आपण ओढलेली प्रत्येक विडी-सिगरेट आपलं आयुष्य ११ मिनीटांनी घटवते.
आपल्याला हे ठावुक असते तरी पण आपल्याला धुम्रपान बंद करवत नाही. कॅन्सर पासुन अनेक रोग आपण आपल्या हाताने ओढवुन घेतो. का ? कशासाठी ?
कोणे एके काळी मी देखील चेन स्मोकर होतो. दिवसाला दोन मालब्रो सिगरेटची पाकीटे (४० सिगरेट ) संपवायचो.
मग एके दिवशी सुप्रसिद्ध लेखक व.पु.काळे माझ्या मदतीला आले, ज्यांच्यामुळे केवळ एका दिवसात धुम्रपान बंद झाले.
त्यांनी मला सांगीतले मी सिगरेट पिणे बंद करा असे सांगत नाही, सिगरेट पिणे वाईट आहे हे ही सांगत नाही. वाईट आहे ती सवय. सवय सोडा.
आणि मी सवय सोडली.
सुरवातीस नक्कीच त्रास होतो, शरीराला निकोटीनची आदत झालेली असते. ते त्याची मागणी करु लागते, मग प्रचंड नैराश्य येते, अगदी आत्महत्तेपर्यंत मनातले विचार घेवुन जातात. हे चारपाच दिवस उलटले, या दिवसात आपण आपल्या भुमीकेशी ठाम राहीलो, खंबीर राहिलो, की मग आपल्या मनाला शरीर साथ देवु लागते. आणि सवय सुटते.
तेव्हा केव्हा सोडताय सवय ??
No comments:
Post a Comment