अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Saturday, August 08, 2009
संप आणि आशा डायनींग हॉल
श्री.विठ्ठ्ल कामत , त्यांनी मनही जिंकले आणि पोटही.
माहेरचे जेवण, संकॄतीची वाटली डाळ, ओव्या आपल्या राज्याच्या आणि आकाशकंदिल दिवाळीतला
आता आम्ही ( आम्ही म्हणजे कोण मधले) राजाभाऊंनी आणि त्यांच्या बायकोने चार रेस्टॉरंट्स काढायची ठरवली आहेत.
फडतुस *** माणसांनी आमच्या उपहारगृहापासुन लांबच रहावे.
येथे येण्याची तुमची योग्यता आहे का हे जाणुन घेतल्याशिवाय पाय ठेवण्याचे धाडस करायची गरज नाही.
भले तुम्ही भरभक्कम रक्कम , ती पण रोकडा मोजुन जेवायला येत असाल तरी पण येथे कसे वागावे, कसे जेवावे , काय जेवावे, काय बोलावे हे जो पर्यंत तुम्हाला कळत नाही तो पर्यंत तुम्ही तेथे जेवायला येवु नयेत.
Friday, August 07, 2009
मै सागर की मस्त लहर तु आसमां का चांद
काल एक वसंत देसाई वर लिहिलेला लेख वाचनात आला. अनेक गाण्यांचा उल्लेख या लेखात केला आहे पण "धुंवॉ " चित्रपटातील या गाण्याबद्दल काहीच लिहिले गेले नाही.
माझ्या मते हे वसंत देसाईंचे सर्वात सुंदर गाणॆ आहे.
गायले आहे अर्थात लतानी.
आज लताची मुलाखात असलेले पुस्तक चाळले. फार सुंदर फोटो यात दिलेले आहे.
सावरे सावरे, काहे मोसे करो जोरा जोरी बैय्या ना मरोडी मोरी दुंगी दुंगी गाली हटो जावो जी
आता या "दर्दोत्सवाचा" शेवट अश्या एखाद्या गाण्यानी करावा की जे ऐकतांना नाचण्यासाठी मन खुलुन उठावे, गाण्यात जे सांगितले आहे ते द्रुष्य डोळ्यापुढे तरळावे , राधाकृष्णाच्या अनोख्या प्रेमाची अनुभुती घ्यावी.
"अनुराधा" या चित्रपटात पं. रवीशंकरांनी काय सुरेल संगीत दिले आहे.
’
सावरे सावरे, सावरे सावरे जावो सावरे सावरे,
संग ना सहेली आयी थी अकेली अब ना जात हे मोरे श्याम रोके ना डगर मोरी
गोपीग्वाले देखनेवाले बीन बिचार कहे सारे पकडी राधा की चोरी ,
अनुराधा मधे आणखी दोन गाणी मस्त आहेते. " हाय रे वो दिन क्यु ना आये , जा जा के रुतु " व जाने कैसे सपनोमे सो गयी अखियॉं मै तो हुं जागी , सो गयी सो गयी अखियॉं "
इक शमा घीरी है आंधी मे, बुझती भी नही जलती भी नही
एकदा का स्वःतला घायाळ करुन घ्यायचेच असे राजाभाऊंनी ठरवल्यावर त्यांना कोण अडवणार आणि हे काम "लता" शिवाय कोण चांगले करु शकणार ?
"अल्लाह भी है मल्लाह भी है, अल्लाह भी है मल्लाह भी है, कस्ती है की डूबी जाती है
हम डुब तो जायेंगे लेकीन, दोनों ही पे तोहमत आती है
इक शमा घीरी है आंधी मे, बुझती भी नही जलती भी नही
शमशीरे मुहब्बत क्या कहिये, रुकती भी नही चलती भी नही
मजबुर मुहब्बत रह रह कर हर सासंमे ठोकर खाती है
अल्लाह भी है मल्लाह भी है
इक ख्खाब नजरका आया था कुछ देख लिया, कुछ छुट गया
इक तीरे जीगर पर खाया था, कुछ डुब गया कुछ तुट गया, कुछ डुब गया कुछ तुट गया
क्या मौत की आमद आमद है , क्यु नींद भी आयी जाती है,
अल्लाह भी है मल्लाह भी है "
या गाण्यात जो मागे नगारा की ढोल संथपणे वाजत राहिला जातोय तो आपला दिलाला बडवण्याचे काम मुकाटपणे करत राहिलाय.
एकदा डॉ. प्रकाश जोशींनी वाळकेश्वरला त्यांच्या घराजवळील बालाजी मंदिरात सर्व भक्तांना एका उत्सवाला आमंत्रीत केले होते. हे भक्त बालाजीचे नव्हते, ते होते अनिल विश्वासचे, उत्सव होता श्रवणाचा, स्वःत अनिलदांना भेटण्याचा, त्यांच्या तोंडुन गाण्यांचा कथा ऐकण्याच्या, त्यांनी संगीतबद्ध केलेली अजरामर गाणी ध्वनीफितीवर ऐकण्याचा.
श्री.प्रकाश कद्रेकर राजाभाऊंचा हाथ धरुन सोबत त्यांना या स्वरसोहळ्याला घेवुन गेले होते.
"ऐ दिल मेरी वफामे कोई असर रही है
मै मर रही हूं जीन पर उनको खबर नही
मेरी दिलमे ही रह कर मुझपर नजर नही है
ऐ दिल मेरी वफामे कोई असर रही है "
आणि
"याद रखाना चांद तारो इस सुहानी रात को ",
"एक दिल का लगाना बाकी था वो भी लगा के देख लिया ’ व
" मेरे लिये वो गमे-इंतजार छोड गये " ( अनोखा प्यार )
ऑंखोमे चितचोर समाये दर्द जो - मेहमान ,
"कहॉ तक हम उठाये ग़म - आरजू "
या सारखी मधली दर्दभरी गाणी ऐकवण्यासाठी.
Thursday, August 06, 2009
ये जिंदगी उसीकी है आणि शमशीरे मुहब्बोत क्या कहिये, रुकती भी नही चलती भी नही
"एकाच सुमारास अनारकलीच्या प्रेमकहानीवर दोन चित्रपट निघत होते. एकाचा संगीतकार होता सी.रामचंद्र आणि दुसऱ्याचा अनिल विश्वास. एक अनारकली पूर्ण होवुन लागला व सी.रामचंद्रच्या मधाळ संगीतामुळॆ तुफान चालला. अनिलच्या दुर्दैवाने त्याचा अनारकली पूर्ण होवु शकला नाही.
"अनारकली" ला भिंतीत चिणण्यात येते त्या क्लायमॅक्स सीनसाठी अनिलदाने लताच्या आवाजात एक सुंदर गाणॆ रेकॉर्डदेखिल केले होते. याच प्रसंगासाठी सी.रामचंद्रने "ये जिंदगी उसीकी है " हि चाल दिली होती. अनिलच्या गाण्याचे शब्द होते " अल्लाह भी है मल्लाह भी है , कस्ती है कि डूबी जाती है " ( सर्व काही आहे, पाठीशी परमेश्वर आहे, नावेला नावाडी आहेम पण माझी नाव मात्र बुडायची ती बुडतेच आहे ) ( आता हे गाणे कॅसेट्स मधे शोधुन ऐकल्याशिवाय चैन पडणार नाही) .चित्रपट डब्यात गेल्याने हे अर्थपूर्ण , दर्दभरे गीत बेवारशी झाले. अकेर ते "मान " नामक चित्रपटात वापरून टाकण्यात आले.
याला म्हणतात गाण्याची किस्मत. लताचा काळीज चिरत जाणारा आवाज वा अनिलची धुंदफुंद चाल काही म्हटल्या काही "अल्लाह भी है " ला तारु शकले नाही. "
शिरीष कणेकरांनी अगदी चपखल शब्दात वर्ण्न केलेय. " लताचा काळीज चिरत जाणारा आवाज ".
"ये जिंदगी" पेक्षा " अल्लाह भी है " मधली लता रुलावुन जाते. आणि हि जखम " ये खलीश कहांसे होती जो जिगर के पार होता " करत ठुसठुशीत रहाते.
संपत्तीची मोजदाद
ये जिंदगी उसी की है आणि किसी नजरका मस्त इशारा है जिंदगी
Wednesday, August 05, 2009
सामने गली मे मेरा घर है, पता मेरा भुल ना जाना.
नुरजहां आत्ता नको. मनाच्या एका विशिष्ट भावास्थेत नुरजहां , डेडली.
ऐकावा, एकादा खाडकन लागणारा, खणखणीत, तत्काळ भिडणारा आवाज आणि दिलखेचक ठेका. झोहराबाई अंबालावाली आणि पं अमरनाथ. मिर्झा सायबान मधला. आणि राजकुमारीचा.
"सामने गली मे मेरा घर है , पता मेरा भुल ना जाना.
ओ खिलेंगी तो चांदनी, मिलुंगी ना कामसे
थंडी थंडी सांस सजन भरु तेरे नाम से,
जख्मी जीगर है जमाने का डर है, सामने गली मे मेरा घर है."
"चले गये चले गये हाय दिल मे आग लगाने वाले चले गये - पहले आप, नौशाद .
"ओ ओ मोरी बाली उमरीया सावरिया, देखो मारो ना तिरछी नजरीया
तोरे नैनन मे जादु है ओ बेखबर, यही डर है के दिल पे ना चल ना जाये हल
रही अपनी ना मोहे खबरीया, ओ सावरिया
मिले नैना से नैना जीया खो गया , ये आखोंही आखोंमे प्यार हो गया,
मोरे बाके सजीले सावरीया, ओ सावराया, देखो मारे ना तिरछी नजरीया .. " - नतीजा - रशीद आत्रा "
"कौन जीवन मेरे समाये जा रहा है , कौन बरखा के काली काली रात मे "- हमारा संसार- पं. गोबिंदराम
"समझ लो नजरसे इशारा किसीका की दिल चाहता किसीका "- काश्मीर - हंसराज बहल
परत आता दर्द भरी गाणी ऐकणे नको.
मै तेरी तु किसी औरका ये जलना है जीते जी का
विनोद आणि लता यांना ऐकावे, अनमोल रतन आणि सब्जबाग मधे, श्यामसुंदर ऐकावा बाजार आणि लाहोर मधे, खाडकन समाधी लागेल.
लग्नाआधीच्या काळात राजाभाऊंनी एकदा रंगात आल्यावर तिला
" दुनिया हमारे प्यार की यु ही जवॉं रहे
मै भी वही रहु मेरा साजन जहॉ रहे
दो दिन की जिंदगी ऐ इसे युही गुजार दे
उजडी हुवी ये प्यार की राही संवार दे,
हमतुम रहा न रहे इसका गम नही
लेकीन हमारे प्यार का बाकी निशां रहे "
ऐकवले होते आणि आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा आटा सटक आहे , आपल्या नशीबी हे काय लिहिले आहे असे तिला नक्कीच वाटले असावे
ही गाणी नुसती घायाळ करुन सोडतात.
"साजन की गलीया छोड चले दिल रोया आसुं बह न सके
ये जीना भी कोई जीना है, हम उनको अपना कह न सके,
जब उनसे बिझडकर आने लगे रुक रुक के चले फिर चल के रुके. "
" सुन लो सजन मेरी बात ,जी की बात
छोड देना कही मेरा साथ , जी की बात
ओ दिन है रसीले, रतीयां सुहानी, ऐसे मे कहले दिलोंकी कहानी
आज दिलोंकी नगरीया बसाले , कलकी झुटी बात , मेरी बात, जी की बात "
हे गाणॆ तर एका वेगळ्याच पातळीवर नेऊन पोहोचवते.
"मोरे द्वार खुले है आनेवाले कब आवोगे
जैसे उगते चांद को देखे धुंडे कोई चकोरा
जैसे पतझडकी रुतु मे भटके है रस का भवरा
जैसे मेरा मन रो रे के गाये प्रितम मोरा
आना है अब आ , मोरे द्वार खुले है...
मै तेरी तु और किसीका ये जलना है जीते जी का, खुली आंख के खेल है सारे सुनलो ................"
व
"तारे वही है चांद वही है , हाय मगर वो रात नही
मै भी वही हुं तुम भी वही हो हाय मगर वो बात नही "
जो मै जानती थी दिल देके दुखी होना है, ये प्रीत सदा का रोना है
ना मेरा दिल भटकता ना मै आज भटकती, बंद जबां, मै कहा वो कहां अब मिलनेकी कोई बात नही , हाय वो रात नही "
पहिली पायरी ओलांडायला सुरवात झाली.
"सजन आये आधी रात बडे गीले बहाने के साथ
ना मै हां बोली ना मै ना बोली, मै चुपके चदरीया तानके मचली हो गयी वो समझे सो गयी
" मुझे इशारे इशारे मे लगे बुलाने, दिल मे क्या था राम जाने हो फिर मन ही मन मे लगे मुस्कुराने, दिल मे क्या था राम जाने, ना मै हा बोली ना मै ना बोली, मै कहु चोरसे छोड चदरिया झुटी नीदंमे सो गयी "
"दर्द मिला है तेरे प्यार की निशानी , ओ देनेवाले तेरी मेहरबानी , हाय "
"हाय मै अकेली रह गयी ना ना बोला ना, हसते हसते बेदर्दीने कर ली .... "
" मेरी बरबादियोसे मुस्कुराने कोई आ गया कोई. मिटाने आ गया कोई, रुलाने आ गया कोई "
" मेरे दिल के तडपनेका तमाशा देखनेवाले, तुझे क्या मिल गया हाय, मेरा तडपना देखनेवाले "
"रोना ही लिखा था किस्मत मे, हम गीत खुषीके गा न सके "
"कागा रे " - वफा
डाउन डाउन अंग्रेजी टोपी, अप अप गांधी कॅप
१५ औगष्ट जवळ येवु लागले की आपल्या देशभक्तीला भरते येवु लागते.
अश्या वेळी नेमके हाती लागले ते शमशाद बेगम आणि ललिता देऊळकरांनी गायलेले "हैलो हैलो जंटलमन " .
यातली एक ओळ फार मजेशीर आहे
" डाउन डाउन अंग्रेजी टोपी, अप अप गांधी कॅप "
संगीत दिले आहे श्यामसुंदरनी.
Tuesday, August 04, 2009
वैतरणा पुलावरील हा एक अप्रतिम प्रपात
दुर्दैवाने येत्या दोन तीन वर्षात हा धरणाच्या पाण्याखाली नाहिसा होणार आहे, या पाण्याच्या प्रवाहाने निर्माण केलेल्या घळ्या पाहाता जीव घाबराघुबरा होतो. आणि गंमंत म्हणजे तुम्ही याच्या इतक्या जवळ असता की हात पुढे केला की त्यात जावा.
"अन्नपुर्णा " ,लोकमान्य टिळक रस्ता, सेलेब्रेशन हॉल जवळ, पश्चिम दहिसर रेल्वेस्थानकाजवळ.
त्याचे असे झाले, एक तर हल्ली कोणाकडे घरगुती समारंभाला जाण्याचे ते टाळतात. तरी त्यांना ती जबरदस्तीने घेवुन गेलेली. ( आधीच्या विचित्र स्वभावात आता माणुसघाणेपणाची भर ), त्यात परत ते वातानुकुलीत हॉल, ते जेवण बनवणारे "सो कॉड केटरर्स " रस्तावरुन धडपकड करुन आणलेले ते वाढपी, ते आचारी, त्यांचा तो गलिच्छपणा, ते भयानक जेवण , (नॉट फिट फॉर ह्युमन कंन्झमशन , असे त्यांचे प्रामाणिक मत), नको से होते.
त्यांनी आधी नुसती "घावने घेतली, (आता समारंभात जेवायचे होते ना ) पहिल्याच घासात पसंतीची पावती मिळाली. तेवढ्यात एका व्यक्तीने "डाळींबी उसळ" मागीतली. मग काय राजाभाऊंना सुद्ध्या "डाळींबी" लागली आणि ती पण तांदळ्याच्या भाकरी बरोबर.
आता तरी त्यांचे समाधान व्हावे , पण नाही, एकादा खाद्यपदार्थ नुकताच केला आहे, गरमागरम आहे असे पाहिल्यानंतर ते वेडेपिसे होतात, मग मऊसुत पुरणपोळ्यांचा फडसा पाडल्याशिवाय ते कसे मागे राहिले असतील ? परत वरती सहा पोळ्या बांधुन घेतल्या.
गम की दुनिया रहे आबाद "शकील" मुझ नसींमे कोई जागीर तो है !
"प्रीतम मेरी दुनियामे दो दिन तो रहे होते, हम प्रेमकी सागरमे एक साथ बहे होते ।
अगर मुझसे बिछडना तुझे ओ जालीम, दो बोल मुहब्बतके हमसे न किये होते ॥ "
या एका गाण्यावर जान कुर्बान.
"अब गम को बना लेगें जीनेका सहारा, दिल टुट गया, छूट गया साथ हमारा " - निर्मोही
"हमारे बाद अब महफिलमे ये अफसाने बयॉं होंगे , बहारे हमको ढुंगेगी , ना जाने हम कहा होंगे " - बागी
आणि
" दुखियारे नैना ढूंढे पियाको " निर्मोही.
"सितारोंसे पूछो नजारोंसे पुछो , हम आपकी याद लिये सताये हुवे है " - धुन
Monday, August 03, 2009
दर्द , लता आणि सी.रामचंद्र
Friday, July 31, 2009
दाभोसा धबधबा
प्रवासात अवचीत काही अप्रतीम स्थळ सापडुन जातात, आपण त्याच्या मोहात पडतो, दरवर्षी येथे परत येवुच मनाशी ठरवत रहातो, पण जाणे काही होत नाही.
जव्हारच्या जवळील दाभोसा धबधबा पाहिल्याबरोबर देहभान हरपले होते. खुप खुप उंचावरुन खाली खोल दरीत झेपावणारा हा प्रपात वेडेपिसे करुन सोडणारा आहे.
Thursday, July 30, 2009
माननीय शिक्षणमंत्री श्री. रामकृष्ण विखे-पाटीलजी,
माननीय शिक्षणमंत्री श्री. रामकृष्ण विखे-पाटीलजी,
सप्रेम नमस्कार,
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याचे कबुल करण्यात आपण प्रामाणीकपणा दाखवला, बरे वाटले.
आता जरा लक्ष प्राध्यापकांच्या संपात घातलेत तर फार बरं होईल. मुलगा बरेच दिवस झाले घरी बसुन आहे. ( नाही तरी एरवी महाविद्यालयात जरी जात असला तरी तो लेक्चरना बसत असेलच असे नाही तरी पण).
गेल्या वर्षी अभ्यासक्रम बदललात, पाठ्यपुस्तके महाविद्यालय सुरु झाल्यानंतर त्यानुसार दोन-चार महिन्याने प्रकाशीत झाली. आम्ही काय म्हटल का ? आमच्यापेक्षा तुम्हालाच त्यांची काळजी असावी हे जाणुन गप्प बसलो ना.
पण आता तरी त्यांच्यासाठी सारे सुरळीत व्हावे हो, तेव्हा जरा त्यांच्या कडेपण लक्ष द्या.
Wednesday, July 29, 2009
Monday, July 27, 2009
वैतरणा पुल, खोडाळा, देवबांध, सुर्यमाळ आणि दोन निसर्गवेडे
जीव कासावीस होवु लागला, शरीरात उठलेला आंतरीक दाह अधिकाधीक भडकुन उठु लागला. तप्त शरीर आणि तडफडणारे मन, धाव घेवु लागले, ओढ लागली , सह्याद्रीची, निसर्गाची, पावसाचे रुप पाहाण्याची, मनमुराद भटकण्याची.
चित्रपटात आपण अनेकदा एक प्रसंग पाहातो, बंद दरवाजा उघडुन पलिकडे जातो, आणि अचानक एकदम दृष्य पालटते, समोर येत ते काही निराळेच असते. अगदी तस्सेच. गाडी कसाऱा घाटात डावीकडे कसारा- जव्हार रस्तावर वळली , आणि अचानक निसर्गाच्या कुशीत प्रवेश झाला. एक अप्रतीम परिसर. निसर्गाने काहीही हातचे न राखता सारे काही उधळुन दिलेले, नुसती नयनरम्य लयलुट.
केवढे निसर्गाचे वैभव येथे पहायला मिळते.
या नदीवर धरण होवु घातलय. वेंतरणा पुलाकडचा सारा परिसर दोन तीन वर्षात पाण्याखाली नाहिसा होणार आहे
स्वागताला आला तो विहीगावचा एक भलामोठाला धबधबा. पण यात फारसे गंतुन पडायचे नव्हते. या धबधब्यापाशी दोन-चार गृप आले होते. आमचे खरे लक्ष लागले होते ते पुढे असलेल्या वेंतरणा पुलाजवळील महाभयानक अविष्काराकडे, पाण्याच्या रौद्रस्वरुपाकडे, महाभयंकर वेगात खाली बेभान होवुन झेप घेणऱ्या पाण्याच्या प्रवाहाकडे, आपल्या वेगाने बलदंड खडक कोरुन त्या भयानक घळीतुन उद्दामपणे आपल्या मस्तीत धावणाऱ्या , कल्लोळ करणाऱ्या प्रपाताकडे.
पाय काही निघवत नव्हता.पण हा सारा परिसर येवढा निसर्गाने भारावला आहे हे ध्यानी घेता रस्तावरुन पुढे चालत निघालो. जेथे दृष्टी जाईल तेथे केवळ हिरवा शालु, त्यावर तांबडी जरीबुट्टी, सोबत सतत लागणारी वेंतरणा, ओढेनाले, धबधबे कधी खोडाळ्याला पोचलो कळालेच नाही.
आता वेध लागले होते ते देवबांध चे. वेंतरणा नदिच्या किनारी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे लोकोपोयोगी अनेक उपक्रम चालवले जातात, एक गणपती मंदिर आहे, आणि मुख्य म्हणजे हा चार कि.मी. चा रस्ता , अप्रतीम. जातांना बस मिळाल्यामुळे बसनी गेलो पण येतांना मात्र डोंगरातुन पायवाटांनी चढत आलो, तेवढे थ्रिल.
या वाटेत मधेमधे जबरदस्त मोठाले धबधबे आहेत, पहात पहात, चवीचवीने आनंद लुटत परत खोडाळ्याला , हा रस्ता पुढे जव्हारला जातो, या रस्तानी परत कधीतरी प्रवास करायला हवा ही खुणगाठ मनाशी बाळगत परतलो.
आता जायचे होते ते सुर्यमाळला. खोडाळा-वाडा रस्तावरचे हे आणखीन एक वेडापिसा करुन सोडणारे ठिकाण. स्वागताला ढग खाली उतरले होते, आता आम्ही उंचीपण बऱ्यापैकी गाठलेली, पठार, हिरवीगार कुरणे, शितल पवन, आल्हाददायक वातावरण, काश ती पण सोबत असती.
अप्रतीम परिसर. परत परत जावुन पहाणासारखा.
पुढे वाड्याला जाण्यासाठी काय वहान मिळेल का नाही याची शाश्वती नव्हती, बऱ्याच वेळाच्या प्रतिक्षेनंतर परत माघारी खोडाळ्याला फिरणाच्या दुख:द निर्णय घेतला , अपुर्णतेच गोडी असते अशी मनाची खोटी समजुत घालत.
