Thursday, August 06, 2009

ये जिंदगी उसी की है आणि किसी नजरका मस्त इशारा है जिंदगी

सध्या "ये जिंदगी उसे की है " या गाण्याचा संगीत दिग्दर्शनावरुन वाद सुरु आहे, सी. रामचंद्र व रोशन यांच्या वरुन. आज चांदवणकरांनी यावर लोकसत्तामधे लेख लिहिला आहे. मला स्वःताला हे गाणॆ फार ग्रेट आहे असे वाटत नाही. सी.रामचंद्र यांची इतर अनेक गाणी याहुन हजारो पटीने सरस आहेत.
आपल्याला या वादाबद्दल काय करायचे आहे ? आपण दोघांच्याही गाण्यांची मस्तपैकी मजा लुटावी. "ये जिंदगी उसीकी है " ऐकुन रडावे आणि रोशनची "रागरंग" मधील लताची गाणी ऐकुन खुलुन यावे.
रोशनचे , लतानी गायलेले रागरंग चित्रपटातील हि दोन सुरेल, आनंदी गाणे राजाभाऊंना फार आवडतात.
"किसी नजर का मस्त इशारा है जिंदगी,
इक आसमांका टुटा सितारा है जिंदगी
क्या कश्तीयां रहेगीं ये लहरोसे होशीयार ,
गिनती है जिनकी लाट ( हे शब्द निटसे कळाले नाहीत) , उमीदोसें बेकरार
दरियाका इक बहता किनारा है जिंदगी
जीना उसीका है जो जिये और के लिये
आसुं भी दे नसीब तो हस कर उने पिये
दुनियाको ये हमारा खयाल है जिंदगी, इक आसमां का टुटा सितारा है जिंदगी "
आणि
"यही बहार है दुनियाको भुल जानेकी खुशी मनानेकी ....
ये प्यारे प्यारे नजारे , ये ठंडी ठंडी हवा , ये हल्का हल्का नशा , ये कोयलोकी सदा
निकलके आ गयी रुत मस्तीयां लुटानेकी खुशी मनानेकी ॥ "
या सिनेमात आणखी एक तलतनी गायलेले गाणॆ देखील मस्त आहेत.

2 comments:

Anonymous said...

राजाभाऊ: येते ७-८ आठवडे कामाचा भार जास्त होणार असं दिसतंय; म्हणून गाण्यांबद्दल काही वाचायचं नाही असा पाठ म्हणत होतो. पण 'ये ज़िंदगी उसी की है' विषयी मीही मित्रांशी इतक्यात बोललो असल्यामुळे थोडक्यात लिहितो. अनारकलीतली गाणी मला आवडत नाहीत, आणि हे गाणं तर मुळीच नाही. पण सी रामचंद्र नावाशी लोकांनी जुळवलेली सगळ्यात प्रसिद्‌ध गाणी जी आहेत त्यांतलं हे एक. म्हणून त्याचं श्रेय कमी करण्याचा किंवा इतरत्र वळवण्याचा मंगेशकर मंडळींचा प्रयत्न असू शकतो. एकदा नाटक पाहताना 'मूर्तीमंत भीती उभी' गाण्यामधे थोडा बदल करण्याची कल्पना अण्णांना सुचली, आणि ती कल्पना 'ये ज़िंदगी' मधे अंमलात आणली असं कणेकरांनी लिहिलंय. ते मला पुरेसं आहे. म्हणजे हृदयनाथचा या गाण्यात रोशनचं योगदान असल्याचा दावा खरा असूही शकतो, पण जास्त पुरावा मिळाल्याशिवाय मी ते मानणार नाही. रोशन हा अण्णांचा मदतनीस कधीच नव्हता. माझ्या माहितीनुसार तो काही दिवस फिरोज़ निज़ामीकडे आणि काही दिवस खुर्शीद अन्वरकडे मदतनीस म्हणून होता. आता अनिल बिस्वास, चितळकर हे लोक रोशनला फार मानत. पण भिडस्त स्वभावाचा रोशन अण्णांना सूचना करेल याची शक्यता कमी आहे.

'मूर्तीमंत भीती उभी' हे लता स्वतः शंकरराव कुळकर्णींच्या सिनेमासाठी, ज़राशा कंटाळवाण्या शैलीत, आधीच गायली होती. 'ये ज़िंदगी' मधे मला त्याची छाया दिसत नाही. पण मी काही मोठा जाणकार वगैरे नाही, आणि माझं मत पूर्ण चुकीचंही असू शकेल. हा मुखडा हुबेहूब कुठल्या हिंदी गाण्यात वापरला असेल तर माझ्या अतिशय आवडत्या प्रतिभावान संगीतकार ग़ुलाम महम्मदनी. 'आसमाँ वाले तेरी दुनिया से जी घबरा गया' ही ओळ सरळ 'मूर्तीमंत भीती उभी' वर बेतलेली आहे. लता अंतरा खूपच सफाईनी गाऊन हा मुखडा परत पकडते. या गाण्यात तलतनीही त्याचा भाग नेहमीप्रमाणे दर्दभरा गायला आहे. फक्त त्याची लताशी तुलना करण्याचा मोह टाळावा लागतो. मग त्याचा भरपूर आनंद घेता येतो. तलत आणि लताच्या उत्कट गाण्यांपैकी हे एक. ग़ुलाम महम्मदला तलतची नस सापडली होती. 'अजीब लडकी' सिनेमातल्या 'इक बेवफ़ा को दिल का सहारा समझ लिया' मधे या तिघांनी चमत्कारच घडवला आहे.

HAREKRISHNAJI said...

हा आठवडा मी रजेवर आहे म्हणुन ही गाणी ऐकणे व लिहिणे शक्य झाले आहे. नाहीतर मला दिवसाकाठी ब्लॉगसाठी जेवणाच्या वेळात फक्त १५-२० मिनीटॆ मिळतात.

आजच्या लोकसत्तामधे सुरेश चांदवणकरांनी याअव्र एक चांगला लेख लिहिला आहे.

"आसमॉं वाले तेरी दुनियासे जी घबरा गया" व'इक बेवफ़ा को दिल का सहारा समझ लिया" मला हि फार आवडतात.

तलतचा मी निस्सीम चाहता.