Monday, May 19, 2008

कल के कलाकार संगीत संमेलन- तिसरा दिवस.

देश, प्रांत आदी कोत्या मनोवॄत्तीच्या संकुचीत सीमारेखा येथे धुसर होत जातात, गळुन पडतात, कला आपल्या नाजुक हातानी हे पाश, ही कॄत्रीम बंधने हळुवारपणे दुर सारते, आणि मग श्रीलंकेवरुन आलेली वेरोनीका, कोलकाताचा सौवीक चक्रबोरती, सौरव रॉय, बंगळूर वरुन आलेले हरी व चेतना हे जोडपे, बनासथालील, राजस्थान वरुन आलेली भावना ग्रुव्हर, खडकपुरचा चंदन सिंग, आदी कलावंत, कथ्थक नृत्यशैलीत तर टेक्सास, अमेरीका वरुन आलेली पायल ओडीसीत, पश्चिम बंगाल मधील बरसात या ठिकाणा वरुन आलेला रहुलदेव मोंदल चक्क भरतनाट्यम शैलीत नॄत्य अविष्कार घडवुन आणतात. मुंबई-पुण्याकडच्या कलावंतांबद्द्ल तर काय विचारुन नका, ते तर साऱ्या शैलीत माहेर. त्यातही कथ्थक व भरतनाट्यम खास आवडीचे. (कोणीतरी, आपल्या भावनेच्या भरावर राजकारण करण्याची सवय झालेल्या नेत्यांना या अश्या कार्यक्रमांना जरुन घेवुन येणे ).


कल के कलाकार संगीत संमेलनाचा कालचा तिसरा दिवस. काल एक अनोखा नॄत्यप्रकार पहायला मिळाला. गुहाटीवरुन आलेल्या पल्लबी शर्माने सतरीया नॄत्य सादर केले. त्याची आलेली नशा उतरते न उतरते तोच द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आपल्या ओडीसी नॄत्यात सादर करताना टॆक्सास वरुन आलेल्या पायल मिस्त्री ने बहार आणली. कालच्या सांयंकाळी देबश्रीता सेटी व प्रेमा लहीरी- भुवनेश्वर- ओडीसी, रहुलदेव मोंडाल- पश्चिम बंगाल -भरतनाट्यम, हरी व चेतना - बंगळूर -कथ्थक, भावना गॄव्हर - राजस्थान- कथ्थक, पुरवी भावे व कानेनीका निनावे - मुंबई- भरतनाट्यम आदी कार्यक्रम झाले.


खरी बहार आणली ती श्रीमती मनिषा साठे यांच्या शिष्या इशा देशपांडे, स्वरश्री देव, व मानसी गाडो या तिघींनी सादर केलेल्या कथ्थक नॄत्याने. आपल्या शिष्यांसाठी रंगमंचवर स्वःत उपस्थीत होत्या.

मी कॅमेरा म्यान करुन ठेवला. कलेचा विनापाश आस्वाद घेतांना त्याचा अडसर होतो.
आता प्रतिक्षा आजच्या सायंकाळाची.

No comments: