Monday, May 17, 2010

किळस

तुम्ही एखाद्या उपहारगृहात किंवा जेथे  खाद्यपदार्थ मिळतात अश्या दुकानात जाता.

वाढपी, पाण्याचे पेले आणणार, आणि टॆबलावर फडका मारणार हि अशी तिन्ही काम करणारी एकच व्यक्ती असते.

घाणीनी थबथबथलेला , ओथंबलेला, वास मारणारा कळकट फडका घेवुन तो टेबल साफ करतो, तीच बोटे पाण्यात बुडवुन पाण्याचे पेले आणुन देतो, व  साबणाने न धुतलेल्या त्याच हाताने खाद्यपदार्थ बशीत भरुन तुमच्या समोर आणुन ठेवतो.

4 comments:

अनिकेत वैद्य said...

राजाभाऊ,
असे "आरोग्यपुर्ण" खाल्ल्यास आपली प्रतिकारशक्ती वाढते. आपल्या कळत, नकळत अनेक जिवाणू, विषाणू, जंतू पोटात जाऊन आपली प्रतिकारशक्ती वाढवतात.

मन कस्तुरी रे.. said...

तुम्हालाच तर हौस आहे सदा हॊटेलांत जाऊन खायची!

HAREKRISHNAJI said...

अनिकेत,

खर आहे.

अश्विनी,

माझा खाण्यावरचा ताबा साफ सुटला आहे. मी stress-food-obisity-worklevel-stress या vicious circle मधे सापडलो आहे.

प्रयत्न करतोय त्यातुन बाहेर पडण्याचा

मन कस्तुरी रे.. said...

कळतं पण वळत नाही.. असे होऊ देऊ नका.