स्मरणशक्ती चांगली असणे हे एक वरदान की शाप हा प्रश्न मला नेहमी पडतो. अनेकदा आलेले कटु अनुभव खुप वेळ मनात रेंगाळात रहातात.
घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य, सरबाई उत्तम रीतीने करणॆ, जेवणात चांगले चांगले नानाविध पदार्थ करुन ते पाहुण्यांना मनोसोक्त खिलवणॆ ही आम्हा उभयंतांची आवडीची बाब. कोठेही कसलीच कमतरता रहाता कामा नये.
एकेठिकाणी जवळाच्या माणसाने आम्हाला व आमच्या एका नातेवाईकांना जेवायला बोलावलेले.
सर्वजण आत वातानुकुलीन शयनकक्षेत महफील रंगवत. आम्ही दोघे शाकाहारी, मद्यपान न करणारे, बाहेर दिवाणखान्यात.
मग केव्हातरी दोन ताटे मांडुन गॄहस्वामीनी परत आत निघुन गेल्या. जणु काय आपल्याकडे गडीमाणसांसाठी कसे जेवण बाजुला काढुन ठेवले जाते तसे. कुठल्यातरी उपहारगृहातुन केव्हातरी आणलेली आणि आता थंडगार झालेली, बेचव पंजाबी पद्धतीची भाजी, रस्तावरच्या टपरीतुन आणलेली भजी. सर्व पदार्थ एकाच वेळी ताटात मांडलेले.
काय हवे नको विचारायचे नाव नाही, अन्नाचा अपमान नको म्हणुन जेवलो, परत त्यांच्या कडे जायचे नाही हे ठरवुन.
ता.क. बायकोन मंगला गोडबोलेंच "अशी घर अशी माणसं " हे पुस्तक वाचायला घेतल्यापासुन माझाही डोक्यात अश्या प्रकारचे लिहायचे हा किडा वळवळायला लागलाय. त्यात परत सद्ध्या रजेवर आहे, ताप भरलाय , पुस्तके, ब्लॉग आणि चित्रपट पहाणॆ हाच उद्योग राहीलाय.
No comments:
Post a Comment