प्रिय महापौर,
आपल्या साऱ्या समाज प्रबोधनाच्या स्तुत्य प्रयत्नात आम्ही सारे सुजाण नागरीक आपल्या बरोबर आहोत.
बातमी एक. पण त्यांचा सुर वेगवेगळा. एक सकारात्मक एक नकारात्मक.
महाराष्ट्र टाइम्स -
महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी अचानक चर्चगेट येथील हुक्का पार्लरला भेट दिल्यामुळे आरामात हुक्का ओढत बसलेल्या तरुणांची चांगलीच धावपळ उडाली! शहरात हुक्का पार्लरची संख्या वाढत असून मोठ्या संख्येने तरुणवर्ग अशा पार्लरांकडे आकषिर्त होऊ लागले आहेत. सुरुवातीला स्ट्रॅाबेरी किंवा इतर फ्लेवरचा हुक्का ओढणारी मुले सवयीच्या अधीन झाल्यानंतर आपसुकच तंबाखू भरलेला हुक्का ओढू लागतात. हुक्का पार्लरवर कारवाई करणे पालिकेच्या नव्हे तर, राज्य सरकारच्या अखत्यारीतील बाब आहे. परंतु, हुक्का पार्लरपासून तरुणांनी दूर रहावे या उद्देशाने महापौरांनी शुक्रवारी चर्चगेटच्या मोक्का पार्लरला भेट दिली. त्यांच्यासमेवत उपमहापौर विनोद घेडिया, आरोग्य समितीच्या अध्यक्षा शुभदा गुडेकर व पालिकेच अधिकारी होते. या पार्लरवर कारवाई करण्यासाठी सरकारला विनंती करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
त्या विरुद्ध आजचा लोकसत्ता.
महापौरांची आता हुक्काविरोधी मोहीम
’हुक्काच्या आहारी गेलेल्या तरुणांविषयी महापौर शुभा राउळ यांना चिंता वाटत असून, या व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी तरुण पिढीचे प्रबोधन करण्यासाठी महापौरांनी आज ’हुक्का’ मिळणाऱ्या एका हॉटेलला भेट दिली. मात्र महापौरांच्या या प्रबोधन मोहीमेकडे कोणीही लक्ष न दिल्या मुळे या एकाच हॉटॆलमधून महापौरांनी आपली ’समाज प्रबोधन ’ मोहीम आटोपती घेतली. त्या वेळी हॉटॆलात बऱ्यापैकी गर्दी होती. त्यापैकी काही तरुणांशी बोलण्यचा प्रयत्न महापौरांनी केला, मात्र त्यंच्याशी फारसे कोणी बोलले नाही. महापौरांनी त्यांना ’असे करु नका’ असे आवाहन केले. त्या नंतर महापौरांनी इतर ठिकाणी जाण्याचा बेत रद्द्द केला.
No comments:
Post a Comment