Tuesday, January 18, 2011

आम्हाला तर रोजच या पोटासाठी धावावं लागतं

आम्हाला  तर रोजच या पोटासाठी धावावं लागतं. ड्युटी कोणाला चुकलीय


आहे ना पुरावा आहे ना

माहीती आहे का मी पत्र लिहिलय.




जसं या पोटासाठी माणसाला काय काय करायला लागते, तसेच या समाजसेवकांना आपले गोजीरवाणे फोटो, आपले महान कार्य आम जनते पुढे आणण्यासाठी रोज रोज नविन कारणे शोधावी लागतात, वाढदिवस, अभिनंदन आदि, फ्लेक्स फलकांना आता लोक कंटाळली आहेत ना.

मग त्यांना सांगा, दाखवुन द्या, मी तुमच्यासाठी काय काय करतो ते. 

तुम्हाला ठावुक आहे का ? अहो तुमच्या  समस्येबाबत मी  मा.खासदारसाहेबांना पत्र लिहीले आहे व त्यांनी त्याची तशी पोच दिली आहे.

हा घ्या पुरावा. 

Monday, January 17, 2011

ये आराम का मामला है. दुनिया धावते धावु द्या


जेव्हा

जेव्हा जवळजवळ आपल्याच वयाच्या सहकाऱ्याची मृत्युची बातमी तुमच्या कानावर येवुन आदळते तेव्हा हादरुन जायला होते.

अरे हे कसं शक्य आहे ? 

तो तर किती हेल्दी होता, स्वःताची फार काळजी घ्यायचा, खाणे , वजन आटोक्यात, शरीर एकदम फिट ठेवलेले. मॅरेथॉनमधे देखील तो धावायचा.

त्याच्या विरुद्ध टोक म्हणजे आपण.

नाही नाही, आता तरी आपण काळजी घेतली पाहिजे.

दोन चार दिवस आपले आयुष्य पुढे सरकते.

ये रे माझा मागल्या.

Sunday, January 16, 2011

हमारी सरकार शेम शेम

फक्त तुझी साथ हवी


कुछ तो शरम करो, राजाभाऊ कुछ तो शरम करो






रन परवीनबाय रन,

कमॉन परवीन, कमॉन.


धडकने दिल की छुपावु किस तरह

मिल गयी थंडी छाव रे.

जिला पहाण्यासाठी हा सारा अट्टाहास केला होता, त्या स्वप्नदेवतेचे दर्शन अखेरीस राजाभाऊंना झाले तर.

रन गुल पनांग रन.


राजाभाऊंना अतिशय आवडणारे एक व्यक्‍तीमत्व.
गुल पनांग.

काय "डोर" मधे तिने काम केले आहे.
दरवर्षी मॅरेथॉनमधे ती धावतेच धावते. 
ठंडक जो मिल गयी.

Saturday, January 15, 2011

कधीकधी

काही वेळा.
कधीकधी वाटते एखादे प्रदर्शन बघतांना आपल्या सोबत कोणीतरी असायला हवे होते, अशी व्यक्‍ती असायला हवी होती की ज्याच्याकडॆ आपण आपल्याला झालेला आनंद व्यक्त करु शकलो असतो, वाटुन घेवु शकलो असतो. त्या व्यक्‍तीबरोबर आपल्याला या प्रदर्शनात भावलेले, उमजलेले, सापडलेले, आवडलेले, समजलेले सारे सारे काही मनमुराद बोलु शकलो असतो.

 
कधी कधी वाटते बरं झाले हे प्रदर्शन पहातांना आपल्यावरोबर सोबत कोणीही नाही. आपण एकटॆच आहोत.
आपली आणि त्या व्यक्‍तींची आवडनिवड सारखीच असेलच असे नाही किंवा आपल्याला जी उत्सुकता असते त्याच्या उलट ती व्यक्‍ती तेवढीच नाउत्सुक असु शकते. त्याला त्यात काहीच स्वारस्थ नसते.
 
मग अश्या वेळी त्या व्यक्‍तीला कंटाळा आलेला असते, व आपला त्या कंटाळ्यामुळे उत्साह मावळत जात असतो.
 
मग आपण कसेबसे प्रदर्शन पहाणे संपवुन टाकतो, त्याचा आस्वाद न घेता.
 
अनीश कपुरचे प्रदर्शन जबरदस्त आहे.   किती वेळ आणि किती वेळा पाहिले तरी समाधान होणे नाही.

आधीच मर्कट तशात मद्य प्याला

आपल्या संस्थेत अन्न महोत्सव आहे याची खबर भाच्याने मामाला देण्याआधीच अन्नावर डोमकावळ्यासारखी नजर ठेवलेल्या त्याच्या मामाला अगोदरच लागली होती.


"मामा तु येथे उभा रहा, मी खायला आणतो "
मग काय मामा ठाण मांडुन खिंड लढवायला तयार.








पावभाजी, काथी रोल, बर्गर, पिझ्झा, स्टॉबेरी क्रश विथ कोक, आणि आणखीन काहीतरी. काय काय खाल्ले , किती खाल्ले कशा कशाची म्हणुन आठवण ठेवायची.
 
हे असे महोत्सव म्हणजे राजाभाऊंची पर्वणीच.
 
या तरुण, उत्साही, शेफची कला बघुन खुब मजा येते. ज्या आनंदात ते सारे खाणे बनवत असतात त्याचे खुप कौतुक वाटते.
बनवणाऱ्याने बनवत जावे, खाणाऱ्याने ते खात जावे,
खातच रहा , खातच रहा, खातच रहा.
 
अश्याच एका ठिकाणी दरवर्षी भरणारा महोत्सव बंद झाल्याचे त्यांना सर्वात जास्त दुःख झाले.
दादरच्या कॅटरींग कॉलेजमधे होणारा महोत्सव बंद करुन त्यांना काय मिळाले असावे?
 
का पण का खाद्यमहोत्सव त्यांनी बंद केला ?

घडाभाजी

हं, झाली एकदाची


आत प्रतिक्षा केव्हा एकदा ती पोटात जाते याची.

घडाभाजी

का, का बरे राजाभाऊ आज असे सकाळपासुन स्वयपाकघरात घुटमळत राहिले आहेत ?

आत बाहेर, आत बाहेर, ,मधेच मुदपाकखान्यात ठाण मांडुन त्यांनी आपल्या बायकोला भंडावुन सोडले आहे.

अधीरता, संयम नसणॆ आणि ताबा ठेवणॆ कठीण झालेल्या राजाभाऊंचा सकाळपासुन बायकोला एकच सवाल

"झाली ?"
"झाली का गं ? "
"झाली ? "


केव्हा होणार ? "
"झाली की नाही, अजुन ? ?
"किती वेळ ? "

तिळगुळ घ्या गोडगोड बोला

तिळगुळ घ्या गोडगोड बोला ( हे निदान राजेशभाईंना कोणीतरी सांगायला हवे, राजेशभाई आता तरी जरा गोड बोला )

Thursday, January 13, 2011

एक दिवस परेडचा

लेफ्ट राइट, लेफ्ट राइट, लेफ्ट राइट, लेफ्ट राइट, दाये मुड, बाये मुड, पिछे मुड, विश्राम ( नेहमीच गोंधळ उडायचा, दाये कोणती , बाये काय ? )







एक असीही परेड, मोबाईल संग.

Wednesday, January 12, 2011

देखणे शिखर शंभुमहादेवाचे आणि श्रीयमाईचे

कोण बरे हे ?

यमाईदेवीच्या समोर ही मुर्ती पाहुन राजाभाऊंचे कुतुहल जागृत झाले ?
ही मुर्ती कोणाची ?

अरे हे तर औंधासुराचे मस्तक.


महिषासुरमर्दिनी श्रीयमाई

पुढचे १५ दिवस

राजेशभाईंनी आपल्या घरी सक्‍त ताकीद देवुन ठेवली आहे.
पुढचे १५ दिवस काहीएक बोलायचं नाही.
मी कुठे आहे, काय करतोय, रात्रीअपरात्री घरी का येतो इ.इ. फालतु सवाल विचारण्याचं काम नाही.

सुर सिंगार संसंद आयोजीत ५४ वे स्वामी हरीदास संगीत संमेलन जे मुंबईत सुरु होत आहे.

देशपरदेशातुन कलावंत, तरुण कलावंत व गुरुजन येणार आहेत.

दि. १३ ते १८ - कथ्थक, ओडीसी, भरतनाट्यम, मणीपुरी,मोहीनीअट्ट्म, कुचीपुडी.

दि. १९ ते २४ - शास्त्रीय गायन व वादन 

Monday, January 10, 2011

लालच तुझे नाव राजाभाऊ

गाडी जरी राजेशभाई वेगात चालवत असले तरी त्यांचे लक्ष मात्र गुर्‍हाळाकडे .



असा ताजा ताजा गरमागरम ऊस खाण्याची तीव्र इच्छा.

वाटलं होत काकवी फुकट देत असतील, पण वाटणे फार भारी पडले.
असो.

मु,पो, फलटण






फलटण खुप भावले . आणि त्यापेक्षा फलटणाच्या माणसांची मनाची श्रीमंती पाहुन मन भारावुन गेले आहे.

जबरेश्वर महादेव, फलटण


करुन करुन भागले आणि किर्तनास लागले

धार्मीक स्थळांपासुन दुरच रहाणारे राजेशभाई मात्र गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजाच्यां आश्रमात खुब रमले.
मन प्रसन्न झाले.
रहाण्याची खुप इच्छा होती.
पण नाही जमले.


आणि साऱ्या फलटणवर कृपादृष्टी ठेवुन राहिलेले