Monday, May 19, 2008

"सिक्स्थ सेन्स’ सांगतो "लालच बहुत बुरी बला है रे "


श्री. विलास गावकर आता ’सिक्स्थ सेन्स ’ नावाचा सुसज्ज मॉल सुरु करुन जागतिक व्यापार विश्वात आपलं पदार्पण करीत आहेत.


’सिक्स्थ सेन्स ’ या वातानुकूलीत आणि अत्याधुनिक मॉलच्या तळमजल्यावर "व्हेज ऑलवेज" नावच रेस्टॉरण्टही सुरू केलं आहे. येथे कॉन्टीनेण्ट्ल, इंडीयन, चायनीज असं तिन्ही प्रकारच हेल्दी, चविष्ट फूड मिळेल. एखादं रेस्टॉरण्ट समोरुन कितीही स्वच्छ दिसतं असलं तरी त्यांच किचन मात्र अस्वच्छच असणार हे आपण गॄहीतच धरलेलं असतं. पण "व्हेज ऑलवेज"चं किचन अतिशय स्वच्छ व प्रशस्त आहे. विशेष म्हणजे इथे आलेला प्रत्येक खवय्या किचनमध्ये जेवण कसं तयार केलंजातं हे समोर लावलेल्या स्क्रिनद्वारे प्रत्यक्ष पाहूही शकतो आणि दुसरीकडे मॉकटॆल काऊण्टरवरुन आपल्या आवडत्या मॉकटेलचा आस्वादही लुटु शकतो.


वर्षारंभ विशेष, महाराष्ट्र टाइम्स मधे "विलास गावकर एक समर्थ व्यक्तीमत्व" या लेखात हे वाचल्या नंतर त्यांच्या विषयी आदराने मन भरुन आले. त्यात भर पडली ते उपहारगृहाचे वर लिहीलेले वर्णन वाचुन.

मुंबईत एखादे मस्त उपहारगृह सुरु झाले आहे आणि आपण अजुन त्याला भेट दिली नाही ? प्रभादेवी एवढाच उल्लेख वर्तमानपत्रात आला होता, तो धागा पकडुन राजाभाऊ सहकुटुंब सहपरीवार भोजन करायला निघाले. शोधत शोधत असे वाट पुसत पुसत , अरे मराठी माणसानी एवढे मॉल उभारले पण या परीसरातील कोणालाच काहीच ठावुक कसे नाही याचा विस्मय करीत दरमजल करीत अखेरीस परळ ऐस्टी डॆपो मागे, झेंडु फार्मसुटीकल समोर पोचले. आणि


न जेवता ही तृप्त होवुन ते परतले.


धन्य त्या वार्ताहराची. अजुन कशाचा कशाला पत्ता नाही. बांधकाम सुरु आहे, अर्धवट अवस्थेत सर्व काही आहे आणि त्या आधी तो पठ्ठाने आम्हाला चक्क जेवायला तेथे धाडले.

टॅक्सीचे बिल, झालेल्या मनस्तापाची भरपाईची रक्कम त्या वार्ताहराकडुन वसुल करायला हवी.

2 comments:

आशा जोगळेकर said...

बोलाचीच कढी बोलाचाच भात अन् बोलाचाच मॉल अन् बोलाचंच रेस्टॉरेन्ट .

HAREKRISHNAJI said...

बोलाचीच कढी म्हणाता येणार नाही. आजच वाचले या मॉलचे येत्या गुरुवारी उट्घाटन आहे.
माझा मुदा असा आहे की जानेवारी महिन्यामधल्या अर्धवट अवस्थेत बांधकाम असतांना या लेखात वार्ताहाराने अती उत्साहाच्या भरात चक्क मॉल सुरु झाल्याचे खोटे लिहीले आहे. माझ्यासारखे वाचुन अनेक जण गेले असणार.