Tuesday, May 17, 2011

आक्रोश.

आक्रोश राजाभाऊंनी कितीही केला तरी तो काही प्रियदर्शनच्या कानी पडणार आहे का ? 

आता आपल्यावर "मिसीसीपी बर्नींग " ची उघड उघड सेम टु सेम सीन चोरत त्याची भ्रष्ट हिंदी आवृती काढुन चौर्यकर्म केल्याचे आरोप कोणी करु नये केवळ ह्याच साठी , ह्याच साठी केवळ मग इतर चित्रपटातील दोन चार दृष्य कॉपी करावी लागली असली तर त्यात प्रियदर्शनचा काय दोष ? आणि मग दोषारोप टाळण्यासाठी हिंदी खिचडी पकवावी लागली  त्यात काय मोठेसे ? 

ह्या अश्या चित्रपटांच्या वाऱ्यालाही न फिरकणारे का कोण जाणे , प्रियदर्शनचे नाव वाचल्यानंतर किंवा आपल्या "त्या" तिला बघुन प्रियदर्शन चित्रपट पहायला बसले. बसले तर बसले सबंध, आख्खा चित्रपट पहाण्याचे धाडसही आयुष्यात पहिल्यांदा दाखवत राहीले. 

आपणच आपल्यावर अत्याचार करत मग आक्रोश करण्याची त्यांना फार मोठी हौस आलेली. भोगताहेत आता आपल्या कर्माची फळॆ.

तो गाडीच्या टपावर बसुन जंगलात झाडांवर उड्‍या मारत मारत , कोणत्या चित्रपटात का सीन होता हे काही केल्या लक्षात येत नाहीत.  

हा सीन नक्कीच मिर्चमसाल्यात होता काय ? ह्या घटना नक्की कुठेशी , कोणत्या प्रांतात घडताहेत ? मधेच हा दुसरा प्रांत कुठुन येतो ? 

हा चित्रपट आपल्या बापाला बघायला लावल्याचे प्रायचित्त त्यांच्या चिरंजीवालाही भोगावे लागले. आता पुढे काय होणार ? आता हा कसा वागणार , तो काय करणार हे प्रसंग सुरु होण्याच्या आधीच आपल्या पिताश्रींनी त्याला ऐकवल्यामुळे कंटाळा आला तरी तो सांगायचा कुणाला ?

गुलमोहर

दुर्गाबाई भागवतांनी गुलमोहराचे सौदर्य न्याहाळण्यासाठी एक नवी दृष्टी दिली.

येथे झाडांना तलवारी लागतात. लुटुपुटुची लढाई पोरांची. (गेल्या पिढीतील )



एक जीवन बहरलेले दुसरे वठलेले.




एक छानसा रस्ता राजाभाऊंना त्यांच्या घराकडॆ घेवुन जातो.






Monday, May 16, 2011

पुणॆ - मुंबई , मुंबई ते पुणॆ व्हाया VITS

केव्हा केव्हा का अनेकदाच किंबहुना सदाकाळ आपला नवरा अगदी विचित्र वागत असतो असे राजाभाऊंच्या बायकोचे अगदी अगदी प्रामाणिक मत. आपल्या नवऱ्याच्या ती कानीकपाळी ओरडत राहिली होती, पुण्याच्या         " व्हीटस " मधे जेवायला चल चल करत पण राजाभाऊ काहीकेल्या तिला घेवुन तिथे जेवायला जाता जात नव्हते.
वास्तविक पहाता हे बऱ्यापैकी स्वस्त आहे, त्यात परत एकावर एक बुफे फुकट. (रु. ५९९ ) असे असुन सुद्धा !

अखेरीस आपल्या काकीच्या मदतीला धावुन आली ती त्यांची पुतणी. नेमक्या " व्हीटस " जवळ पोचतोनपोचतो तो तिला कशी काय एवढी भुक लागली ? की काकीनीच तिला उचकवटले ?

पण एक मात्र गडबड होवुन राहीली.

बुफे जेवायला सुरवात केली खरी पण मग लक्षात आले आपल्याला गाडी चालवायची आहे, भरपेट खाऊन चालणार नाही. मग आपला हात आखडता. जेवण चांगले असुन सुद्धा मग राजाभाऊ त्याला न्याय देवु शकले नाही.

नेहमी मुंबई पुणॆ दरम्यानच्या प्रवासात घरी जाण्यापुर्वी कोठे जेवावे / खावे हा प्रश्न पडलेला असायचा, आता कदाचित यापुढे तो पडु नये.

Friday, May 13, 2011

अचानक

अचानक 

अचानक वाचनालयात सेतु माधव पगडींचे "मिर्झा गालीब आणि त्यांच्या गझला " हे पुस्तक हाती लागले. का कोण जाणे परत केव्हातरी वाचु करत बाजुला ठेवलेले. खुप काळ उलटुन गेला परत ते पुस्तक काही सापडलं नाही. रुखरुख मनात भरुन राहिलेली.

अचानक 

अचानक रात्री केव्हा तरी झोपेत आठवलं, सेतु माधव पगडींचे संपुर्ण साहित्य आठ खंडात जे प्रकाशित झाले आहे त्यामधे हे नक्कीच सापडेल.  पाचव्या खंडाचा खजिना हाती आला खरा, पण नेमके त्याच वेळी खिशाला भलेमोठाले भोक पडलेले. 

चावीच्या घड्याळाप्रमाणे आणखी कशाला चावी देता आली असती तर किती बरं झाले असते,  जेवढी हवी तेवढी चावी द्या, हवे तर चालु ठेवा हवे तर बंद करा,  हे मात्र काही अचानक वाटणे नाही. 

कंटाळा आलाय हे मात्र खरे.

Tuesday, May 10, 2011

मृगजळामागे का धावावे ? आणि ते ही " मोक्ष "नंतर

एखादा दिवस असा येतो की त्या दिवशी राजाभाऊंना बायकोच्या माहेरच्या माणसांबद्दल अचानक ममत्व वाटु लागते, ती किती चांगली आहेत याचा साक्षात्कार होवु लागतो.  मग समझावे की नक्कीच राजाभाऊंना साडु किंवा त्यांच्या मोठ्या मेहुणीने (मोठ्या)  किंवा बायकोच्या भाच्याने बाहेर जेवायला नेलेले असावे.

आजच्या रात्रीचे भोजन  "मिराज" मधे. 







Food and service - No comments. 

Monday, May 09, 2011

मोक्ष

शनिवारी रात्री राजाभाऊ अगदी मनापासुन जेवले.
 तबीयत खुष झाली.

ही अशी "मोक्ष" ची पॉश जागा हॉटेल बघीतल्यानंतर ते तसे आत शिरण्यास नाखुषच होते. सोबत माणसे होती भरपुर.  त्यांच्या मुलाने येथेच जेवायचे करुन आग्रह धरला.  (हल्ली पोराचं ऐकावं लागतं )

मग काय. सर्व जण " ३६० " मधे बसलेले उठुन "मोक्ष" मधे गेले.पोरानी त्यांना नेले  ते नेले ,  त्यांच्या पोराला नक्कीच वाटलं असणार झक मारले आणि आपण येथे ह्याला घेवुन आलो.शंभरवेळा तरी राजाभाऊंनी "बरं झाले आपण येथे आलो ते , मजा आली, मला  हे खुप आवडलं  " करत त्या पोराला ज्याम वैताग आणवला. ( हा सारा वयाचा परिणाम )  

"मोक्ष" मिळणे तसे महाकठीण. 

 पण हे वरच्या मजल्यावर मागच्या बाजुला असलेले "मोक्ष" राजाभाऊंना अगदी योगायोगाने सहजपणी सापडले . विक्रोळी, लालबहादुर शास्त्री मार्गावरील "होम टाऊन " मधे ते गेले खरे खरेदी करण्यासाठी  जातात काय नी " मोक्ष" मिळते काय.  दुपारी "आस्वाद" मधे आकंठ भोजन झालेले, तशी जेवणाची इच्छा म्हटलं तर नव्हती. आता काहीतरी खायचंच आहे तर "३६० " मधे खावु करत ते आत शिरलेले.

बसल्याबसल्या राजाभाऊंचे लक्ष बाहेर गेले. काय भानगड आहे बघुया खरं करत ते व त्यांचे चिरंजीव "मोक्ष" मधे शिरले.

नुकतेच सुरु झालेले हे हॉटेल. नवेकोरे. उत्तम सजावट खाण्याची आणि जागेची देखील, सर्वोत्तम खाणे, व त्यावर कडी म्हणजे तेथल्या कर्मचारावर्गांकडुन मिळालेली. पर्सनल टच असलेली अतीउत्तम वागणुक.  सर्वात भावले असेल तर त्यांचे बाहेर गच्चीवर असणारी बसण्याची व्यवस्था. चांदण्याराती कुणीतरी सोबत असावे, गप्पा मारत मारत जेवावे.

जेव्हा राजाभाऊंनी मेन्यु वाचायला सुरवात केली त्यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला, वाटलं आता न जेवता पोट भरते की काय ? महांगाई के जमाने मे ?

ही अशी स्वस्ताई कुठे पाहिली नव्हती हो. जणु पंचतारांकीत असलेल्या ठिकाणी उडप्याचे दर ? यह सरारस नामुमकीन है. कोणीतरी चिमटा काढा रे.

सुरवात केली. चेरी टॉमेटो सुप नी . चला नांदी मस्त रंगली. आता " वर्जीन मेरी " ची काय गरज होती का ? पण नाही राहवल त्यांच्याचाने. 
मग पुढे आले ते "अंगारी आलु " , येथे राजाभाऊंनी एक गंभीर चुक केली. एकच डिश मागवली चौघांमिळुन. त्यांच्या वाट्याला मग काय ते येणार ? याची चव खुप छान होती.  

जेवणात "अंगुरी कोप्ता " व "कलानी पनीर इन भुना ग्रेव्ही " येथे राजाभाऊंचे व त्यांच्या बायकोचे मतभेद झाले, कोणती भाजी जास्त चांगली लागते यावरुन.  आता जीरा राइस व डाल काबीला मागवण्याची काय तस बघायला गेलं तर गरज नव्हती, पण मागवले गेले खरे. उगीचच आपलं प्रत्येकाला पळीभर पळीभर. 

या इथे  सोबत असणाऱ्या मांसाहरी मंडळींची तर काय अगदीच चंगळ झाली. काय काय मागवले आणि किती मागवले व एकंदरीत राजाभाऊंनी आपल्या मेव्हण्याला कितीला नागवले याला सुमार नाही.

एकंदरीत या "मोक्ष" मधे जेवण अगदी आनंददायी झाले. 
बहार आली. 











   


Sunday, May 08, 2011

खडपोलीचे श्री. धनंजय बापट.

जे काही सांगायचे होते ते राजाभाऊंनी श्री.बापटांना आवर्जुन कळवले.

"आज माझ्या डोक्यावरचे ओझे उतरले. मी तुम्हाला बोललो होतो त्या प्रमाणे मी केले असते " 
श्री. बापटांनी उत्तर दिले.

आयुष्यात काहींशी परीचय आपला अगदी अल्पावधी काळासाठी झालेला असतो, पण तो कायमचा स्मरणात रहातो. पुन्हा त्यांची आपली गाठभेट झालेली नसते, त्यांचा आणि आपला साधा संपर्कही तुटलेला असतो.

पेडांब्याला एका स्नेह्यांची घरी राजाभाऊ गेलेले.
कोकणात शेकडा दराने आंबे मिळतात असे ऐकलेले.
श्री. बापटांकडे ते अनुभवले.

एकेक आंबा एकदम चोख. बावन्नकशी सोने. 
चव अजुन रेंगाळालेली. मनात आणि तोंडात. किती वर्षे लोटली असतील त्याला ?
दरवर्षी निदान आंब्यांसाठी का होईना पण या परिसरात जाण्याचा विचार अंमलात कधीच न आलेला.

"एकही आंबा जरी लासा निघाला तर मी तुमचे संपुर्ण पैसे परत करीन "

प्रत्येक आंबा जणु अमृत.

दरवर्षी श्री. बापट व त्यांच्याकडच्या आंब्याची हटकुन आठवण होतेच होते.

ऐसा गंधर्व पुन्हा होणे नाही

बालगंधर्व.

बालगंधर्वांविषयी वाचले होते, त्याचे ध्वनीमुद्रीत गाणे ऐकलेही आहे.
आज त्यांना पाहिले.

गिरगाव, मुंबई, मराठी माणसांचे उरलेसुरलेले संस्थान.
सेंट्रल सिनेमा.

राजाभाऊंना वाटलंच कसं , आयत्या वेळी आपण जावु, तिकीट हवी तेवढी मिळतील ?

पुढच्या रांगेतले का होईना पण मिळाले.

सेंट्रल सिनेमा.

"बालगंधर्व" चा तीन वाजताचा खेळ.

आधीचा चित्रपट तीन वाजुन गेले तरी सुरुच.  प्रतिक्षेनंतर आत प्रवेश. ते ही फक्‍त एक दार उघडुन,

२० - २५ %  बालगंधर्वांचे चहाते आत शिरतात न शिरतात तो चित्रपट सुरु केलेला.

मग पहिले गाणे परत, सुरवात परत.
अडाण्याचा कारभार सारा.

ता.क.

राजाभाऊंचा मुलाला कळले आपले आईवडील बालगंधर्वला गेले आहेत. विचार करतोय हे पुण्याला गेले कधी आणि बालगंधर्वात चित्रपट दाखवतात का ?

आस्वाद मधे चवीचवीने

तर अश्या रितीने राजाभाऊ "आस्वाद " मधे पोचले.

दुपारचे तीन वाजलेले. सणसणीत ऊन.
अंगाची काहीली काहीली झालेली.
बाहेर आग ओकणाऱ्या सुर्यानी पेटवलेला वणवा आणि पोटातील वडवानल.
जालीम उपाय.

आंबाडाळ आणि कैरीचे पन्हे.


पन्हं अजुन एक.


राजाभाऊंच्या बायकोनी मागवली " आमरस व पुरी "
आमरस व पुरी.
जी राजाभाऊंनीच फस्त केली.


आकंठ आणि तुडुंब भरण्यासाठी मग पोळा उसळ. चटकदार मटकदार.

आणि हो , त्या आधी त्यांच्या दुकानात खाल्लेले दोन उकडीचे मोदक, चारपाच आंबावड्या व आलेपाक.


पंचवीस वर्षापुर्वी लहान जागेत सुरु झालेले आस्वाद आता 



आस्वाद म्हणे.

अरे गड्या आपले "आस्वाद" च बरे

जाहिरात वाचल्यापासुन गेले दोनचार दिवस राजाभाऊंचा एकच घोशा लागला होता.
" जायचयं मला चांदीच्या ताटात जेवायला जायचयं "
मग ते सहकुटुंब सहपरिवार भोजन करायला गेले.
बेत मोठा खासा. 
आणि मग "बालगंधर्व"

गेले खरे.

राजाभाऊंचा मुलगा त्यांना दम भरु लागला. 
"काय आहे , कशाला ? त्यापेक्षा मोठ्या कोणत्यातरी हॉटेल मधे बुफे ला जावु ?
राजाभाऊंची बायको त्यांना सांगु लागली.
"अरे आपले आस्वादच बरे "
राजाभाऊ म्हणु लागले.
आपली अजुन तीनशे रुपये देवुन मराठमोळी थाळी खाण्याची मानसीकता बनलेली नाही.  आधीच जागा लहान त्याच ही गर्दी ? परत थाळीकडे पाहिल्यानंतर ती त्यांना फारशी भुरळ घालु शकली नाही.

काही काही जागा, काही माणसे , त्यांच्याशी आपले नाही जमत, काही सबळ कारण असतेच, असेल असे नाही, पण नाही जुळुन येत. 

मग राजाभाऊ "आस्वाद " मधे जेवायला गेले.

गोल्डन ज्युबली

काय हो , राजभाऊ "गोल्डन ज्युबली , गोल्डन ज्युबली " म्हणजे काय हो ?

50 Years - 1961 -2011

अहो राजाभाऊ

पन्नास वर्षे पुर्ण, सुवर्ण महोत्सव. बरं का.




कोणाला ? मील ला ?

ती तर केव्हाचीच जमीनदोस्त झालीयं, मराठी माणसांना मातीत घालुन.

Saturday, May 07, 2011

तबीयत खुष झाली

आज रात्री "**" मधे जेवल्यानंतर, गेल्यानंतर राजाभाऊंची तबीयत एकदम खुश होवुन गेली.

अश्या कोणत्या जागी राजाभाऊ आज रात्री जेवायला गेले असतील ?

हे ठिकाण बरोबर ओळखणाऱ्यास व न ओळखणाऱ्यांसीं राजाभाऊ या ठिकाणी आपल्या सोबत जेवायला घेवुन जावु इच्छितात.

एक हिंट - या ठिकाणी जाण्यासाठी रात्री राजाभाऊ भांडुप वरुन निघाले.

चांदीच्या ताटात पेशवाई थाटात

एकदा राजाभाऊ पुण्याला कोहीनुरमधे "चांदीच्या ताटात पेशवाई थाटात " भोजन करायला गेले.

या चांदीच्या ताटातल्या भोजनाचा त्यांनी जो धसका घेताला परत काही त्यांची हिम्मत झाली नाही "पेशवाई थाट " करण्याची.

आज " दादर मुंबई २८ " मधे जावुन चांदीच्या ताटात जेवुन राजाभाऊंना त्यांनी घेतलेली ही भीती दुर करायची आहे.

कार्लेकर आंबेवाले. मु.पो. देवगड. खुद्द देवगड.

आले आले आले. 

अखेरीस कार्लेकरांच्या अस्सल देवगडच्या हापुस आंब्याचे मुंबईत विलंबाने का होईना आगमन झाले आणि फक्‍त कार्लेकरांच्या हापुस आंब्या शिवाय इतर आंबे व्यर्जीत मानण्याऱ्या राजाभाऊंच्या पोटाला, जिव्हेला , मनाला त्यांनी सुखावले. 




सौ. कार्लेकर या दिवसात दादरला गोडबोलेंच्या बाजुला दुकानात आंबे विक्री करतात.

गेले कित्येक वर्षे राजाभाऊ केवळ देवगडचेच हापुस खात आले आहेत आणि ते ही फक्‍त कार्लेकरांकडचेच.


हे मॅड मॅड मॅड जग आहे

राजाभाऊंची एक पुतणी सद्ध्या "मॅड  " च्या कार्यशाळेत जातेयं.


आणि ही दुसरी मॅड 



Thursday, May 05, 2011

दादर मुंबई २८.

राजाभाऊ एकदम युसलेस.

 रोज येताजाता "दादर मुंबई २८ " या पत्तावरच्या वास्तुकडे बघतात, पण आत मात्र शिरत नाही.

उद्याला अक्षय तृतियेला भेट द्यायचा त्यांचा विचार होता.

बायकोने नेहमी प्रमाणे मोडता घातला.

Wednesday, May 04, 2011

योको सिझलर्स

"कुठे आहेस ? काय करतो आहेस ? केव्हा येणार ? वाजले किती ? कुठे आहेस ? काय चाललयं ? "

मोबाईलचा वापर केवळ याच सवालांसाठी, बार बार लगातार.

" किती वेळ ? अजुन किती वेळ लागणार आहे ? " 

आता राजाभाऊंना अचानक " योको " मधे जावुन सिझलर्स खाण्याची हुक्की आली, त्याला ते तरी काय करणार "
मुड काय असा सांगुन बनत असतो ? तरी खार येथील "योको" मधे जाण्याचे त्यांनी टाळले. खरंतर राजाभाऊंना खाण्यासाठी " पृथ्वी " मधे जायचे होते कारण त्यांच्या सोबत सर्व "यंग" होते. 

नेहमीप्रमाणॆच बाप सांगेल, बोलेल त्याच्या विरुद्ध करण्याची सवय असलेल्या त्यांच्या मुलाने "पृथ्वी " त जाण्यास नकार दिला. त्याला अजुन माहिती नाही "पृथ्वी " काय चीज आहे. 

राजाभाऊंना त्याचे मन मोडवेना, कुठे जेवायचे , कुठे जेवायचे म्हणता म्हणता भुकेल्या पोटी लिंक रोड वरुन मालाडला जातांना त्यांची नजर लोखंडवाला मधल्या "योको" वर गेली.

किती दिवस झाले योकोत सिझलर्स खाल्ले नव्हते. 

आता परत मुलगा नको बोलतो की काय या विचारात ते पडले.
मग त्यांनी मुलाला योकोच्या बाजुच्या उपहारगृहात जावुया म्हणुन सांगितले.

युक्ती सफल झाली.

या योकोत त्यांना सिझलर्स खुप मस्त मिळाले. 
व्हे. शासलीक सिझलर्स विथ फ्राईड राईस, 
व्हे, सिझलर्स विथ बेकड बिन्स, नुडल्स , गार्लीक.

बायकोची एक सारखी , सतत भ्रमणध्वनी प्रश्नांची फैर.

"कुठे आहेस ? काय करतो आहेस ? केव्हा येणार ? वाजले किती ? कुठे आहेस ? काय चाललयं ? "






"किती तरी दिवस झाले "योको"  मधे सिझलर्स खाल्लेले नाही "
मग नवऱ्याकडे नवी फर्माईश.   

फुकट मिळालेले कधी खावु नये


या दिवसात मुंबई





सध्या मुंबई अनेक रंगांनी रंगुन निघाली आहे. कधी जांभळ्या तर कधी चक्क सफेद.

Sunday, May 01, 2011

वृक्ष आणि गान

आज परत राजाभाऊ राणीच्या बागेत वृक्ष पहायला गेले.

ठाण्याच्या मेधा कारखानीस यांनी हा कार्यक्रम आयोजीत केला होता. दर शनिवार , रविवार ही अशी झाडंची ओळख करुन दिली जाते.

योद्धा त्वेषाने शत्रु वर वार करण्यासाठी तलवारीला हात घालतो आणि ती म्यानातुन बाहेर येवु नये, 

शिकारके  ऐन मौके पर ***.

कॅमेराच्या बॅटऱ्या राजाभाऊंनी चार्ज केल्या खऱ्या पण त्या बॅटऱ्या रिचार्जेबल नव्हत्या हे त्यांना कळलेच नाही. 
कॅमेराचा फुलांवर नेम धरावा आणि शुट होवु नये.
राजाभाऊ, वय झाले आता तुमचे

जन्मभर राणीच्या बागेत जाणे झाले पण येथे झाडे आहेत हे आजच प्रथमच कळले. 
वनी एक नवी दृष्टी मिळाली. आपल्याला अतीपरिचीत असलेल्या फुलांच्याही पलिकडे एक सुंदर श्रुष्टी आहे हे जाणवले.
या राणीच्या बागेत वृक्ष तर न्ह्याहाळणे तर झालेच होते आणि त्यासोबत  ऐकु येत होते ते पाखरांचे गान.
केवळ पक्षांची किलबिलाट  ऐकणॆ झाले नाही तर ते पक्षी पहाणे ही झाले.
अर्थात मेधा कारखानीस यांनी दाखवल्यानंतर.

  

Saturday, April 30, 2011

सागर उपवन - कुलाबा

राजाभाऊंचे ज्ञान या ऋतुत फुलणाऱ्या झाडांमधे फक्त चार पाच झाडांपुरते मर्यादित.

हे काही खरं नव्हे, त्यात ते आज मुंबईमधे होते. मग ते पोचले कुलाब्याच्या सागर उपवनामधे. मेधा कारखानीस यांनी तेथे वृक्षांची ओळख करुन देण्यासाठी कार्यक्रम आयोजीत केलेला.



आता उद्याला सकाळी राणीच्या बागेत फुले बघायला

राजाभाऊंच्या नशिबी

राजाभाऊंच्या नशिबी काय आज आमटीभात खाणे नव्हते.

ऑबेरॉय मॉल मधे दुपारी राजधानीमधे भरपेट भोजन झालेले. 

राजधानीचा त्यांना आलेला निरोप, "आमरस पुरीचा बेत आहे, तेव्हा येणे करावे "
आणि नेमके त्याच वेळी योगायोगाने त्यांच्या माजी सहकाऱ्यांसोबत बाहेर जेवायला जाण्याचा बेत.

पण आजचा दिवस तसं म्हणायला गेलं तर फारसा उत्साही नव्हता.

राजधानीमधे आज जेवण वाढणे फार  वेळखाऊपणाचे झाले होते.
जेवायला सुरवात करण्याच्या वेळी छोट्या छोट्या वाट्यांमधे वाढलेल्या इवल्याशिवल्या भाज्या.
जेवण संपायला आले तरी त्या वाट्यांना आपण परत केव्हा भरल्या जाणार याची वाट  बघायला लागणे, मग अश्या वाट बघणाच्या काळात साऱ्या भोजनाची पुरती वाट. जेवणातील मजा गायब.


एकदा श्री. सिद्धार्थ काक नी लिहिले होते,  " अरे माझ्या घरात उपहारगृह सुरु झाले आहे "
ते  पुर्वी या घरात रहात असत. त्यांच्या जागेत "डायनॅस्टी " आलयं.

राजाभाऊं हे चायनीस जेवणवाले "डायनॅस्टी" काही फार पसंद करत नाहीत,. हे हॉटॆल लोकांच्या आवडीचे. फार लोकप्रिय.

राजाभाऊंच्या मते त्यांना जसं जेवण हवे असते तसं नसतं.
 Fine Dinning experience काही येणॆ नसते,



एकतर येथे खुप गर्दी असते,   प्रतिक्षेचा काळ ् मोठा असतो. 

आज रात्री म्हटलं साधे जेवण जेवावे. आमटीभाता सारखे दुसरे काय असु शकते. पण ते त्यांच्या नशोबी नव्हते.