राजाभाऊंचा सारा कारभार बिनभरवश्याचा, त्यांच्या बोलण्यावर जरा देखील विश्वास ठेवता कामा नये हे त्यांच्या बायकोचे प्रामाणिक मत. ते जे बोलतील तेच करतीलच का याचा नेम नाही.
लग्नाच्या वाढदिवशी राजाभाऊंनी तिला कॉर्टयार्ड मॅरीयट, सयाजी , Sen5es पासुन शबरी, कृष्णा डायनिंग हॉल पर्यंत घरबसल्या नेवुन आणले व शेवटी आपण रहात असलेल्या गृहसंकुलामधल्या "गोडवा" मधे जेवायला नेले.
काय करणार त्यांचा पण नाईलाज होता, "गोडवा" मधे खासा बेत होता.
पुरण पोळी, भरलं वांग, सोबत ज्वारीची गरमागरम भाकरी बटाट्याची सुकी भाजी आणि दही बुत्ती. वर तोंडी लावायला मिक्स भजी.
आयुष्यभर तिने राजाभाऊंनी समजुन व सांभाळुन घेतले , मग यावेळी का नाही ?
No comments:
Post a Comment