Tuesday, May 04, 2010

किती सोप्प आहे


टेकडीच्या उतारावरील रिकामे बंगलो प्लॉट्स.
खुप गवत माजुन राहिलेले.

गवत कापण्यासाठीचा सर्वात स्वस्त आणि उत्तम उपाय. विनाकष्टाचा. हवी फक्त एक आगपेटीची काडी. भुरकन सारे जळुन खाक. बघताबघता जमीन मोकळी.

मग हा काळ पक्षांच्या वीणीचा हंगाम आहे, असंख्य , असंख्य पक्षी या गवतात, यातल्या झुडपात, लहानसहान झाडात आश्रयाला आहेत, त्यांनी येथे घरटी केली असतील, हा विचार करायचे कारणच काय ?

बिनडोकपणा केव्हाही चांगला.

No comments: