Sunday, December 21, 2008

क्रोंच वध ते आता भविष्यात होणारे श्वान वध

डॉ.श्रीश क्षीरसागर यांनी आजच्या लोकसत्ता मधे सैबेरीयन क्रेन वर व्यथीत करायला लावणारा लेख लिहीला आहे.
ते लिहीतात " पूर्वी दरवर्षी नेमाने येणारे सैबेरियन क्रेन्स हे राजस पक्षी गेली पाच वर्ष भारतात आल्याचं ऐकीवात नाही. ही हिवाळी स्थलांतराची शतकानुशतकांची परंपरा आता धोक्यात आली आहे. का येत नाहियेत हे पक्षी ? "
युरोप-सैबीरीयातील थंडीच्या कडाक्यापासुन आपला बचाव कसा करुन घ्यायचा हे निसर्गांने त्यांना स्थलांतर कसे करायचे हे शिकवुन त्यांना जगायला शिकवले. पण माणूस म्हणावणाऱ्या दोन पायांच्या पशुंपासुन आपला बचाव कसा करावा हे त्यांना निसर्ग शिकवायला विसरुन गेला. आणि क्रुर माणसांच्या शिकारीला बळी पडत ते आपले अस्तित्व पृथीलोकामधुन संपवत चालले आहेत.
त्यांना बिचाऱ्यांना माहीत नाही ही पृथी केवळ माणसांनाच रहाण्यासाठीच आहे ( निदान आपला तरी तसा समज आहे )
ज्या वाटॆने हे पक्षी गेले त्याच वाटॆने आता कुत्रे जाणार आहेत. तुमच्या परिसरात भटके कुत्रे आहेत, ते भुंकत रहातात काय ? तुम्हाला त्यांचा त्रास होत आहे काय ? मग विचार कसला करता ? त्यांना ठार मारण्याचा रस्ता आता कायद्याने मोकळा झाला आहे.

3 comments:

Anonymous said...

प्राण्यांना मारण्याचा हा प्रकार प्राणी मित्रांना नक्कीच दुःख देणारा आहे.या मुळे निष्पाप प्राण्यांवर संक्रांत आली आहे.प्राणीमात्र संघंटना याबाबत गप्प का? याचे आश्चर्य वाटते आहे.

प्रा.सचिन पाटील.

visit us:हास्य मेव जयते.

Ruminations and Musings said...

Ek israeli scientist yancha ya vishayawar SP college chya lady ramabai hall madhe don warshanpurwi yawar program zala hota.. Eilan ashee jaaga aahe jithe he pakshi rest ghetat.. tyawar prog hota. mee yawar tumhala lihun pathiwte..vishay mahtwacha aahe tumhee mandlela..

HAREKRISHNAJI said...

प्रा.सचिन पाटील आणि Ruminations and Musings ,

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

Ruminations and Musings ,

मी वाट पहात आहे त्या कार्यक्रमाच्या माहितीची