तिरुपती बालाजीच्या मालमत्तेची, संपत्तीची संपुर्ण तपासणी करण्याचे मोजदाद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याचे वाचनात आले.
काय फरक पडतो नेमकी संपत्ती किती आहे हे जाणुन घेवुन. देवाच्या मुर्त्तीच्या मालकीची संपत्ती हजार करोड असोत, दहा हजार करोड असोत का शंभर हजार. समाजाला आणि देशाला या कुजत चाललेल्या संपत्तीचा काय फायदा ? उपयोग ?
मग ह्या अफाट संपत्तीचे करायचे काय हा प्रश्न विश्वस्थांना पडल्यामुळे मग मंदिराच्या गाभ्याला दिड हजार कोटी रुपये खर्च करुन सोन्याचे आवरण चढवण्यासारख्या गोष्टी केल्या जातात.
या पैशात संपुर्ण भारत देशातील झोपड्यांमधे ,पदपाथावर राहाणाऱ्यांसाठी कायमस्वरुपी निवारा होवु शकतो.
देव सोन्यात आणि ज्यांनी तो निर्माण केला ती माणसे विपन्नावस्थेत .
1 comment:
हरेक्रिश्नजी
खरंच अगदी मनातलं लिहिलंत. आवडलं..!
Post a Comment