असाधारण, अतिशय उत्तम, अ स्टेलर परफॉर्मन्स, ( राजाभाऊंनी सा. सकाळ मधल एन.डी.आपटे यांचा लेख वाचलेला दिसतोय.) असे ज्याचे वर्णन करावेसे वाटते असे तिन कार्यक्रम आज या "कल के कलाकार संगीत संमेलन " मधे चवथ्या दिवशी झाले.
या तिनामधल्या दोघांचे राजाभाऊ साक्षीदार होते, भानुशाली वरुन आलेल्या डॉ.भावना ग्रोव्हर यांचा , कथ्थकचा व दुसरा देखील कथ्थकचा , मुंबईच्या उर्मीला कानेटकरांचा, ज्यांना बहुसंख्य टी.व्ही वर मालिकेत , अनेक मालिकेत बघतात अश्या त्या उर्मिला कानेटकरांचा व एक असा कार्यक्रम , कुचीपुडी नृत्याचा, आदर्शवत किचीपुडीचा, टॆक्सास वरुन आलेल्या प्राणम्या सुरींचा जो राजाभाऊ पोचेपोचेपर्यंत संपुन गेला होता, व ज्या कार्यक्रमाबद्द्ल त्यांच्या जखमेवर मिठ चोळत इतरांने त्याचे भरभरुन वर्णन केले तो.
चैत्राली सेनगुप्ता व हर्षली कर्वे, मुंबई यांनी सादर केलेले भरतनाट्यम बघुन राजाभाऊ निघाले.
त्या आधी कावीळ झालेली असुन सुद्धा केवळ कलेपायी कोलकता वरुन , ओडीशी सादर करायला आलेल्या श्योमिता दासगुप्ता, परत तेथुनच आलेल्या सुपर्णा राव यांचे भरत नाट्यम चेन्नाई वरुन आलेले किरण राजगोपालन यांचे भरत नाट्यम, मुंबईचे रुपक मेहता यांनी केलेले भरतनाट्यम आदी कार्यक्रम झाले.
No comments:
Post a Comment