समाधीवस्थेपर्यंत पोचायला म्हणे खुप खडतर मेहनत करावी लागते.
विनोद आणि लता यांना ऐकावे, अनमोल रतन आणि सब्जबाग मधे, श्यामसुंदर ऐकावा बाजार आणि लाहोर मधे, खाडकन समाधी लागेल.
लग्नाआधीच्या काळात राजाभाऊंनी एकदा रंगात आल्यावर तिला
" दुनिया हमारे प्यार की यु ही जवॉं रहे
मै भी वही रहु मेरा साजन जहॉ रहे
दो दिन की जिंदगी ऐ इसे युही गुजार दे
उजडी हुवी ये प्यार की राही संवार दे,
हमतुम रहा न रहे इसका गम नही
लेकीन हमारे प्यार का बाकी निशां रहे "
ऐकवले होते आणि आपल्या होणाऱ्या नवऱ्याचा आटा सटक आहे , आपल्या नशीबी हे काय लिहिले आहे असे तिला नक्कीच वाटले असावे
ही गाणी नुसती घायाळ करुन सोडतात.
"साजन की गलीया छोड चले दिल रोया आसुं बह न सके
ये जीना भी कोई जीना है, हम उनको अपना कह न सके,
जब उनसे बिझडकर आने लगे रुक रुक के चले फिर चल के रुके. "
" सुन लो सजन मेरी बात ,जी की बात
छोड देना कही मेरा साथ , जी की बात
ओ दिन है रसीले, रतीयां सुहानी, ऐसे मे कहले दिलोंकी कहानी
आज दिलोंकी नगरीया बसाले , कलकी झुटी बात , मेरी बात, जी की बात "
हे गाणॆ तर एका वेगळ्याच पातळीवर नेऊन पोहोचवते.
"मोरे द्वार खुले है आनेवाले कब आवोगे
जैसे उगते चांद को देखे धुंडे कोई चकोरा
जैसे पतझडकी रुतु मे भटके है रस का भवरा
जैसे मेरा मन रो रे के गाये प्रितम मोरा
आना है अब आ , मोरे द्वार खुले है...
मै तेरी तु और किसीका ये जलना है जीते जी का, खुली आंख के खेल है सारे सुनलो ................"
व
"तारे वही है चांद वही है , हाय मगर वो रात नही
मै भी वही हुं तुम भी वही हो हाय मगर वो बात नही "
जो मै जानती थी दिल देके दुखी होना है, ये प्रीत सदा का रोना है
ना मेरा दिल भटकता ना मै आज भटकती, बंद जबां, मै कहा वो कहां अब मिलनेकी कोई बात नही , हाय वो रात नही "
पहिली पायरी ओलांडायला सुरवात झाली.
"सजन आये आधी रात बडे गीले बहाने के साथ
ना मै हां बोली ना मै ना बोली, मै चुपके चदरीया तानके मचली हो गयी वो समझे सो गयी
" मुझे इशारे इशारे मे लगे बुलाने, दिल मे क्या था राम जाने हो फिर मन ही मन मे लगे मुस्कुराने, दिल मे क्या था राम जाने, ना मै हा बोली ना मै ना बोली, मै कहु चोरसे छोड चदरिया झुटी नीदंमे सो गयी "
"दर्द मिला है तेरे प्यार की निशानी , ओ देनेवाले तेरी मेहरबानी , हाय "
"हाय मै अकेली रह गयी ना ना बोला ना, हसते हसते बेदर्दीने कर ली .... "
" मेरी बरबादियोसे मुस्कुराने कोई आ गया कोई. मिटाने आ गया कोई, रुलाने आ गया कोई "
" मेरे दिल के तडपनेका तमाशा देखनेवाले, तुझे क्या मिल गया हाय, मेरा तडपना देखनेवाले "
"रोना ही लिखा था किस्मत मे, हम गीत खुषीके गा न सके "
"कागा रे " - वफा
3 comments:
'रोते रोते गुज़र गयी' हे विनोदच्या यादीत कसं आलं? 'बुज़दिल' मधलं हे सचिन देव बर्मनचं गाणं. लताच्या अत्त्युत्कृष्ट गाण्यांपैकी एक.
शामसुंदरची 'निर्दोष' मधली क़व्वाली ऐकली आहे की नाही? दोन भागात आहे. दोन्ही भाग आवर्ज़ून ऐकण्यासारखे आहेत. त्याची 'एक रोज़' सिनेमातली गाणी मिळाली तर पहा. ज़ीनत बेग़म अशी ठसक्यात गायली आहे की सांगता सोय नाही.
आणि विनोदसाठी लतानी गायलेलं सगळ्यात चांगलं गाणं तर यादीत आलंच नाही. वफ़ा मधलं 'कागा रे'. गाणं ऐकताना चिमटा काढून 'हे वास्तव आहे, स्वप्न नाही' अशी खात्री स्वतःच स्वतःची पटवावी लागते इतकी या गाण्यात लताच्या आवाज़ात आर्तता आहे.
माफ करा. मला देखिल काहीतरी चुकले आहे हे जाणवत होते.
आणि वफाची गाणी मी विसरायला नको होती.
'रोते रोते गुज़र गयी रात रे' बद्दलचा एक मुद्दा म्हणजे हे कैफ़ी आज़मी आणि शैलेन्द्र या दोघांनी मिळून ते लिहिलं आहे. तसंच 'मोरा गोरा अंग लै ले' च्या बर्याच ओळी शैलेन्द्रनी लिहिल्या होत्या आणि त्या त्याच्या अक्षरात अजूनही उपलब्ध आहे असं म्हणतात. पण गुलज़ार बिलंदर माणूस आहे. मानायचा नाही. 'गुलज़ार दीनवी' नावाखाली बंदिनीच्या आधी 'श्रीमान सत्यवादी' सिनेमासाठी गाणी लिहूनही 'मोरा गोरा अंग' पहिलं गाणं असल्याचा दावाही तो बिनदिक्कत करतो.
'वफ़ा' मधली काही गाणी बुलो सी रानीची आहेत. कदाचित 'कागा रे' हे त्या सिनेमातलं लता-विनोदचं एकमेव गाणं असेल. विश्वास नेरुरकरच्या पुस्तकात माहिती मिळेल. लताची विनोदसाठी खूप गाणी आहेत ती 'अनमोल रतन' मधे, आणि खरोखरच प्रत्येक गाणं म्हणजे रत्न आहे. हुस्नलाल-भगतराम जोडीचे थोरले बंधू अमरनाथ यांचा विनोद हा शागीर्द.
Post a Comment