नाणे घाटात सातवाहनाच्या काळातले टोल वसुली ची जमा झालेली रक्कम ठेवण्यासाठी असलेले रांजण अजुनही आहेत.
काळ बदलला. २१ वे शतकात त्याने प्रवेश केला. पण टोल वसुलीची संकल्पना किंबहुना पद्धत मात्र आपल्याकडे अजुनही मागासलेलीच राहीली आहे.
या विधानाची खात्री करुन घ्यायची आहे.
रविवारी रात्री घोडबंदर वरुन दहीसर चेकनाका प्रवास करा. १५-२० मिनीटाच्या अंतराला दोन दोन तास कसे लागतात याचा अनुभव घ्या.
जग केव्हाच पुढे निघुन गेले.
आपण हा टोल नक्की कशासाठी देत आहोत ? योग्य कारणासाठी, योग्य रक्कम देत आहोत ना ? आपल्या या प्रवासात नक्की किती ठिकाणी टोल नाके आहेत ? किती वेळा रांगेत टोल भरण्यासाठी ताटकळत उभे राहायचे ? एकाच जागी सारी रक्कम का गोळा केली जात नाही ? या रक्कमेचे नक्की काय होते ? परदेशासारखी वसुलीची पद्धत आपल्या कडे का नाही ? असे फालतु प्रश्न स्वःताला विचारुन उगाचच डोक्याला शीण देवु नकात.
मुकाट्याने वाहतुकीच्या कोंडीतुन बाहेर सुटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत रहा.
या हालात भर पडली आहे ती टोलनाक्याच्या जवळाच असलेल्या मॉल कारणॆ. याला भेट देणाऱ्यांच्या मुळॆ या परिसरात पडलेल्या वाहतुकीच्यावरील अतिरीक्त ताण पडला आहे.
3 comments:
मला या टोल वरुन एक जोक आठवला...की
एक प्रेतयात्रा टोल नाक्या वरुन जात असते गाडी हळुहळु पुढे सरकत टोल खिडकी जवळ येते .येथे ही प्रेताचीगाडी टोल साठी थांबवली जाते.
पण गाडीला लगेचच पुढे जाउ दिले जाते..!!!??
सारे प्रश्न व विस्मय येथे आहे...
खर तर गाडीतला मुडदा ऊठतो अन शंभर रुपये टोल खिडकीवर देतो..
पण सार कन्फ़ुजन....मागे बसलेल्यांना वाटल टॊलचे पैसे गाडी ड्रायव्हरने दिलेत आणि ड्रायव्हरला
वाटले टॊलचे पैसे मागे बसलेल्यांनी दिलेत.
प्रेत स्मशानात येते..!

हे तर टेन्शनचे काम.
परवला आम्ही खुप हैराण झालो या टोल नाक्यामुळे. दिवसभर केलेली सगळी मजा वाया गेली
Post a Comment