Wednesday, May 07, 2008

आंबा महोत्सव




सकाळ झाली, मोरुच्या बायकोनी मोरुला हाक मारली. मोरु, लवकर ऊठ, व चटदिशी तयार हो पाहु, आज अक्षय तॄतीया.

होणाऱ्या संभाव्य खर्चाचा अंदाज घेत मोरु डोक्यावर पांघरूण घेवुन झोपेचे सोंग घेवु लागला, मनाशी काहीतरी ठरवत. सोन्याहुन पिवळे, महाग व दुर्लभ्य, दुर्मीळ गोष्ट जी कोणती असेल ती आज आपण आपल्या बायकोसाठी आणुन तिचे दिल जिंकायचे. बस्स ठरले. ठरले म्हणजे ठरले. आता माघार घेणे नाही.

साहेब ले लो, अच्छा क्यालिटीका है ! एक नंबरी. देवगड का है !!

हल्ली बाजारात भैय्यांचा सुळसुळाट झाला आहे. घरोदारी, रस्तावर खोके घेवुन फिरत असतात. रत्नागीरी , अलिबाग, देवगड, आझमगढ, अमरावती, नागपुर, त्यांना काय सर्वच सारखे. नगास नग असल्याचे कारण. असली काय नी नकली काय ? विकत घेणाऱ्यालाही त्यातल्यात्यात समाधान.

अस्सल, सुवासीक, रुचकर, माधुर्ययुक्त, केसरीया आंबा खायचा असेल तर थोडी प्रतिक्षा करायला हवी. फळांच्या राजाला, राजाच्याच रुबाबात, ऐटीत राजासारखे खायचे असेल तर आम्रमहोत्सवाला जावुन देवगडच्या बागाईतगारांकडुन, त्याच्या घरचे कच्चे आंबे खरेदी करुन , आढी लावुन , उतावळेपणा न धरता, ते नैसर्गीकरित्या पिकले गेल्यानंतर मग त्याचा आस्वाद घेण्यावाचुन अजुन दुसरा कोणाताही पर्याय उपलब्ध नाही.

सध्या मुंबईत दिनानाथ दलाल मैदान, पोर्तुगीज चर्च च्या बाजुच्या गल्लीत, दादर येथे येथे आंबा महोत्सव भरला आहे.

दरवर्षी या निम्मीत्ते, आंबा उत्पादक व आपण यांची थेट गाठभेट घालुन देण्याच्या या स्तुत , उत्तम उपक्रमाबद्दल त्यांचे आभार. या कार्याकरीता तरी त्यांचे शहरभर भलेमोठाले बॅनर्स लावण्यास कोणाची ही हरकत नसावी.

2 comments:

Admin said...

Nice post about "Amba"..... I am missing that in US. Do you know where can I get it in Seattle, US
Happy Akshay Tritiya.

HAREKRISHNAJI said...

pratima,

Thanx. I have no idea if this years Hapus is available is US. I understand from newspaper that this year Hapus exports to US has been disallowd because of high pesticides.