Sunday, May 23, 2010

कल के कलाकार संमेलन - दिवस तिसरा


आज राजाभाऊंना वेध लागले होते ते द.कोरीयाच्या कीम जियॉंग ही सादर करणार असलेल्या कथ्थकचे. हो. कथ्थकचे, द. कोरीयाची किम. भारतात राहुन राहिलेली कथ्थक शिकण्याचा ध्यास घेतलेली कीम.




आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरवात कोलकता वरुन आलेल्या कौस्तुवी सरकार व पोंपी पाल यांनी केलेल्या ओडीशी नृत्याने.




आजचा दिवस अधिक सुंदर होता, म्हैसुर वरुन आलेल्या अपर्णा व राधिका अय्यंगर यांनी मग दृष्ट लागेल असे भरतनाट्यम सादर केले.




तिसरा कार्यक्रम होता कीम जियॉंगचा. कथ्थकचा. एक परदेशी तरुणी आपले भारतातील नृत्याचा प्रकार करते हे पहाणे. हे किती काहीतरी वेगळे वाटत होते.

मग मुंबईच्या कृपा पाबरी यांचे ओडीशी नृत्य पाहुन राजाभाऊ , थकलेले राजाभाऊ लवकर निघाले, अंगात जास्त त्राण नव्हते राहिले. हे ऐवढे कार्यक्रम सलगपणे पहाणॆ.



आज बंगळुरु वरुन आलेल्या श्रेया अयुब व पंखुरी अगरवाल यांचे मणीपुरी नृत्य मात्र पहायचे राहुन गेले याची फार चुटपुट लागुन राहिली आहे.

जर राजाभाऊ परीक्षक असते तर मात्र त्यांची मोठी पंचाईत झाली असती. ठरवायचे कसे कोणाला काय द्यायचे ते, सारेच बावनकशी सोने, डावे उजवे करावे कसे आणि का ?


No comments: