Tuesday, May 25, 2010

कल के कलाकार संगीत संमेलन- दिवस पाचवा

येणारा प्रत्येक दिवस हा गेलेल्या दिवसापेक्षा अधिक चांगला, बहारदार का असतो ?  कधी वाटते की आता ह्याच्यापेक्षा जास्त चांगले काय असु शकेल पण तो समज लगेचच खोटा पाडला जातो.  गेले पाच दिवस या इथे जगाच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या तरुण कलावंतानी फार सुंदर,सुंदर, अप्रतिम नृत्य सादर केली. आज या संमेलनातील नृत्यसत्राची सांगता झाली आता उद्या पासुन कंठ व वाद्य संगीत.

आज एक अनोखा नृत्यप्रकार पहायला मिळाला, जो मुंबई-पुण्यामधे फार कमी बघायला मिळतो. इंफाळ वरुन आलेल्या सीनाम बसु सिंग यांनी सादर केलेले मणिपुरी नृत्य. हा कलाकार जबरदस्त ताकदीचा आहे. याचे आपल्याकडॆ आणखीन कार्यक्रम व्हायला हवेत.

आज सुरवातीला अलाहाबाद वरुन आलेल्या पुर्णिमा श्रीवास्तव यांनी केलेले कथ्थक पाहुनच हा दिवस फार बहारदार असणार हे जाणवले होते.  त्यांच्या नंतर मणिपुरी व परत कथ्थक , मुंबईच्या निशी सिंग यांचे.

या कार्यक्रमाची सुरवात कोलकाताच्या अनुपा लहरी यांच्या चित्तवेधक भरतनाट्यमनी झाली होती, ज्याची सुरवातच एवढी जबरदस्त मग त्याच्य शेवटाही तसाच भारदस्त, उत्तम, सर्वोत्तम , सर्वश्रेष्ट व्हायला हवा, हे काम केले ते मुंबईच्या ग्रीश्मा लेले यांच्य भरतनाट्यमनी.

हे सारे कधीच संपु नये असे वाटत होते, पण चांगल्या गोष्टी नेहमीच लवकर संपतात,  त्याच्या सुखद आठवणी मनात रेंगाळत ठेवत.



ता.क. हे फोटो बघता वाटते नवा कॅमेरा घेण्याची वेळ आली आहे.

No comments: