Saturday, May 10, 2008

एस्प्रेस वे वरील वहानांचे वाढते अपघात

हमरस्तावरील, एस्प्रेस वे वरील वहानांचे वाढते अपघाताचे प्रमाण पाहीले की आपण सुरक्षतेच्या बाबत किती बेफिकीर असतो हे जाणुन खंत वाटते.

अतीश्रमीत, पुरेशी विश्रांती न घेतलेले , सुरक्षतेच्या नियमांचे प्राथमीकही ज्ञान नसलेले, बेफिकीर ,स्वःताच्या व इतरांच्या जीवनाबद्द्ल आदर न बाळगणारे, चलता है ही वृत्ती बाळगणारे, उतावळे, बेशिस्तीने , बेदरकारपणे सुसाट वेगाने गाडी हाणणारे वाहान चालकच सर्वस्वी या दुर्घटनेस जबाबदार असतात.

एस्प्रेस वे वर तर अवघड वहाने बिनधास्तपणे उजव्या लेन मधुन चालवतांना सरास आढळातात. बाजुला होवुन मागच्याला पुढे अजिबात जावुन देत नाहीत, मग मागच्याचा तोल जातो. चुकीच्या पद्ध्यतीने रागात तो गाडी पुढे काढायला बघतो. अपघाताला हे तर निमंत्रण.

वहान चालवण्यासाठी परवाना देतांना वास्तवीक पहाता सुरक्षततेच्या सर्व नियमांची चांगलीच ओळख यांना संबधीत खात्यांनी करुन द्यायला हवी, या साठी चागंले दोन-तीन तासाचे वर्ग असावेत, चाचणी परिक्षाही असावी, पास झालात तरच परवाने दिले जातील ही अट असावी. पण ? तुम्हाला गाडी निर्दोष काय अगदी चालवता जरी येत नसली तरी परवाने मिळु शकण्याच्या जमान्यात हे कठीणच आहे.

मुंबई वरुन सुमो भाड्याने घेवुन पुण्याला व तेथुन महाबळेश्वरला. आम्ही त्यांचे पाहुणे. . सकाळी पुण्यावरुन निघुन महाबळेश्वर व संध्याकाळी परत.

एस्प्रेस वे वर अती वेगात चालवणे व सतत डाव्या बाजुने गाडी पुढे अगदी बोगद्यात सुद्धा काढण्याच्या चालकाचा सवयी वरुन आधीच माझी व त्याची जुंपली, अनेकदा चांगल्या रितीने सांगुनही, पालथ्या घड्यावर पाणी. त्यात त्याच्या गावाला कोणीतरी गेले, मग त्यांला गावावरुन येणारे सारखे मोबईल फोन. वरताण म्हणजे गाडीच्या मालकाचा सतत येणारा मोबाईल फोन, रातोरात सिल्वासाला जाण्यासाठी नवीन भाडे आलेले आहे, गाडी लवकर घेवुन ये व त्यांना घेवुन जा.

शर्त झाली. महाबळेश्वर वरुन गाडी चालवत आणणारा चालक ( तरी मधे दर दोन-अडीच तासाने मी त्याला थांबायला लावत होतो) आता यापुढे रात्री सिल्वासाला जाणार, त्यात मयतीचे टेन्शन, तिथुन तो गावाला जाणार.

तळोजाला अपघात होता होता टळला. शेवटच्या क्षणी.

सोमवारी म्हात्रे पुल, पुणे ते सायन, मुंबई ,प्रवासाची वेळ फक्त दोन तास. स्कॉर्पीयो गाडी. मी परत त्यात पाहुणा. आमचे चालक तंबाखुच्या तारेत गाडी चालवत होते. चालवता चालवता मधेच खिशातुन तंबाखुची पुडी काढायची तोंडात तोबारा भरायचा, अचानक चालत्या वेग कमी करुन गाडीचे दार उघडुन पिक मारायची. देवा रे अगुन मी जीवन धडपणे जगलेलो नाही रे, थोडीशी मला मुदत दे. देवाचा धावा चालु.
अहो सेफ्टी बेल्ट लावा,
जमत नाही, अडकल्यासारखे होते,
अहोपण आपल्या सर्वांच्याच भल्याकरता तो आहे.
जरा वेग कमी करा. 140 -160 वेग धोकादायक.
प्रतिक्रिया शुन्य.
उजव्या रांगेतुन चालवु नकात, ती रांग फक्त ओवरटेक करण्यासाठी आहे,
प्रतिक्रिया शुन्य.

सारखे सारखे बोलु नकात, रस्तावर लक्ष द्या
तुम्ही गप्प बसा हो. त्यांना त्रास देवु नकात. - मला फायरींग मिळाले.
अहो पण हे बॅकसिट ड्रायवींग नाही, मी सुरक्षततचे प्रशिक्षण घेतलेला माणुस आहे.
धडा. शिवनेरी व महाबसनेच प्रवास करावा.

No comments: