Thursday, May 13, 2010

दिसामाजी काहीतरी येथ खावे - म्हणोनी राहिले "मी मराठी" मराठमोळी शाकाहरी खाद्यसंस्कॄती

मना सर्व ’सुची’ जरा नीट पाही ।
मना आवडॆ मागवी सर्व काही ॥
पदार्थावरी ताव मारीसी ऐसा ।
चविला तुझ्या आवरी तुची कैसा ।।१॥

भजी, लोणचे, ताक आणि आमटी ।
जरी झाली ऐशा पदार्थांची दाटी ॥
सगळेची केले तुमच्यासाठी ।
मुखाने म्हणावे पहा " मी मराठी "

"मी मराठी " च्या खाद्यबोधातुनी, त्यांच्या खाद्यपदार्थाच्या यादीवरुन. .(वर लिहिलेले  )

विलेपार्लेतील रस्तावरुन राजाभाऊंनी चालत रहावे ।
चालताचालता उघडया नजरेने सर्व टिपीत रहावे ॥
कुठेकाय चांगलेसुरखे खायाला मिळते ते ध्यानी धरावे ।
संधी मिळता तेथे खातची रहावे ॥

" मी मराठी " मधल्या

खाद्यपदार्थांची सुची वाचतावाचता चित्त प्रफुलीत होता जाहले ।
वांग्याच्या भरीतावरी ज्वारी भाकरी संगे ताव मारता जाहले ॥
सोबतीला मिरचीचा ठेचा तोंडी लावत लावत तबीयत खुष होता जाहली ।
राजाभाऊंच्या मनी आता येथे बायकोला घेवुन येण्याची इच्छा भरुनी राहीली ॥

उदरभरण नोहे जाणीजे हे यज्ञकर्म हे जाणुनी रहावे ।

थालीपिठ,भाजणीवडॆ, वांगीपोहे, मऊभात-मेतकुट; कोथींबीर वडी, मटार पॅटीस आणि्क
दाण्याची आमटी, श्रीखंड , पुरणपोळी, डाळींबीउसळ, भरलीवांगी, वांग्याचे भरीत आणि्क
कुळथाचे पिठले, अळूची पातळभाजी, डाळखिचडी, मसालेभात, आणिक
मसुरखिचडी, आमटीभात , झुणकाभाकर , बटाटावडा, मिसळ, कांदाभजी आणि बटाटाभजी

हे सारे अधुन मधुन खाता खाता मनी समाधान धरीत रहावे ॥

"मी मराठी" मराठमोळी शाकाहरी खाद्यसंस्कॄती, पार्लेश्वराच्या मंदिरासमोर असलेले खास मराठीमोळी शाकाहरी खाद्यसंस्कॄती जपण्याऱ्या उपहारगृहास राजाभाऊंनी आज भेट दिली.

मजा आली.

No comments: