Sunday, May 23, 2010

कल के कलाकार संगीत संमेलन- दिवस दुसरा - एक अविस्मरणीय दिवस.

"माझ्या मुळे काय काय होते त्याची एक लिस्ट करुन ठेव. "

संतापलेल्या राजाभाऊंच्या बायकोने रागाने विचारले.

" आयुष्यभर तेच तेच ऐकुन कंटाळा आलाय मला" ती पुढे म्हणाली. "जेवणं पण करा, तुझ्याबरोबर फिरायला पण चला "

"अग पण, मी काय म्हटलंय का ? मी फक्‍त बोललो, उशीर होतोय, ओडीशी सुरु झालं असेल "

धोरणी राजाभाऊंनी शरणांगती पत्करली. उगीच घुंगरांच्या जागी नुपुर पहाण्याची वेळ न येवो. (संतापलेल्या तिने लत्ताप्रहार करावा व प्रियकराने तो आपल्या हृदयी किंवा मस्तकी धारण करावा असा हा संस्कॄत कादबऱ्यांमधला संकेत )

मनधरणीनी मग ती पाघळली आणि  ते स्थळी वेळेवर पोचले एकापेक्षा एक सरस असे एकंदरीत आठ नॄत्याचे कार्यक्रमाचा आनंद लुटायला, कल के कलाकार संमेलनाला दुसऱ्या दिवशी.

या तरुण आणि प्रचंड गुणी कलवंतांनी केलेला प्रत्येक कार्यक्रम पहाताना वाटतं , आता यापेक्षा अधिक सरस काय ते असु शकेल ? पण तो समज लगेचच खोटा ठरतो, एकापेक्षा एक , तोडीस तोड, निव्वळ अप्रतिम, उत्कृष्ट कार्यक्रम या येथे पहायला मिळतात, आणि ते सादर कोण करतात तर पार अमेरीका, पश्चिम बंगाल, वृदांवन, जगाच्या कानाकोपऱ्यातुन आलेले , उद्या होणारा सोनेरी इतिहास आत्ता ह्या क्षणी येथे रचतांना दिसणारे तरुण. खऱ्या कलेचा आस्वाद लुटायचा असेल तर येथे या संमेलनाला यायला हवे.

काल

दिपाली जीना आणि कल्याणी साहु - ओडीशी - भुबनेश्वर
रुचीका गुप्ता - भरत नाट्यम - नवी दिल्ली
सुनयना राव - कथ्थक - टेक्सास - अमेरीका,
दिपीका पोटारजु - व्हर्जीनेया - अमेरीका - कुचीपुडी
जानकी रंगरजन - चेन्नाई - भरत नाट्यम
श्रीपमा चक्रबोरटी - कथ्थक - चंद्रपुर
कुंजलता मिश्रा - ओडीशी - बृंदाबन
अपर्णा माने आणि श्वेता पडवळ - कथ्थक - मुंबई

No comments: