Wednesday, May 19, 2010

तु कुठे?

"तुम्हाला मी ब्लॉगवर काय लिहित असतो हे वाचायला अजिबात नको, कधी तरी वाचता काय ? "

दुखावलेल्या राजाभाऊंनी आपल्या बायको, मुलाकडॆ तक्रारीचा सुर लावला.

" तु कधी तरी समोर बसुन मी वाजवत असलेले गिटार ऐकले आहेस का "

वृश्चिक रास असलेल्या त्यांच्या मुलाने नांगीने डंख मारला.

राजाभाऊ निरुत्तर झाले, त्यांच्या कडॆ उत्तर नव्हते, ते सुद्धा वृश्चिकेचे असुन देखील.

5 comments:

हेरंब said...

हा हा राजाभाऊ..

अरेरे वृश्चिकेचे असून गप्प बसलात? कसं व्हायचं आता वृश्चिक कम्युनिटीचं ;)

HAREKRISHNAJI said...

काय करणार जवान पोराला दुखावुन चालत नाही, कलेजेका तुकडा जो ठहरा

Ap____M said...

Navraa aani mulgaa doghe vrishchik raashiche .. kathin aahe tumchyaa baaykoche! btw, mulaachi guitar aiklit ki naahi?

मन कस्तुरी रे.. said...

टु बी फ्री इज ऑफन टू बी लोनली.....कुठलं हे वाक्य?
अगदी पटण्यासारखं...म्हणजे तुमच्या सारख्या माणूस वेड्या व्यक्तींना तर अगदी चपखल लागू. पण मग आपण सदैव स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन का राह्तो..? एकलेपणाची ही ओढ अशी आत कुठेतरी रुजलेलीच असते का?

HAREKRISHNAJI said...

अपर्णा,

वृषभेच्या खुराखाली विंचवाच्या नांग्या ठेचल्या जातात आणि वर शिंगे देखिल आहेत. अजुन नाही ऐकलेले.

अश्विनी,

मॅनहोल मधला माणुस, मराठी वाड्मय, समाज व आतिवास्तव्य या विलास सारंग लिखीत पुस्तकात त्यांनी "माणसा"चा शोध या लेखात W.H.Auden यांच्या या वाक्याचा उल्लेख केला आहे.

कधी मी एकटा असतो तर कधी एकाकी आणि एकांडा देखील. मग हे वाक्य आवडले.