गर्द निळा गगन झुला,शब्द-सुरांचा अनोखा संगम
कवी : अशोक बागवे
संगीतकार - कौशल इनामदार
"आज मराठी गाण्याला येणार काय ? " राजाभाऊंनी आपल्या बायकोला विचारले.
तिने नकार दिला.
"तु काही वेळेवर ऑफिसमधुन निघत नाहीस. तुला पाहिजे तर तु जा "
तिला कुठे ठावुक होते "कौशल इनामदार " या शब्दाच्या मोहिनी मुळॆ राजाभाऊ आज बरोबर पावणॆ सहा वाजता निघुन कसरत करत चकाल्यावरुन चव्हाण सेंटरला बरोबर कार्यक्रमाच्या वेळी पोचणार आहेत.
तसेच तेथे पोचेपर्यंत राजाभाऊंना ठावुक नव्हते की हा कार्यक्रम स्वःत कौशल व त्यांचे सहधर्मी करणार आहेत ते. त्यांची बायको दुर्दैवी व राजभाऊ सुदैवी म्हणायला पाहिजेत. आज त्यांच्यासाठी एक नवे विश्व, नवे भांडार खुले झाले.
बहार आली. सारे काही नव्याने उलगडत गेले. संगीतकार, गायक , अर्थ अलगद उमजुन सांगणारे, कवितेचे लाघवीपण दाखवुन देणारे, त्यातले मर्म समोर ठेवणारे, गाण्याच्या चाली मधले सौदर्य समोर आणणारे कौशल इनामदार, सोबत निवेदन करणारे कवी अशोक बागवे, बरोबर त्यांचे सहधर्मी कलावंत.
खरं म्हणजे त्यांच्या बायकोला सुदैवी म्हणायला पाहिजे. जी या कार्यक्रमाला आली नाही.
राजाभाऊंच्या मनात जसे भिनलेले हे शब्द-सुरांचे जहर ,त्यांनी आलेली ही अस्वस्थता, कौशल इनामदार पुन्हा एकदा जाणुन घेण्यापुर्वीची बैचेनी , या साऱ्या भावभावनांपासुन ती न आल्यामुळे लांब राहिली गेली.
3 comments:
मजा आहे तुमची. :)
वा...! मी सुद्धा येणार होतो या कार्यक्रमाला. पण मी द म्युझिशियन्सचा पन्नासावा प्रयोग बघायला गेलो.
महेंद्र, नरेंद्र,
खुप मजा आली या कार्यक्रमाला.
आता खरी मजा उद्यापासुन सुरु होणार आहे. कल के कलाकार संमेलन जे सुरु होत आहे
Post a Comment