Friday, May 21, 2010

कल के कलाकार - दिवस पहिला

सुर सिंगार सांसद आयोजीत"कल के कलाकार" नामक संगीत संमेलन मुंबई मधे आज सुरु झाले.


 
आजचा मुहुर्ताच्या दिवशी एकापेक्षा एक सरस कार्यक्रम झाले, सर्वात जास्त आवडले ते त्रिचुर वरुन आलेल्या श्रीलक्श्मी गोवर्धनन यांनी केलेले कुचीपुडी नृत्य.




त्याआधी खास मलेशियावरुन आलेल्या दासग्ना रानी विजयकुमार यांनी आपल्या ओडीशी नृत्याने सर्वांचे मन जिंकुन घेतलेले.





शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम आणि त्यात पुण्याच्या मुली कथ्थक सादर करायला नाहीत असे कधी झालय का ? शितल कपोले आणि अमिरा पाटणकर यांचे कथ्थक, मग काय राजाभाऊ खुश.




या संमेलनची सुरवात कोलकोता वरुन आलेल्या अरुपा लहीरी यांच्या भरतनाट्यमनी झाली.

आज संमेलनची सुरवात मोठ्‍या झोकात जालेली आहे. ज्याची सुरवातच एवढी मस्त ते संमेलन आता पुढील दिवसात किती छान रंगत जाईल.


मुंबईच्या कृष्णा नायक यांच्या मोहिनी अट्ट्म पाहुन मग राजाभाऊ आणि त्यांची बायको निघाले.



पुढील दहा दिवस राजाभाऊंचा मुक्काम पोष्ट मुंबई विद्यापिठ विद्यार्थी भवन, बी रोड, चर्चगेट.

No comments: