गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर जा !!
होय बाप्पा.
रात्रीचे १० ते १, जवळजवळ तीन तास आपल्याला एकाच जागी आपल्या भक्तमंडळींनी ताटकळत उभे ठेवले होते, त्यांची हौस भागवण्यासाठी, कर्णॅकर्कश वाद्यांच्या तालावर नाचण्याचे. त्यात परत हा आवाज कमी पडतो म्हणुन मग मोठाले भोंगे.
थकल्याभागल्या जीवास, नाही हो बाप्पा रात्रीच्या वेळी हा कानावर सतत आदळणारा भलामोठाला आवाज आता सहन होत.
बाप्पा, तुम्ही सुद्धा तुमच्या भक्तांपासुन दुसऱ्यांना वाचवण्यास असमर्थ आहात,
आणि पोलीस , त्यांचे तर हात बांधलेले. आणि ते तक्रार करणाऱ्यांचीच उलटतपासणी करण्यात माहीर.
तेव्हा बाप्पा
3 comments:
:( खरय,फार त्रास होतो.चला निदान अर्धे बाप्पा तरी सुटले वर्षापुरते.
Mazya atrupt mitra, ka swatachya jivala tras karun ghetos? are varsha madhun ekda yenar san, swatache dukha visrun 10-12 diwas dhamal karaiche divas, ani tula kai avdasa suchte? Bappa yevu nakos? are tu sukhi ki dukhi mahit nahi pan dusryana ka dukhi kartos? kadhi ja ani bapa morya che darshan ghe, dhola chya talavar nach mag samjel kai maja aste ti....
माझ्या प्रिय मित्रा,
कोणताही सण, उत्सव साजरा करतांना आपल्यापासुन दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे हे प्रत्येकाचे काम आहे.
उत्सव, सण साजरे करतांना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. एकाच जागी मध्यरात्रीच्या वेळी, तीन तास जेव्हा कर्णॅकर्कश्य वाद्ये वाजवुन त्यावर जे काही नृत्यप्रकार केले जातात ती आपली संस्कृती नक्कीच नाही.
मुले, वृद्ध , आजारी माणसे यांना या ध्वनीप्रदुषणाचा किती त्रास होत असतो हे त्या मुठभर लोकांना कधीच समजणार नाही
Post a Comment