Monday, August 03, 2009

दर्द , लता आणि सी.रामचंद्र

राजाभाऊंना वाटले आज आपल्या दिलाला दर्दचा अहसास करुन द्यावा, व्याकुळता, विव्हळता काय असते याची त्याला जाणीव करुन द्यावी, गमचा मजा लुटावा, दर्दचा कैफ दिलात भरुन घ्यावा, मनाची अवस्था बैचेन करुन सोडावी, "दिल तो रोता रहे और आखोंसे आसु न बहे " यातुन त्याला "आखोंसे नीर बहे मुहसे कुछ ना कहे " या अश्या अवस्थेत चटदिशी, चटकन घेवुन जावे. केवळ एकच आवाज दिलाला या स्थित्तीत पोचवायला काफी होता लताचा आणि झांझर मधली सी.रामचंद्र यांची गाणी.
"जी चाहता है अब तो दुनीयासे रुठ जाये । ओठोपे आ रही है मौत की दुवायें ॥
ओ बेवफा जमाने दिल तो लगाके देखा , सब कुछ लुटाके देखा,
अपना समज के उनको अपना बनाके देखा , दिल मे बसा के देखा ,
लेकीन मिली हमे वफा के बदले जफांये , ओठोपे आ रही है मौत की दुवायें ॥
चलते ना तीर बनके दिल न अगर लगाते धोके मे ना आ जाते ,
ये दिन ना देखते , हम आसु ना बहाते, दो दिन तो मुस्कराते ॥ "
" बहारे बेच डाली फुक डाला आशियानेको , जरासी राख रखदी बेवफा़ ते रे दिखानेको ।
ये प्यार तेरी दुनीयासे हम बस इतनीसी निशानी लेके चले
एक टुटा हुवा दिल साथ रहा रोती हुवी जवानी लेके चले
आये थे बडॆ अरमान लिये सीने मे कही तुफान किये
अंजाम ये है सीनेमे दबी गम की कहानी लेके चले ॥ "
हाय. ये मायुसी. हा सिलसीला पुढे जारी राहिला.
" ये आरजु थी कभी हम बहार देखेंगे , किसे पता था फि़जा बार बार देखेंगे
करार पाके भी किस्मत मे बेकरारी है , वो और होंगे जे दिल का करार देखेंगे " - बारीश.
"कोई किसी का दिवाना ना बने , ओ तीरे नजर का निशाना ना बने " - सरगम
नशा भिनत राहिली.
"मुझेपे इल्जाम बेवफाई है " - यास्मीन
"छीन सके तो छीन ले खुशीया मेरे नसीब की " - शगुफा
"दर्द जगाके ठेस लगाके चले गये " सिपाहीयां "
"अरे ये क्या किया तुमने , तेरे घर से खुषी मांगी मगर गम दिया तुमने " - हंगामा
"दिलकी दुनीया बसा के सावरीयां " -अमर दिप
"जुल्म तुम्हारे सह ना सके " - नमुना
"जो मुझे भुला के चले गये मुझे उनकी याद सताये क्यु " - संगिता
" ऐसी मुहब्बतसे हम बाज आये " -नीराला
"दिल से भुला दो तुम हमे , हम ना तुम्हे भुलायेंगे " पतंगा
नको , बहुत हो चुका. बस्स.
" ये चांद प्यार मेरा तुझसे ये कह रहा है , तु बेवफा ना होना, दुनीया तो बेवफा हे " खजाना.
नाही. सहन होत नाही. असर कमी कसा करावा ? ज्वर कसा उतरावा ? परत आता दिलाला या अवस्थेतुन बाहेर काढायला काय बरे ऐकावे ?
’ना मारो नजरीया के बाण, अकेली आयी पनीया भरना "
का
"जब दिल को सतावे गम तु छेड सखी सरगम, बडा जोर है सात सुरोमे बहते आसु जाते है थम " - सरगम.
हे सारे त्या "अनामीका" मुळॆ. अण्णा चितळकरांची आठवण करुन दिल्यामुळे.

7 comments:

Anonymous said...

'छब्बीस जनवरी' चित्रपटातल्या एका गाण्याची शोधाशोध पुण्यात काही वर्षांपूर्वी सुरु होती. ते गाणंही आता आठवत नाही, आणि ते मला मिळालं का हे देखील आठवायला तयार नाही. पण त्या सिनेमातली सहज मिळणारी गाणीही सुंदर आहेत. ती तुम्ही ऐकली असतीलच. 'नादान' मधलं 'सारी दुनिया को पीछे छोड कर' चिक चॉकलेटच्या नावावर गेलं, पण त्यावर सी रामचंद्र शैलीचा स्पष्ट ठसा आहे.

लता बेफाम गायली आहे ती भविष्यात तिचं नाव करतील अशा गाण्यांत, १९४८ ते १९५३ च्या बहुतेक सर्व गाण्यांत, त्यातही खास करून अण्णांसाठी, आणि पुढे ज्ञानेश्वरांसाठी, मीरेसाठी आणि बाळसाठी.

तिच्या सी रामचंद्रांसाठी गायलेल्या १९८ हिन्दी सिने गाण्यांपैकी १०० तरी आवर्जून संग्रही ठेवावी अशी आहेत. शिवाय 'ऐ आँख अब न रोना', 'अपनी कहो कुछ मेरी सुनो', 'कितना हसीं है मौसम', 'ऐ चाँद जहाँ वो जाये' ही इतरांबरोबर म्हटलेली अविस्मरणीय गाणी आहेतच.

दोन गाणी नोंदवायची इच्छा होते आहे. 'शिनशिना की बूबलाबू' म्हणताच एकाच गाण्याची ('तुम क्या जानो') लोक आठवण काढतात, पण सिनेमाचं शीर्षक गीत तर भन्नाट आहेच, पण 'कैसे है मिज़ाज़' गाण्याचा तरन्नुम पद्‌धतीनी मुखडा लता असा काही थाटात गाते की ते ऐकूनच पहावं.
बडे सुरमा बन के निकले थे घर से
कि बिजली गिरा देंगे गुज़रे जिधर से
(इथे एक ओऽऽ अशी जीवघेणी लड)
न शेखी रहीं वो, न दावा रहा वो
अरे उलझे पड़े है किसी की नज़र से

ही गाणी एस डी बर्मननी दिली असती तर त्याचे भाट त्यांचा कंटाळा येईपर्यंत चघळत राहिले असते. पण भविष्यकाळानी सी रामचंद्रांच्या या गाण्यांना न्याय दिलेला नाही.


आणि 'साकी' सिनेमातलं 'ग़म की वादी में'. ऐकताना काळ गोठतो, आणि मधाळ आवाज़ातल्या लयीचं सोनं करणार्‍या सुरांच्या लाटांमागून लाटा कानावर आदळत रहातात.

Anonymous said...

'ग़मची मजा लुटावी' ... 'ग़म' हा पुल्लिंगी शब्द आहे.

Milind Phanse said...

बर्‍याच जुन्या अप्रतिम गाण्यांची सय करून दिलीत. धन्यवाद.

HAREKRISHNAJI said...

'छब्बीस जनवरी' चित्रपटातील गाणी मी बहुदा ऐकलेली नसावीत. तुम क्या जानो मलाही आवडते पण साकी चित्रपटातील गाणॆ माझ्या आठवणीत नाही. मध्यंतरीच्या काळात माझे या संग्रहाकडॆ फार दुर्लक्ष झाले. कॅसेंटची सगळी उलटापालट झाली आहे. आपल्या निमीत्ते परत ऐकायला सुरवात केली आहे.

विनोदची गाणी देखील मला फार मोहवीतात.

Anonymous said...

हरेकृष्णजी: तुम्ही यादी दिलेल्या ज़वळपास सगळ्याच गाण्यांच्या चित्रपटाचा उल्लेख केलात. एक अपवाद म्हणजे 'न मारो नज़रिया के बाण', आणि मला नेमका त्या गाण्याचाच चित्रपट आठवेना. सी रामचंद्रचे तीन अक्षरी बरेच सिनेमे आहेत. इतके की कधीकधी ते वेगळे करताना गोंधळ उडतो. नमूना, निराला, हंगामा, बारिश, खज़ाना, आज़ाद, 'काली काली रतिया' चा घुंगरू, मिनार, सगाई, झांझर, यास्मिन, शगूफ़ा, पतंगा. मला आठवत नसलेला सिनेमा लांब नावाचा आहे, पण ते नाव राज तिलक नाही, एवढंच आठवत होतं. तुमच्या आठवणी वाचताना मी गुंगून गेलो, आणि तशी चितळकरांची गाणी चघळायला मला कुठलंही निमित्त पुरतं. तेव्हा घरी त्यांच्या सिनेमांबद्दलची पानं पाहत बसलो. 'न मारो' हे गाणं 'पहली झलक' मधलं आहे, ही आठवण पुन्हा जागवली. पण नंतर 'राज तिलक' मधल्या गाण्यानी मनात ठाण मांडलं. तो तसा नंतरचा, म्हणजे १९५५ नंतरचा, सिनेमा. अण्णांची कारकीर्द 'यास्मिन' नंतर अचानक उतरणीला लागली, हे माझं मत. लताचाही आवाज़ किंचित का होईना पण बिघडला आणि १९५४-५५ नंतर आधीसारखा राहिला नाही. तरीही १९५६-६० काळात बाईनी अनेकदा तिच्या विशीत सुरवातीला तो आवाज़ 'तू गुपित कुणाला सांगू नको आपुले' सारख्या गाण्यांतून काय सहज़तेनी घुमायचा त्याची आठवण ज़ागवली. अशा गाण्यांपैकी मला बेहद्द आवडणारं गाणं म्हणजे 'आज न जाने रह रह क्यूँ दिल ये मेरा डोले'. गाण्याची सुरवात लयीला ज़रा मागे सारून सुरांच्या मस्तीत होते. पूर्वांगात लता काय भारदस्त सूर भरते ते ऐकायला मिळतं. नंतर तो आवाज़ छान लयीच्या अंगानी जातो, आणि मग तबल्याचा ठेकाही खेळकर होतो. असा ठेका लीलया उचलून धरावा तो लतानीच. लयीचा गाण्यातला भाग कमीजास्त करत बाई फूलपाखरासारखी गाण्यात बागडली आहे. स्वतः तर धुंद होउन गायली आहेच आणि ऐकणार्‍यालाही धुंद करून सोडते.

HAREKRISHNAJI said...

प्रिय अनामिका,

आपल्या कडुन मिळणाऱ्या या सुरेल प्रतिक्रिया, केवळ त्या मिळाव्या, आपल्या तुटपुंज्या माहीती मधे भर पडावी याच उद्देशाने मी या विषयावर लिहायला लागलो आहे. काल श्यामसुंदर ऐकला. विनोद ला ऐकले, हुस्नलाल-भगतराम (आधी रात) ऐकले.

HAREKRISHNAJI said...

Dear Milind,

Thanks for your comments.