आमरण उपोषण आणि ते ही कोणाचे ?
या राजाभाऊंचे ? ते ही हुतात्मा चौकात ?
काहीतरीच काय ? कस शक्य आहे ?
हा हुतात्मा चौक कालपरवापर्यंत अनेक चळवळींचा, मोर्च्याचा मुक साक्षीदार राहिलेला आहे. नंतर केव्हा तरी येथे येण्याची बंदी घातली गेली, ते मोर्चे आझाद मैदानापर्यंतच येण्याची परवानगी देण्यात येवु लागली आणि आता बहुदा ती देखील बंद झाली आहे.
आता परत त्यात, ती आंदोलन त्या चळवळीदेखील राहिल्यात कुठे ? अन्यायाविरुद्ध पेटुन उठायचे, चीडेचे दिवस आता नाहिसे झाले आहेत.
८० चे दशक. अनेक चळवळींप्रमाणे विद्यार्थी चळवळ देखील ऐन भरात होती.
मुंबई विद्यापिठाने अन्यायकारक फी वाढ केलेली. (आता चारपाच लाखापासुन मग पुढे कितीतरी लाख पैसे केवळ प्रवेश मिळावा म्हणुन देले जातात . काळ बदललाय )
ही फी वाढ रद्द व्हावी म्हणुन विद्यार्थी संघटनांनी खुप प्रयत्न केले. रद्द मात्र काही ती झाली नाही. मग कधीतरी एक महाप्रचंड ( निदान वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार ) मोर्चा काढण्यात आला.
शिष्टमंडळात असलेल्या राजाभाऊंनी मंत्रीमहोदय कसे गोडगोड, गुळमुळीत, विषयाला सोडुन बोलतात याचा चांगलाच अनुभव घेतला.
नेत्यानी शेवटी अमोघ अस्त्र उगारायचे ठरवले.
प्राणांतीक उपोषण. हुतात्मा चौकात मंडप घातला गेला.
नेत्याचे आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत प्राणांतीक उपोषण व इतरांचे त्यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण.
राजाभाऊ कोणत्या प्रकारच्या उपोषणास बसले असतील ?
No comments:
Post a Comment