Monday, May 10, 2010

द रॉयल ओर्कीड - Pinxx कल्याणी नगर, पुणे

राजाभाऊंची बायको राजाभाऊंना म्हणाली " पुतणी येवढी आपल्याकडे सुट्टीत रहायला आली आहे आणि तिला तु श्रेयस मधे थाळी खायला नेणार ? "

राजाभाऊंची पुतणी म्हणाली " काका, मला चायनीज आवडते, पण "मेनलॅंड चायना" नको, नुकतीच गेली होती "

राजाभाऊंचा मुलगा म्हणाला " माझी परिक्षा सुरु आहे, मला त्रास देवु नका "

आधीच एक तर भुकेने जीव कळमळत कळमळत तग धरुन रहाण्याचा प्रयत्न करत होता, त्यात ही नाटक.

मग राजाभाऊंना आठवले , छावणी परिसरात असंख्य गुलमोहराची झाडे आहेत, ती आता मस्तपैकी फुलली असतील, कात्रज पार्क मधुन कल्याणी नगर मधे जेवायला जातांना त्यांना न्हाहळता येइल.

द रॉयल ओर्कीड मधल्या Pinxx ह्या कॉफी शॉपमधे बफे जेवायला जाणॆ हे त्यांना फार भावते. आजच्या दिवशी त्यानी सारे रेकॉर्डस मोडायचे ठरवले होते. दुपारी १२.३० च्या सुमारास गेलेले ते जवळजवळ तीन वाजता बाहेर पडले. आज नक्की कशाची तोंडात रेंगाळत रहाणारी चव शेवटी घेवुन जेवणाचा शेवट करायचा याबाबत् त्यांचा निर्णय होईना.

आजच्या मेन्युमधली डाल माखनी व व्हेज. माखनीची चव सॉलीड होती. पण मुख्य जेवणाकडे त्यांचे कधीच फारसे लक्ष नसते. सॅलड, डेजर्ट्स आणि आईस्क्रीम यात राजाभाऊ फार गुंतुन रहातात. 

 

1 comment:

Anand Kale said...

he sagal katyaane khaalaa yaachaa nishedh.. ;-)
aaNi tyaache photo Taakun dusaryaanna traass dilyachaahi