Thursday, May 22, 2008

मुक्तांगण

दै. सकाळ च्या मुक्‍तांगणमधे बरेच जण आपला अनुभव लिहीत असतात. त्यापैकी काही वाचनात आले. परोपकार करतांना आपल्याला कसे कटु अनुभव येतात या संबंधी.

दुसऱ्या कोणासाठी असलेली लग्नाची आमंत्रणपत्रिका चुकुन त्यांच्या पत्त्यावर मिळाली, मग त्यांनी नावावरुन त्यांचा बरोबर पत्ता शोधुन काढुन त्यांना ती पत्रिका स्वःत नेवुन देण्याचे कष्ट केले तर त्या बदल्यात त्यांना खडुस वागणुक मिळाली

किंवा

पुढे गेलेल्या मोटरसायकल, स्कुटर वरील जाणाऱ्यांची धोकादायक परिस्थिती, उ.दा. हवेत तरंगणारा दुपट्टा जो चाकात जावुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा मागे बसलेले मुल, जो झोपी गेले असुन , दुलक्या खात खाली पडण्याची शक्यता असु शकते, हे पाहुन, जाणुन त्यांचा पाठलाग करत त्यांना थांबवुन, धोक्यापासुन सावध केल्या नंतर, करणाऱ्यांना मिळालेला वाईट प्रतिसाद इ.

परोपकार करणाऱ्यांना मिळालेल्या या अपमानास्पद वाईट वाटुन घेण्याचे कारण नाही. नाउमेद होण्याची गरज नाही.

एक तर आपण त्यांचा जीव वाचवला असतो किंवा आज आपण ही एक चांगली गोष्ट केली व या मुळे आपल्याला वाटणारे आत्मीक समाधान या उपेक्षापेक्षा किती तरी पटीने अधिक असते.

शेवटी आपण हे सर्व आपल्याकरता करत असतो, आपल्या मनाला या परिस्थितीचा त्रास होत असतो म्हणुन. आपण आपला चांगुलपणा सोडता कामा नये किंबहुना आपण केलेल्या या चांगल्या गोष्टी लगेचच विसरुन जायच्या असतात. ते करायलाच हव असत म्हणुन आपण केलेले असते.

3 comments:

sonal m m said...

agdi barobar, nahi tar aaplyalahi tyanchyach ranget jaaun basava lagel...

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ said...

त्या वृद्ध गृहस्थांचा खडूसपणा हे जरी बरोबर असले तरी आपकालच्या जीवनातील वयोवृद्ध व्यक्तींवर कुठल्यातरी बहण्याने-मिशाने घरात जाऊन काहीही करणे सहज शक्य आहे हे रोजच्या घडणाऱ्या बातम्यांवरून आपण पहातोच म्हणून त्यावृद्ध जोडप्याच्या वागणुकीचा तसाच अर्थ काढणे योग्य नाही.मात्र माणुसकीची योग्य ती नागरिकाची भूमिका ही आपल्यासारख्यांनीं त्यांच्या वागणूकीमुळे खट्टू होऊन बंद करता कामा नये.

HAREKRISHNAJI said...

सोनल.

हो ना.

श्री.शशीकांत ओक,

अगदी मान्य. वृद्ध गृहस्थांचे सावधपणाचे वागणॆ कबुल. पण त्यांनी सौजन्याने नंतर वागायला काहीच हरकत नव्हती.
पण माझा मुद्दा हा नाही. आपण शेवटी म्हटले तोच आहे. आपण आपला चांगुलपणा सोडता कामा नये किंबहुना आपण केलेल्या या चांगल्या गोष्टी लगेचच विसरुन जायच्या असतात. ते करायलाच हव असत म्हणुन आपण केलेले असते.