर ऐकल्यानंतर मग हळुच पण या पेक्षा मग मॅरीयटस चांगले" करत तेथे घेवुन जाणे, मनाशी योजील्याप्रमाणॆ सारे कसे पार पाडले.

मॅरीयट्स.

एक सुखद अनुभव. एक स्वादिष्ट अनुभव.
आत "स्पाईस किचन " मधे शिरल्या शिरल्या राजाभाऊंची तबीयत येकदम फाईन होवुन गेली, पदार्थ, पदार्थ म्ह्णावे तर किती पदार्थ ? ओरीयटंल म्हणा, इटालीयन म्हणा, अमेरीकन म्हणा, मोघलाई पध्दतीचे म्हणा, जे हवे ते जसे हवे तसेच, अगदी तश्शेच किती प्रकार, हे सारे नुसते चाखायचे म्हटले तरी. माणसाला दोन पोटं असती तर किती बरे झाले असते.

जेवण खुप चांगले होते, आणि त्यांचे आतिथ्य , त्याला तोड नाही.
राजाभाऊंनी एवढे खाल्ले एवढे खाल्ले की आपले वजनदार शरीर त्यांच्याचाने हलवेना, अगदी ताटातील जेवण तोडात जाण्यासाठी जे श्रम करावयास लागतात ते देखिल त्यांना होईना. मग त्यांनी आपल्या बायकोला चमच्याने श्रीखंड भरवायला लावले, एक वाटी, दोन वाट्या, तीन वाट्या, ओरपणे , ओरपणे म्हणजे किती.

शेवटी एक घास श्रीखंडाचा, एक घास काला जामुनचा, एक घास अ‍ॅपल स्टुडल खात जेवणाचा शेवट या पैकी नक्की कशानी करायचा हा निर्णय न घेता आल्यामुळे, तो विचार तसाच अधांतरी ठेवुन ते ताटावरुन उठले.

आता पुढची भेट " शाकाहारी " मधे . त्यांच्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी.

Wednesday, January 19, 2011

तो मी नव्हे

कोणीतरी त्यात्यांच्या बॉगवर टाकलेल्या कॉमेंटस.

तात्या म्हणजे हरेकृष्णाजी नव्हेत आणि तात्या म्हणजे राजाभाऊ देखील नव्हेत
"तात्या, चक्क तुम्ही माझ्या ब्लॉगचे फोलोअर झाला आहात? माझा काही क्षण विश्वासच बसेना. हरेकृष्णाजी तुम्ही आहात हे वाचून आनंद झाला.
असो.
खरे तर मीच तुम्हांला फॉलो करायला हवे आहे. तुमचं लेखन मला आवडतंच. शिवाय मिपावर माझा जीव जडलाय. तेथेही आपले लेख वाचावयास मिळतात.
अच्छा. आता गट्टी जमलीच आहे तेव्हा भट्टीही नक्कीच जमेल...






तात्या, तुम्ही माझ्या ब्लॉगचे फॉलोअर झालात? खरे तर मीच तुम्हांला फॉलो करायला हवे. तुम्ही गुरु आहात अन् मी चेला! मिपावर माझा जीव जडलाय. तिथे तुमचे लेखन वाचावयास मिळतेच. 'हरेकृष्णाजी' तुम्ही आहात हे पाहून खूप आनंद झाला.
असो.
गट्टी जमेलच, अन् भट्टीही!
तुमचा लेखन प्रपंच खूप मोठ्ठा आहे जरा सवड काढूनच वाचवा लागणार आहे.
ललीमावशी मिपावर वाचावयास मिळाली. लेखन आवडलं.
पुढील लिखाणाची आतुरतेने वाट पाहत आहे..."

भ्रष्टाचार, महागाई विरुद्ध महासंग्राम.

भ्रष्टाचार, महागाई विरुद्ध महासंग्राम.

लढ्यास शेकडो, लाखो माणसं जमली होती म्हणे.

काय हो राजेशभाई, ह्या महंगाईच्या जमान्यात ही सारी मंडळी खेडोपाड्‍यातुन, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन आपले पदरचे पैसे खर्च करुन आले असावेत का?  

एक सुंदर वास्तु

Posted by Picasa

५४ वे स्वामी हरिदास संगीत संमेलन

Tuesday, January 18, 2011

आजचा सवाल

आजचा सवाल.
देशभर आर्थिक घोटाळे झाले नसते, होत नसते तर आय बी एन लोकमत वर श्री. निखील वागळेंनी "आजचा सवाल " कशावर केला असता ? 

प्रश्न पडला आहे


प्रश्न पडला आहे. तरुण वयात माणसं संन्यास का घेत असावे ?

मोबाईल का जमाना है.

मोबाईल का जमाना है. धावतांना पण मोबाईल हातातुन सुटत नाही.

काय वेळ आली आहे.

काय वेळ आली आहे. चियर्स गल्संनाचाच चियर्स करावे लागते आहे.

तांत्रिक बिघाडामुळे धांगडधिंग गाणी बंद पडली , आरामच आराम