रात्री कर्नाळ्याकडुन परततांना सहजच डाव्याबाजुला लक्ष गेले. आकाशात पश्चिम क्षितीजाकडॆ काय सुंदर दृश्य होते, मावळतीला आलेली द्वितीयेची चंद्रकोर आणि ती देखिल स्वगॄही, रोहीणी जवळ, वरती साऱ्या पश्चिमेवर राज्य करणारा तेजस्वी शुक्र, डावीकडॆ ठळक व्याध.
आज पंचमी.
रोहीणीला केव्हाच सोडुन चंद्र पुनर्वसु मधे, स्वर्गाच्या प्रवेशद्वारात बिराजमान झालेला, खालच्या बाजुला तोच अतीतेजस्वी शुक्र, डावीकडला व्याध.
हाय , चंदा गये परदेश, चकोरी यहां रो रो के मरे ।
कैसे जीये कोई बिरहा की मारे ,
आर्तनाद करत रोहीणी आसवे ढाळत असेल काय ?
किती वर्षे झाली असतील आकाशनिरीक्षणाला जावुन ? ही अशी दृश्य पाहिली की जीवाला फार त्रास होतो.
चांदनी रात मुहब्बत मे हसीं थी "फाकीर "
No comments:
Post a Comment