Saturday, May 15, 2010

पन्नासीला येवु घातलेला म्हातारा निघाला उन्हाची मजा लुटाया

अनुज्ञा यांच्या http://anujnainmarathi.wordpress.com/ या ब्लॉगवर भल्या पहाटे राजा भाऊंनी एक सुरेख लेख वाचला ,त्याच्या पहिल्या ओळीने आज त्यांच्या दिवसाचा सारा कार्यक्रम बदलुन गेला. 

त्या लिहितात "

करकरीत उन्हाळी दुपार होती….करकरीत ऊन, करकरीत सावल्या, करकरीत चटका अणि करकरीत शांतता…. " 

राजाभाऊंना अचानक वाटु लागले ,

आपल्याला वर्षाॠतुत पाउस लुभावत असतो, शिशिरातील, हेमंतातील थंडी प्रफुल्लीत करुन सोडत असते, तर मग या उन्हाळ्यातच हा आग ओकणारा सुर्य देत असलेला उन्हाचा तडाखा  का बरे मोहवीत नाही ? आणि ते एकटॆच निघाले तप्त वातावरणाची गोडी चाखायला.

बेत ठरला, कर्नाळ्याची जंगलात जरा फेरफटका मारु, वैशाखवणव्यात होरपळुन निघुया.



तापलेल्या डांबरी सडकेवरुन चटके सहन करत घामाच्या धारा वाहवत दमेपर्यंत चालत राहु, फुललेले गुलमोहर पहात जीवाला तोशवु,  ऊन एके ऊन सहन करत रहाता रहता .



तारा येथील युसुफ मेहरअली केंद्राला भेट देवु, आपटा फाट्या वरील द्वारकाधीशाचे देवुळ पाहु आणि मग पुढे पेण ला आपल्या स्नेहांना भेटायला जावु.


किती दिवस आपल्या शरीराचे आपण लाड करत रहाणार ?

उन्हाची मजा लुटायचीच करत ते मुद्दामुन जरा उशीराच निघाले. दुर्दैवाने त्यांना पनवेल वरुन पुढे जाण्यासाठी वहान मिळेना, जवळजवळ दिड-दोन तास ते भर रस्तात, भर उन्हात, उन्हाच तडाख्याला तोंड देत उभे राहिले, जे निसर्गनिर्मीत जंगलात उपभोगायचे होते ते मानवनिर्मीत जंगलात मिळाले,
कारण काय तर .


माणसांचा पुर्वज माकडच असणार हे नक्की.

मग ते मिळेल त्या वहानाने , वहाने बदलत, उशीर झाल्याने जंगलात फिरायचा बेत रहित करुन थेट युसुफ मेहरअली केंद्रात पोचले, उपाशी पोटी.

पनवेल ते तारा - अडीच तास.

No comments: