Saturday, May 22, 2010

भिजकी वही

राजाभाऊंचे पुढचे काही दिवस,
दिवसच बदलुन जाणार आहेत
अरुण कोलटकर जे वाचायला घेतलयं.

कधी चालताचालता, ट्रेनमधल्या गर्दीत बसल्याबसल्या,
उभ्याउभ्याने आपला तोल सावरत आणि इतरांचे धक्क्के सहन करीत,
झपाटुन जायचय
भिजल्या वहीचा लगदा करत.

मॅनहोलमधला माणुस वाचतांना त्यातला अरुण कोलटकरंची भेट झाली, वाचावेसे वाटले.
आज अचानक ध्यानीमनी नसता वाचनालयात समोर कोणीतरी कोलटकरांची एक नव्हे, दोन नव्हे चक्क चार पुस्तके परत केली.

मग काय "भिजकी वही" वाचतोय.

हे दिवस मोठे कठीण होत जाणार आहेत.

कोलटकर आणि त्या सोबत जीएचं "सोनपावले" .


दोघांना पेलवणॆ महाकठीण,

No comments: