मुंबई, ता. ३० - ऐन पावसाळ्यात परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या महापौरांसह पालिका नेत्यांना "मातोश्री'वरून तंबी मिळाल्यानंतर अखेर जून व जुलैमधील दोन्ही परदेशवाऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले."महापौर, नेत्यांची परदेशवारी...' या आशयाचे वृत्त "सकाळ'ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. महापौर, उपमहापौरांसह पालिकेतील गटनेत्यांचे वऱ्हाड ऐन पावसाळ्यातच सिंगापूर व जर्मनीच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार होते.
पण का ? नेहमीच महापौर, नगरसेवकांनी परदेशवारी ठरवली की त्यावर टिका होते. का पण का ? मी तर म्हणतो, यांना परदेशात अभ्यासक्रमासाठी पाठवाच, जरुर पाठवा, नुसतेच त्यांना कार्यशाळेत डांबुन न ठेवता, रस्तांवरुन फिरवा, लोकांमधे मिसळवा, जाणवुन देत ना त्यांना फरक परदेशातल्या शहरांमधला व आपल्या मुंबई-पुण्यामधला.
येवुन देत ना त्यांना परत भारावुन जावुन, पेटुन, ध्यास घेवुन, तेथली प्रगती, स्वच्छता, शिस्त, वाहतुक, निटनेटकेपणा, आखीवरेखीवपणा, सर्व, सर्व पाहुन , जाणुन घेवुन.
या साऱ्या गोष्टी मी आपल्या शहरात परत गेल्यावर राबवीनच याचा ढ्रुढनिश्चय करुनच त्यांना परत येवुद्यांना. त्यांच्या द्रुष्टीकोनात, काम करण्याच्या विचारात, पद्धतीत नक्कीच फरक पडेल, बाहेरचे जग पाहील्या नंतर. नक्कीच जाणीव होईल त्यांना आपण किती जगाच्या मागे आहोत याची.
जगात काय आहे, काय चाललय, काय होत आहे, आणि मुख्यतःहा कसे होत आहे हे पाहिल्यानंतर, शिकल्यानंतर, जाणुन घेतल्यानंतर, ते परतल्यावर या साऱ्या चांगल्या गोष्टी आपल्या कडे १०० टक्के राबवतीलच.
त्यांनी परदेशवारी करण्यात आपलाच फायदा आहे.
"
पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे आहेत, ऐन पावसाळ्यातच महापौरांसह पालिकेतील सर्वच नेते परदेश दौऱ्यावर जाणे उचित ठरणार नाही." - बातमी
पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे आहेत, ऐन पावसाळ्यातच महापौरांसह पालिकेतील सर्वच नेते परदेश दौऱ्यावर जाणे उचित ठरणार नाही." - बातमी
नकारात्मक विचार करायचाच झाला तर म्हणावेसे वाटते, ही सारी मंडळी असली किंवा नसली तरी काय मोठासा फरक पडतो ? ते येथे असल्यांने सारे काय चकचकीत होत असते ? तसे असते तर जगातील इतर शहरातील महापौरांना, नगरसेवकांना मुंबई-पुण्याचे दौरे आखावे लागले असते.
No comments:
Post a Comment