पवनाचा जलाशय, तुंगी,तिकोन्याचा परिसर हा नेहमीच मला भुरळ घालत आला आहे, गेल्या वेळी पावसाळ्यात मी पौड कडुन काळॆ कॉलनी कडे या परिसरात एकट्याने भ्रमंती केली होती. पण खरतर मनापासुनची इच्छा होती लोहगडच्या पोटाशी, कुशीत असलेल्या खिंडीतुन या दिशेने परिसर न्याहळत येण्याची, हा परिसर डोळॆ भरुन पहाण्याची व त्यापेक्षा चल म्हटल्यावर दुसऱ्याच क्षणी बॅगा भरणाऱ्या व तिसऱ्या मिनीटाला खाली उतरणाऱ्या माझ्या अर्धांगनीला हा नितांत सुंदर परिसर दाखवण्याची. ( बरे झाले देवा निदान खाणॆ आणि फिरणे या दोनतरी बाबतीत तु आमची आवड सारखी ठेवलीस नाहितर आयुष्यभर तुला माझ्याकडुन बोल ऐकुन घ्यायला लागले असते.) तर, ज्या ज्या जागी माझे एकट्याचे जाणॆ झाले होते, जो आनंद मी एकट्याने उपभोगला होता त्या ठिकाणी तिला घेवुन जाणॆ हा माझा शिरस्ता, मग या परिसरासाठी तो अपवाद कसा ठरावा ?
या मार्गावर दुधवरे खिडं ओलाडल्यानंतर पलीकडे श्री.बाबामहाराज सातरकर यांनी अप्रतीम विलक्षण देखणी वास्तु उभारली आहे असे ही ऐकुन होतो, "चैत्यन्य धाम" लाही जाण्याचे मनात होते, वाटेत न्याहारी करायला त्यांना "सोल करी" मधे ही त्यांना घेवुन जायचे होते.
हे सारे एकदम अकस्मात जमुन आले.
No comments:
Post a Comment