Sunday, May 16, 2010

जावु तेथे खावु

युसुफ मेहरअली केंद्रात राजाभाऊंना  एक सुखद आणि चविष्ट धक्का बसला.

उत्कृष्ट, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ट , रुचकर जेवण त्यांची वाट बघत थांबले होते, पोचायला जे दुपारचे साडॆतीन वाजलेले.

गरमागरम तांदळ्याच्या मऊसुत भाकऱ्या, त्यांना परमप्रिय असलेली ह्या प्रकारची बटाटा भाजी, मुगाची उसळ, आणि डाळभात, सोबत त्यांनी रिचवले ताकाचे तीन प्याले, आणि वरती कोकमसरबत देखील.







आणि ते ही डेरेदार आम्रवृक्षाच्या सावलीत बसुन जेवणाचा आस्वाद घेतला.



मग त्यांनी केंद्राचा परिसर पाहिला, त्यांचे कार्य जाणुन घेतले आणि त्या तेथे कुटीरोद्योगात बनबलेले साबण विकत घेतले.

No comments: